श्रमकल्याण युग मासिकाचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याहस्ते प्रकाशन

 



अकोला, दि.१ (जिमाका)- शासनाच्या कामगार विभागाच्या  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत प्र्काशित श्रमकल्याण युग या मासिकाचे आज कामगार दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. राज्याचे कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याहस्ते मुंबई येथेही या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी  सहायक कल्याण आयुक्त श्रीकांत धोत्रे,  कामगार कल्याण अधिकारी अमरावती  सत्यजित चौधरी,  कामगार कल्याण अधिकारी वैशाली नवघरे,  केंद्र संचालक सचिन खारोडे, भास्कर भेले, अजय पोरे, नितीन मुळे, सुरेश मानकर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन