पेरणीची घाई नको; घरचे बियाणे वापरा कृषी विभागाचा सल्ला
पेरणीची घाई नको; घरचे बियाणे वापरा कृषी विभागाचा सल्ला अकोला, दि. १ : येत्या खरीप हंगामामध्ये अल-निनो च्या पार्श्वभूमीवर कमी व असमान पावसाचा अंदाज असून मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. 100 मी.मी पाऊस झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे , असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. बाजारातील महागडे सोयाबीन बियाणे न वापरता स्वतःजवळील घरगुती बियाणे उगवण क्षमता चाचणी घेऊन ब ी जप्रकिया करून बियाणे म्हणून वापर करावा. सोयाबीन पिकाची पेरणी रुंद वरंबा व सरी पद्धतीने ( बीबीएफ ) किंवा बेडवर टोकन पद्धतीने केल्यास बियाण्याची बचत होऊन अधिक उत्पादनाची हमी असते. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे. ०००