2823 अहवाल प्राप्त, 674 पॉझिटीव्ह, 584 डिस्चार्ज, 10 मृत्यू
अकोला,दि.12(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 2823 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2149 अहवाल निगेटीव्ह तर 674 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. दरम्यान 584 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 10
जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 193 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 47797(36432+11188+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे
एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 674+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 193= एकूण पॉझिटीव्ह- 867.
शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 232163 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 229200
फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2573 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 232104 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 195672 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे.
674 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 674 अहवाल
पॉझिटीव्ह आले. त्यात 249 महिला व 425
पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-83, अकोट-141, बाळापूर-53, तेल्हारा-60,
बार्शी टाकळी-48, पातूर-44, अकोला-245. (अकोला ग्रामीण-41, अकोला मनपा क्षेत्र-204)
दरम्यान काल (दि. 11)
रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 193 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण
संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
584 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 42, उपजिल्हा रुग्णालय
मुर्तिजापूर येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील चार, देवसार हॉस्पीटल येथील सहा, क्रिस्टल हॉस्पीटल येथील
एक, गोयका गर्ल्स हास्टेल येथील तीन, जिल्हा
स्त्री रुग्णालय येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील 15,
ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी
येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन,
के. एस. पाटील हॉस्पीटल येथील चार, अर्थव
हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील तीन, केअर हॉस्पीटल येथील तीन, समित्र हॉस्पीटल येथील एक,
अवघाते हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर
अकोट येथील सहा, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील चार,
हॉटेल स्कायलार्क येथील चार, तर होम आयसोलेशन
मधील 465 असे एकूण 584 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती
जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
10 जणांचा मृत्यू
आज दिवसभरात 10
जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात सौंदाळा ता.तेल्हारा येथील 41
वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 11 मे रोजी
दाखल करण्यात आले होते. तर अन्य अशोक नगर येथील 44 वर्षीय
महिला असून या रुग्णास दि. 1 मे रोजी दाखल करण्यात आले होते,गोडबोले प्लॉट येथील 42 वर्षीय महिला असून या
रुग्णास दि. 19 रोजी
दाखल करण्यात आले होते, विझोरा ता.बर्शीटाकळी येथील 55
वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 11 रोजी
दाखल करण्यात आले होते. मुर्तिजापूर येथील
35 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते,
तर भाखराबाद येथील 56
वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल
करण्यात आले होते. खडकी येथील 67 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल
करण्यात आले होते, खदान येथील 55 वर्षीय
पुरुष असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते,
वाडेगाव येथील 24 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 11 रोजी
दाखल करण्यात आले होते, खदान येथील 84 वर्षीय
महिला असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
6812 जणांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा