पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्ह्यात दि. 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान आयुष्मान भव मोहिम राबविणार - जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 31 : केंद्र शासनाची आयुष्मान भव मोहिम दि. 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांत राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे निर्दे्श जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. आयुष्मान भव मोहिम व नियमित लसीकरणाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. दीपक करंजीकर आदी उपस्थित होते. श्री. कुंभार म्हणाले की, सर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टपूर्तीसाठी आयुष्मान भव ही मोहिम महत्वाचे पाऊल आहे. मोहिमेत आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी आदी कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यादृष्टीने अचूक कृती आराखडा व गावोगाव प्रभावी अंमलबजावणी करावी. मिशन इंद्रधनुष मोहिमेत दि. 11 ते 16 सप्टेंबर, तसेच दि. 9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी लसीकरण न झालेल्या बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल.      

मुलींच्या वसतिगृहातील कंत्राटी स्वयंपाकी पदासाठी अर्ज मागविले

अकोला, दि. 31 :येथील माजी सैनिकी मुलींच्या वसतिगृहातील कंत्राटी स्वयंपाकी पदासाठी दि. 3 सप्टेंबपरपूर्वी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छूकांनी जिल्हा सैनिक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, अकोला येथे अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी 0724-2450383 या क्रमांकावर संपर्क साधावा. ०००

शिधावाटपाचे ऑक्टोबर महिन्यासाठीचे परिमाण जाहीर

 शिधावाटपाचे ऑक्टोबर महिन्यासाठीचे परिमाण जाहीर अकोला, दि. 31 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अन्नधान्य , नियंत्रित साखर आदी जीवनावश्यक वस्तूंचे अकोला जिल्ह्यासाठी ऑक्टोबर महिन्याचे वाटप परिमाण जिल्हा पुरवठा अधिका-यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी गहू प्रतिव्यक्ती 2 किलो व फोर्टिफाईड तांदूळ प्रतिव्यक्ती 3 किलो विनामूल्य वितरित होईल. अंत्योदय अन्न योजनेत गहू प्रतिकार्ड 10 किलो व फोर्टिफाईड तांदूळ प्रतिकार्ड 25 किलो विनामूल्य वितरित होईल. अंत्योदय लाभार्थ्यांसाठी 20 रू. प्रतिकिलो दराने नियंत्रित साखर प्रतिकार्ड 1 किलो वितरित होईल. गोदामातील साठा उपलब्धता व लाभार्थी संख्येनुसार वाटपाचे परिमाण राहील, असे पुरवठा कार्यालयाने कळवले आहे.

दिव्यांग बांधवांनी थेट कर्ज योजनांचा लाभ घ्यावा दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे आवाहन

  दिव्यांग बांधवांनी थेट कर्ज योजनांचा लाभ घ्यावा दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे आवाहन अकोला, दि. 31 : दिव्यांग बांधवांसाठी दि. 3 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय शिबिर होणार आहे. त्याअनुषंगाने दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या विविध थेट कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. महामंडळामार्फत 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या पात्र व्यक्तींसाठी कर्ज व अर्थसाह्य योजना राबविल्या जातात. दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना :  फरिदाबाद येथील राष्ट्रीय महामंडळामार्फत दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजनेत विविध लघुउद्योगांसाठी 50 हजार ते 5 लाख अर्थसाह्य वार्षिक व्याजदर 5 ते 9 टक्के दराने उपलब्ध करून दिले जाते. वैयक्तिक थेट कर्ज योजना :  राज्य महामंडळामार्फत 50 हजार रू. पर्यंत कुटीर उद्योगांसाठी वार्षिक व्याजदर 2 टक्के दराने कर्ज दिले जाते. महाशरद वेब पोर्टल :  दिव्यांग व्यक्तींना महाशरद वेब पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केल्यास विनामूल्य सहायक साधने, उपकरणे उपलब्ध करून दिली जातात.   दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना व वैयक्तिक थेट कर्ज योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून,

दिव्यांगजनांसाठी ऑक्टोबरमध्ये जिल्हास्तरीय शिबिर

इमेज
शासन आपल्या दारी दिव्यांगजनांसाठी ऑक्टोबरमध्ये जिल्हास्तरीय शिबिर शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांना आवश्यक दाखल्यांचे वितरण - जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 30 : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी दि. 3 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय शिबिर आयोजित केले जाईल. एकाच छताखाली सर्व विभागांशी संबंधित योजना व कागदपत्रांचा लाभ दिव्यांग बांधवांना मिळवून देणे शक्य होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व विभागांनी नियोजन व सर्वदूर जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग कल्याण विभागाच्या कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. जिल्हा समाजकल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, दैनंदिन जीवनात दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळविण्यासाठीही त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ उपक्रमात जिल्हास्तरीय शिबिर घेण्यात येईल. या एकद

कावड यात्रा उत्सवाच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल

कावड यात्रा उत्सवाच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 30 : श्रावणातील तिस-या, तसेच शेवटच्या सोमवारी शहरात मोठ्या प्रमाणावर आयोजित कावड यात्रा लक्षात घेऊन अकोला-अकोट राज्य महामार्ग व दर्यापूर मार्गावरील, तसेच अकोला शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केला. अकोला शहरात श्रावण सोमवारी आयोजित कावड व पालखी मिरवणुकांमध्ये अनेक पालख्या व हजारो शिवभक्त सहभागी होतात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी मोठ्या प्रमाणावर कावड यात्रा असते. यंदा दि. 11 सप्टेंबरला शेवटचा श्रावण सोमवार आहे. कावड यात्रेच्या आदल्या दिवशी दुपारी 12 वा. पासून मोठ्या संख्येने शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन मध्यरात्रीनंतर पायदळ कावड यात्रेद्वारे अकोला येथील श्री राजराजेश्वर मंदिराकडे निघण्यास सुरूवात होते. कावड यात्रेचा मार्ग हा अकोट राज्य मार्ग असून, त्याची दुरुस्ती प्रगतीपथावर आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक यांनी प्रस्तावित केल्यानुसार जिल्हा दंडाधिकारी श्री. कुंभार यांनी हा

कृषी पायाभूत निधी योजनेबाबत बार्शिटाकळीत बुधवारी कार्यशाळा

कृषी पायाभूत निधी योजनेबाबत बार्शिटाकळीत बुधवारी कार्यशाळा अकोला, दि. 29 : कृषी विभागातर्फे कृषी पायाभूत सुविधा योजनेबाबत कार्यशाळा बार्शिटाकळी पंचायत समितीच्या सभागृहात दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वा. आयोजिण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचे स्मरण म्हणून दि. 30 ऑगस्ट रोजी त्यांची जयंती शेतकरीदिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी पायाभूत सुविधा निधीत बाजार संपर्क वाढवून निव्वळ उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी माल काढणीपश्चात सुविधा निर्माण करण्याच्या हेतूने 2 कोटी मर्यादेपर्यंतच्या सर्व बँक कर्जावर वार्षिक 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते. ही सवलत जास्तीत जास्त 7 वर्षासाठी उपलब्ध असते. कृषी खाद्य उद्योग उभारू इच्छिणा-या शेतकरी बांधव, युवकांसाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरणार आहे. कार्यशाळेला जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, महिला बचत गटांचे सदस्य, सहकारी संस्थेचे सदस्य, भूमीहीन व्यक्ती, कृषी उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, नागरी सेवा केंद्राचे चालक आदींनी उपस्थित राहण्याचे आ

बैलाला ‘लंपी’ची लागण; घुसरपासून १० किमी क्षेत्रात प्रतिबंध

बैलाला ‘लंपी’ची लागण; घुसरपासून १० किमी क्षेत्रात प्रतिबंध अकोला, दि. 29 : अकोला तालुक्यातील घुसर या गावातील एका बैलामध्ये लंपी त्वचारोगाची लागण झाल्याचे आढळले असून, संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्रात जनावरांच्या वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी आज निर्गमित केला. प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार घुसर येथील संसर्ग केंद्रापासून १० किमी बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. संसर्ग केंद्राच्या ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण 100 टक्के पूर्ण यावे, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी पशुसंवर्धन उपायुक्त, पशुसंवर्धन अधिकारी, तसेच पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालयाला दिले आहेत. जनावरांचा बाजार, यात्रा, पशुप्रदर्शन आदींना प्रतिबंधासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने कार्यवाही करावी. लसीकरणाबरोबरच दक्षतेच्या अनुषंगाने पशुपालक बांधवांमध्ये

नवमतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा

इमेज
नवमतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 29 : भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाहीप्रणाली आहे. निवडणूकांच्या माध्यमातून व मतदानाच्या राष्ट्रीय कार्यातून ही प्रणाली बळकट होत जाते. त्यामुळे नव्याने मतदानास पात्र झालेल्या सर्व तरूणांची मतदार म्हणून नोंदणी होणे आवश्यक असून, त्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण, तसेच ‘स्वीप’ कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्य, तसेच प्रतिनिधींची बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी श्री. कुंभार बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार संतोष शिंदे, समन्वय अधिकारी गजानन महल्ले आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, तरूणवर्ग विविध बाबींविषयी सोशल मिडीया

पीकस्पर्धेत सहभागाची मुदत दि. 31 ऑगस्टपर्यंत

  पीकस्पर्धेत सहभागाची मुदत दि. 31 ऑगस्टपर्यंत अकोला, दि. 28 : पीकस्पर्धा योजनेत सहभागासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत मुदत असून, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.    पीक स्पर्धेत अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य   भात ,  ज्वारी ,  बाजरी ,  मका ,  नाचणी (रागी) ,  तूर ,  सोयाबीन ,  भुईमुग व सुर्यफुल  या प्रमुख पिकांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे.   जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे तसेच आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी केले आहे.  ०००

जिल्ह्यातील 4 पारधी वस्त्यांवर सुरू होणार बालसंस्कार केंद्रे

  जिल्ह्यातील 4 पारधी वस्त्यांवर सुरू होणार बालसंस्कार केंद्रे अकोला, दि. 28 :   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे पारधी समाजाच्या मुलांसाठी 4 पारधी वस्त्यांवर बालसंस्कार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी, माना व कुरूम, तसेच अकोट तालुक्यातील महागाव येथील वस्तीवर पारधी समाजाच्या मुलांसाठी बालसंस्कार केंद्रे सुरू करण्यात येतील. जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमातील निधीतून हा उपक्रम राबवला जाईल. त्यासाठी बालसंस्कार केंद्र चालविण्यासाठी इच्छूक असलेल्या स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. केंद्रावर किमान 20 बालके असणे आवश्यक आहे. योजनेचा नमुना अर्ज प्रकल्प कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असून, दि. 8 सप्टेंबरपूर्वी नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेची घटना, तीन वर्षांचा ऑडिट रिपोर्ट, अनुभव आदी सर्व कागदपत्रांसह दाखल करणे आवश्यक आहे. पारधी समाजबांधवांना शेळीपालनासाठी अर्थसाह्य पारधी, फासेपारधी समाजाच्या 40 लाभार्थ्यांना शेळीपालनात पाच शेळी व एक बोकड खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, 40 महिला लाभार्थ्यांना मणीमाळ व

कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव: कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचना

इमेज
  कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव :  कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचना                 वेळीच उपाययोजना केल्यास नियंत्रण शक्य -           जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे               अकोला, दि. 27 : जिल्ह्यातील काही भागात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला असून, शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोना कराव्यात, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व त्यांच्या पथकाने बाळापूर तालुक्यात व्याळा, खिरपुरी  येथे प्रक्षेत्र भेट दिली, त्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला. अकोला, अकोट, तेल्हारा तालुक्यातील काही भागातही बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या व सध्या फुले, पात्या व लहान बोंड धारण केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. चिमलेल्या किंवा डोमकळीसदृश्य अवस्थेत असलेल्या प्रत्येक फुलात गुलाबी बोंडअळी आढळून आली. असे फुल अलगदपणे निघून येते.              अशा कोमेजलेल्या फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीची दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी फुलांमधून कोवळ्या बोंडाम

मूर्तिजापूरमधील पठाणपुऱ्यातील एका गाईत 'लंपी' आढळला संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्रात जनावरांच्या वाहतुकीस प्रतिबंध

  अकोला , दि. २६ : मुर्तिजापूरमधील पठाणपुरा परिसरातील एका गाईला लंपी त्वचारोगाची लागण झाल्याचे आढळले. तसा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानुसार संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्र बाधित घोषित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी विजय पाटील यांनी आज निर्गमित केला. प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार मुर्तिजापूर येथील पठाणपुरा परिसरातील संसर्ग केंद्रापासून १० किमी बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री , वाहतूक , बाजार , जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचप्रमाणे , ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण तात्काळ करण्यात यावे , असे आदेश जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त , जि. प. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी , तसेच जिल्हा पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालयाला देण्यात आले आहेत. 0000000

पोस्टाच्या निवृत्तीधारकांसाठी सप्टेंबरमध्ये पेंशन अदालत

    पोस्टाच्या निवृत्तीधारकांसाठी सप्टेंबरमध्ये पेंशन अदालत अकोला, दि. 23 :   टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्यातर्फे विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांसाठी 53 वी पेंशन अदालत दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात होईल.   निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, निवृत्ती किंवा मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आत पूर्तता न झालेल्या प्रकरणांचा अदालतीत विचार केला जाईल. कायदेशीर प्रकरणे, वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन, टीबीओपी, एमसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढ,   धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डीपीसीच्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार होणार नाही. संबंधितांनी आपला अर्ज तीन प्रतीत लेखा अधिकारी, अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, कार्यालय, जीपीओभवन, दुसरा मजला, मुंबई-400001 येथे दि. 25 ऑगस्टपूर्वी पाठवावा, असे आवाहन प्रवर डाक अधिक्षकांनी केले आहे. ०००

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी आरोग्य तपासणी शिबिर

  जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी आरोग्य तपासणी शिबिर अकोला, दि. 23 : जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून अकोला जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या सहकार्याने अधिकारी व कर्मचा-यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व सीपीआर कार्यशाळा उद्या, गुरूवारी (दि. 24 ऑगस्ट)   नियोजनभवनात दु. 2 ते 5 या वेळेत होणार आहे. शिबिरात रक्तदाब, रक्तशर्करा आदींबाबत तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाईल. सीपीआर कार्यक्रमात प्रथमोपचाराची क्रिया, प्रात्यक्षिक, सराव व चर्चासत्र होईल. सर्व विभागप्रमुख, विविध कार्यालयांतील अधिकारी,कर्मचारी यांनी   दुपारी 2 वाजता नियोजनभवनात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. ०००

तालुका लोकशाहीदिन महिन्यातील तिस-या सोमवारी

  तालुका लोकशाहीदिन महिन्यातील तिस-या सोमवारी अकोला, दि. 23 : तालुका लोकशाहीदिन प्रत्येक महिन्यातील तिस-या सोमवारी घेण्यात येत असून, नागरिकांनी आपली निवेदने, मागण्या तालुका स्तरावरील लोकशाहीदिन कार्यक्रमात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त व मंत्रालय स्तरावर वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने तालुका स्तरावरील लोकशाहीदिन प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी सकाळी 10 वा. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आयोजिण्यात येतो. त्यामुळे संबंधित तालुक्यातील नागरिकांनी तालुका स्तर उपक्रमात आपल्या मागण्या, निवेदने सादर कराव्यात. निराकरणाबाबत काही अडचण आल्यास तालुका लोकशाही दिन उपक्रमानंतर एका महिन्याने जिल्हा लोकशाही दिनात अर्ज करता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे. ०००  

वृत्तपत्रविद्या आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी 'अभिव्यक्ती मताची' स्पर्धेत भरघोस बक्षीसे

  वृत्तपत्रविद्या आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी                            ' अभिव्यक्ती मताची '   स्पर्धेत भरघोस बक्षीसे     अकोला ,   दि. 23   : विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा , असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा असून या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नालिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.               या स्पर्धेत जाहिरातनिर्मिती ,   भित्तीपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तीनही स्पर्धाचे विषय आणि नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी ,   महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   सदर स्पर्धाचे विषय असे आहेत   : (१) युवा वर्ग आणि मताधिकारी , ( २) मताधिकार लोकशाह

जिल्ह्यात ठिकठिकाणी युरिया खत उपलब्ध

  जिल्ह्यात ठिकठिकाणी युरिया खत उपलब्ध अकोला, दि. 21 : जिल्ह्यात युरिया खताच्या सर्वत्र उपलब्धतेसाठी संरक्षित साठ्यातून   प्रत्येक तालुक्यातील विक्रेत्यांकडे खत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, यापुढेही जिल्ह्यात आवश्यक पुरवठ्यासाठी या आठवड्यात युरिया उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली. संरक्षित साठ्यातून एकूण 312.138 मे. टन युरिया प्रत्येक तालुक्यातील विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार दि. 21 ऑगस्ट रोजी विक्रेत्यांकडे उपलब्ध युरिया खत साठा पुढीलप्रमाणे (परिमाण मे. टन) : अकोला तालुक्यात महाराष्ट्र ट्रेडर्स, कुरणखेड (17.55), पाटणी ट्रेडर्स, अकोला (25.335), संदेश कृषी सेवा केंद्र, मजलापूर (11.7), सुजय कृ. से. कें., दहीहंडा (11.7), अकोट तालुक्यात अकोट तालुका सेवा सह. संस्था कृ. से. केंद्र (10.125), नीलेश ॲग्रो, सावरा (12.15), श्री स्वामी समर्थ केंद्र, मुंडगाव, (12.15), वृषाली ॲग्रो सेंटर, अकोट (13.923), बाळापूर तालुक्यात गणपती ॲग्रो, निंबा फाटा (25.2), ठाकरे कृ. से. कें., हातरूण (9.675), शिवकृपा कृ. से. कें., निम

व्यवसाय शिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांची ‘आयटीआय’ला भेट.

इमेज
    व्यवसाय शिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांची ‘आयटीआय’ला भेट.   'कौशल्य वार्ता'चे प्रकाशन आणि   व्हर्च्युअल क्लासरूमचा प्रारंभ अकोला, दि. 20 : विभागीय व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांनी नुकतीच येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन उपक्रमांची पाहणी केली.   राज्यातील 75 ‘आयटीआय’मध्ये व्हर्च्युअल क्लासरूमचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे झाला. यावेळी अकोला येथील कार्यक्रमात श्री. घुले, जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी गजानन चोपडे, कौशल्य तथा नाविन्यता सहआयुक्त दत्तात्रय ठाकरे , संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य   विलास अनासने तसेच प्राचार्य शरदचंद्र ठोकरे , गटनिदेशक रेखा रोडगे, मुख्य लिपिक जयंत गणोजे आदी उपस्थित होते.   संस्थेतील इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थींनी   जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला. श्री. घुले यांनी त्यांच्याशी संवाद साधून कौतुक केले. इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाचे   शिल्पनिदेशक अरविंद   पोहरकर   यांच्या संकल्पनेतून आणि प्राचार्

राष्ट्रीय पशुधन अभियानात विविध बाबींसाठी अनुदान

  राष्ट्रीय पशुधन अभियानात विविध बाबींसाठी अनुदान अकोला, दि. 21 : पशुसंवर्धन विभागातर्फे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानात कुक्कुटपालन, शेळी मेंढी युनिट, वराहपालन, वैरणनिर्मिती आदी बाबींच्या प्रकल्पांसाठी अनुदान देण्यात असून पशुपालक व शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे यांनी केले आहे.   रोजगारनिर्मिती व उद्योजकता विकासासाठी पशुधनाची उत्पादकता, दूध, लोकर, अंडी, मांस, वैरणीची उपलब्धता वाढविणे, पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा असा राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या सुधारित योजनेचा उद्देश आहे. असंघटित क्षेत्रातील उत्पादनांची विक्री व्हावी व त्यांना चांगला कच्चा माल मिळावा यासाठी संघटित क्षेत्राशी जोडण्यात येणार आहे. अभियानात कुक्कुट, शेळी, मेंढी व वराह प्रजाती विकास, तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास याअंतर्गत अर्ज करता येईल. त्यात अंडी उत्पादनासाठी 1 हजारपेक्षा अधिक कुक्कुट संगोपन प्रकल्पासाठी 25 लक्ष अनुदान उपलब्ध आहे. शेळी- मेंढी युनिटसाठी 100 मादी व 5 नर ते 500 माजी व 25 नर यानुसार 10 ते 50 लक्ष रू. अनुदान उपलब्ध आहे. वराहपालन युन

लंपी प्रतिबंधासाठी पशुधनाचे लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन

  लंपी प्रतिबंधासाठी पशुधनाचे लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन अकोला, दि. 21 : रा ज्यातील गोवंशीय पशुधना त लंपी आजाराचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर   पशुधनाच्या लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे ,  असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.              राज्यात काही ठिकाणी पशुधनात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पशुसंवर्धन यंत्रणेला दिले आहेत. पशुपालकांनीही लसीकरण पूर्ण करून घ्यावे व आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन यंत्रणेने केले आहे.    जिल्ह्यात सुमारे 2 लाख 33 हजार 271 गोवंशीय पशुधन आहे. त्यातील 1 लाख 16 हजार 385 पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.   लंपी रोगाचा संसर्ग ‘कॅप्रिपॉक्स’ विषाणू मुळे होतो. या   आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणु देवी विषाणु गटाचे असतात.   लंपीचा प्रसार     जनावरांना डास, चावणाऱ्या माश्या, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दुषित चारा-पाणी यापासुन होतो. गोवर्गीय सर्व वयाच्या जनाव