अकोला,दि.24 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.23) दिवसभरात
झालेल्या 1108 चाचण्या झाल्या त्यात 81 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला येथे 171 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 30
चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 130 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका येथे 611 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 24
चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 70 चाचण्या झाल्या त्यात 14 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 60 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. बाळापूर येथे सहा, बार्शीटाकळी येथे एक व अकोला
आयएमए येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1108 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 81 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 44 हजार 909 चाचण्या झाल्या पैकी 13211 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा