पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

690 अहवाल प्राप्त, नऊ पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज

              अकोला , दि. 30( जिमाका)-   आज दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 690 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 681   अहवाल निगेटीव्ह तर नऊ    जणांचे अहवाल पॉझिटीव्ह    आले.   दरम्यान 23   जणांना    डिस्चार्ज    देण्यात आला ,     असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.                 त्याच प्रमाणे काल (दि. 29 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.    त्यामुळे    आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण    संख्या   57595 ( 43072+14346+177 )   झाली आहे ,   अशी    माहिती शासकीय वैद्यकीय    महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी   दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर नऊ + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी पाच = एकूण पॉझिटीव्ह- 14                         शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 293147   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 289664    फेरतपासणीचे 39 7   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे   3086   नमुने होते. आजपर्यंत एकूण 29

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही - समाजमाध्यमांवरील माहितीवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन

अकोला , दि.30 (जिमाका)- समाजमाध्यमांमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ( CMEGP) या योजनेसंदर्भात माहिती पसरविण्यात येत आहे. या संदेशात चुकीची माहिती देण्यात आली आहे. या माहितीवर कुणीही विश्वास ठेवू नये., तसेच या योजनेच्या कामासाठी  कोणत्याही खाजगी संस्थेची वा व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली नाही, तरी नागरिकांनी अशा माहितीपासून सावध रहावे, असे जिल्हा उद्योग केंद्र, अकोला मार्फत कळविण्यात आले आहे.   CMEGP  या योजनेसंदर्भात काहीही काम असल्यास त्यासाठी नागरिकांनी व लाभार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, भुविकास बॅंक इमारत, पहिला मजला, एस. पी. ऑफिसच्या  बाजूला, अकोला (दूरध्वनी- ०७२४-२४३०८८०) येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र, अकोला यांनी केले आहे. यासंदर्भातील महत्त्वाच्या योजना व त्यांची माहिती याप्रमाणे उपलब्ध होईल. १)      प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना ( PMEGP)- ही योजना केंद्र पुरस्कृत योजना असून उद्योग व सेवा उद्योगा साठी २५ लाख रुपये प्रकल्प किंमती येवढे कर्ज बॅंकांमार्फत मंजूर होऊ शकते. विविध प्रवर्गांसाठी

बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड मिळणार घरपोच; कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन

अकोला , दि.30 (जिमाका) राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणुने बाधीत रुग्ण आढळुन येत आहे . या विषाणुचा संक्रमणाचा दर जास्त असल्यामुळे विषाणुमधील बदल आणि त्यापासुन होणारा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्याचे दृष्टीने जि ल्ह्या मध्ये   कडक निर्बंध घोषीत केले आहे. माहे जुन 2021 मध्ये ब्रेक द चेन कालावधी त ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज मंजुर झालेले आहेत व जिल्हा कार्यालयाकडुन ओळखपत्र ( स्मार्टकार्ड ) देणे बाबत लघुसंदेश (एसएमएस) प्राप्त झालेले आहेत असे बांधकाम कामगार मो ठ्या प्रमाणात कामगार कार्यालयामध्ये येत आहेत . बांधकाम कामगारां चे संख्या मोठ्या संख्येने असल्याने कोविड प्रतिबंधात्मक नियमाचे व प्रशासनाव्दारे घोषीत नि र्बंधाचे पालन हो त नसल्याने बांधकाम कामगारांना कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त रा . दे . गुल्हाने . यांनी केले आहे. महाराष्ट्र  इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ , मुंबई अंतर्गत ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज यापुर्वीच मं जुर झालेले आहेत व बांधकाम कामगारांनी नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळाच्या ब

तृतीयपंथीय कल्याण योजना; समितीत नियुक्तीकरीता 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अकोला , दि. 30( जिमाका)-   समाजकल्याण विभागामार्फत तृतीयपंथीयाचे कल्याण योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. या समितीमध्ये तृतीयपंथीयासाठी कार्य करणाऱ्या नामवंत संस्थेतील दोन तृतीयपंथीयांची नियुक्ती करावयाची आहे. त्यापैकी एक ट्रान्सजेंडर(ट्रान्सवुमन) असणे आवश्यक आहे. तसेच समितीमध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची निवड करावयाची आहे. दोन्ही समितीकरीता इच्छुक पात्र संस्थाव्दारे तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीमार्फत प्रस्ताव मागविण्यात येत असून त्याची परिपूर्ण प्रस्ताव समाजकल्याण विभागात दि. 15 जुलै 2021 पर्यंत सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. 000000

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 1155 चाचण्यात पाच पॉझिटीव्ह

अकोला , दि. 30( जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि. 29)   दिवसभरात झालेल्या   1101   चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा    अहवाल पॉझिटीव्ह आला ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. काल दिवसभरात अकोट येथे 36 चाचण्या झाल्या त्यात   एकाचा   अहवाल पॉझिटीव्ह आला ,   मुर्तिजापूर येथे 165   चाचण्या झाल्या त्यात   एकाचा   अहवाल पॉझिटीव्ह आला , अकोला महानगरपालिका येथे 644  चाचण्या झाल्या त्यात   एकाचा   अहवाल पॉझिटीव्ह आला , वैद्यकीय महाविद्यालय येथे 53 चाचण्या झाल्या त्यात   एकाचा   अहवाल पॉझिटीव्ह आला , तर अकोला येथे 13, बाळापूर येथे 82, बार्शीटाकळी येथे 14, पातूर येथे 14, तेल्हारा येथे 14, अकोला आयएमए येथे सात,   आरोग्य कर्मचाऱ्यांचे 33,   हेगडेवार लॅब येथे 26 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही ,   असे 1101   जणांच्या चाचण्या होऊन त्यात पाच जणांचा पॉझिटीव्ह आ ला . आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 85   हजार 067 चाचण्या झाल्या पैकी   14406   जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत ,   अशी माहिती जिल्हा रुग्ण

शासकीय निवृतीवेतनधारकांचे माहे जून-2021 चे मासिक निवृतीवेतन विलंबाने

           अकोला , दि. 29 (जिमाका)-   जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृतीवेतनधारकांचे माहे जून-2021 चे मासिक निवृतीवेतन देयक तयार करत असताना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे   माहे जून-2021 चे मासिक निवृतीवेतन विलंबाने दि. 5 जुलै पर्यंत होणे अपेक्षित आहे. तरी राज्य शासकीय निवृतीवेतन धारकांनी यांची नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांनी कळविले आहे. 00000

622 अहवाल प्राप्त, सात पॉझिटीव्ह, 35 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

            अकोला , दि.2 9( जिमाका)-   आज दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 622 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 615   अहवाल निगेटीव्ह तर सात    जणांचे अहवाल पॉझिटीव्ह    आले.   दरम्यान 35   जणांना    डिस्चार्ज    देण्यात आला , तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला ,     असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.                 त्याच प्रमाणे काल (दि. 28 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.    त्यामुळे    आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण    संख्या   57581 ( 43063+14341+177 )   झाली आहे ,   अशी    माहिती शासकीय वैद्यकीय    महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी  दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर सात + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी तीन = एकूण पॉझिटीव्ह- 10                         शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 292482   नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 289002    फेरतपासणीचे 39 7   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे   3

कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांकरीता शोध मोहिम राबवा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

इमेज
  अकोला , दि. 29( जिमाका)-   निदान न झालेले कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांना त्वरीत बहुविधी औषधोपचार करा. तसेच जिल्ह्यातील नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविधी औषधोपचाराव्दारे संसर्गाची साखळी खंडीत करुन संसर्गाचा आटोक्यात आणण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधिताना दिले.             जिल्हाधिकारी यांच्या दालनात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण समिती आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, मनपाचे सहा.क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, वैद्यकीय अधिकारी एस.डी. बाबर आदि संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.             जिल्हा समन्वय समिती सभेमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिले की,   जिल्ह्यातील कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्याकरीता 1 जुलै 2021 ते 30 मार्च 2022 या कालावधीत

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना; शेतकऱ्यांनी फळपिक विमाचा लाभ घ्या- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

        अकोला , दि. 29 (जिमाका)-   मृग बहार 2021 मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योज ना राज्यातील 26 जिल्ह्यात राबवि ण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील  शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.  अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळ पिके घेणारे  शेतकऱ्यांसह कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.  अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंमलबजावणी करिता एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स क. लि मिटेड कंपनी , मुंबई ची नेमणूक करण्यात आली आहे . पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत समाविष्ट फळ पिके , विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा   विमा हप्ता - अ . क्र . फळपिकाचे नाव विमा संरक्षित रक्कम (रु./ हेक्टर) शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता ( रु ) १ संत्रा ८०००० ४००० २ लिंबू ७०००० ३५०० ३ मोसंबी ८००००

छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळणार; दि. 5 जुलैपर्यंत हरकत-आक्षेप मागविले

            अकोला , दि. 29 (जिमाका)-   मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्र प्राप्त करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी दिल्यानंतर काही मतदार हे दिलेल्या पत्त्यावर कायमस्वरुपी राहत नसल्याचे दिसून आले आहे. अशावेळी नावे वगळण्याची कारवाई करणे आवश्यक असते , जिल्ह्यातील अशा छायाचित्र नसलेल्या व दिलेल्या पत्त्यावर आढळत नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी येत्या दि. 5 जुलै पर्यंत कुणाची हरकत आक्षेप असल्यास ते नोंदवावे , असे अकोला पश्चिम (30) विधानसभा मतदार संघाचे उपजिल्हाधिकारी(महसूल) तथा मतदार नोंदणी अधिकारी गजानन सुरंजे यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीत छायाचित्र नसलेल्‍या मतदाराकडून छायाचित्र प्रा प्त करून ते मतदार यादीत अंतर्भूत करणे बाबत निर्देश प्राप्‍त झाले आहे. त्‍याअनुषंगाने संबंधीत मतदारांच्‍या घरोघरी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी    (बी एल ओ)    यांनी   डिसेंबर 2019   ते मार्च 2021   या कालावधीत भेटी   दिल्या , त्यावेळी   मतदार याद्यांमध्‍ये छायाचित्र नसलेल्‍यांपैकी काही मतदार त्‍यांच्