पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद ; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दाखविली हिरवी झेंडी

इमेज
अकोला,   दि . 31   (जिमाका)-     क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने   जिल्हा प्रशासन,   जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी   यांच्या वतीने   सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज गुरुवार, दि.31 रोजी ‘रन फॉर युनिटी’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय एकता दौडला शहरातील नागरीकांचा उत्‍स्फुर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दर वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो, यानिमीत्य 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात आले होते. या दौडचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजयकुमार अवस्थी, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, तहसिलदार विजय लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी आ

अकोला जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश जारी

        अकोला , दि. 30:- दि. 10 नोव्हेबर 2019 ( एक दिवस मागेपुढे ) मुस्लीम बांधवाचे वतीने ईद-ए- मिलादुन नबी उत्सव साजरा करण्यात येणार आहेत.               उत्सव, कार्यक्रमाचे दरम्यान जिल्हयात   शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी   जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला यांना कलम 36 मुंबई पोलीस कायदया नुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस फौजदार व त्यापेक्षा वरीष्ठ अधिकारी यांना दि. 31 ऑक्टोबर2019   चे 00.00 वा. पासुन ते दि.13 नोव्हेबर 2019   चे 24.00 वाजेपर्यंत खालील अधिकार प्रदान करीत आहे.             रस्त्यावरुन जाणा-या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक कशा रितीने चालतील त्यांची वर्तणुक कशी असावी ?   याविषयी निर्देश देणे , मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास , उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी   गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे , अशा कोणत्याही मिरवणुका ज्या मार्गाने जाव्यात किंवा ज्या मार्गाने जावू नयेत ते ‍ विहीत कर

मातंग जातीतील होतकरू तरूणाच्या गटास बॅण्ड साहित्याचे वाटप

अकोला,   दि . 30   (जिमाका)-     सध्या सुरू असलेले आर्थ‍िक वर्ष हे अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील तरूण मातंग व त्यांच्या   पोटजातीतील होतकरू तरूण गटास बॅण्ड साहित्‍य वितरण   करण्याचे मुख्यालयाने   निश्चित केले आहे.   तरी जिल्ह्यातील तरूण गटांनी   आपल्या   साहित्य मागणी साठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास   महामंडळ   जिल्हा कार्यालय अकोला, हिंगणा फाटा, आरोग्य नगर अकोला येथे दि. 11 नोव्हेंबर पर्यंत रितसर अर्ज जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे करावा,असे जिल्हा व्यवस्थापक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास   महामंडळ   अकोला यांनी कळविले आहे. 00000

राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभागी व्हा ;जिल्हा प्रशासनाचे आवाहन गुरुवार दि.31 रोजी आयोजन

इमेज
अकोला,   दि . 30   (जिमाका)-     क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने   जिल्हा प्रशासन , जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी   यांच्या वतीने   सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि.31 रोजी ‘रन फॉर युनिटी’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमध्ये अकोला शहर व जिल्ह्यातील   अधिकारी कर्मचारी स्थानिक विद्यालय   व महाविद्यालयातील स्काऊट , गाईड, एन.सी.सी. व एन.एस.एस पथकातील विद्यार्थी , शारीरीक शिक्षण शिक्षक , विविध संघटनेचे पदाधिकारी , युवक-युवती, खेळाडू, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.             आज दि.30 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांच्या उपस्थितीत विविध संघटनेचे पदाधिकारी , शारीरीक शिक्षण शिक्षक, क्रीडा शिक्षक , स्काऊट , गाईड, एन.सी.सी. व एन.एस.एस पथकाचे शिक्षक आदींची बैठक घेण्यात आली. यावेळी मनपा क्रीडा अधिकारी   अनिल   बिडवे,   उपशिक्षणाधिकारी   दिनेश सरोळे, स्काऊट गाईडचे जिल्हा समन्वयक बालाजी सानप , क्रीडा अधिकारी गणेश कुळ

मतमोजणीच्या दिवशी अकोट शहरातील वाहतुकीत बदल

अकोला,   दि . 19   (जिमाका)-   विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019   साठी   गुरुवार   दि . 24 रोजी मतमोजणी     अकोट- पोपटखेड मार्गावरील शासकीय औद्योगीक प्रशिक्षण केंद्र अकोट येथील ट्रायसेम हॉलमध्ये     होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता. वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. गुरुवार   दि . 24 रोजी   सकाळी   सहा   वा. पासून ते     मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत पावेतो अकोट - पोपटखेड मार्गावरील जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहने पर्यायी मार्गाने   वळविण्यात आले आहे. शिवापुर, बोर्डी , रामापूर, सुकळी, पोपटखेड कडील जाणारी वाहने ग्रामीण रूग्णालयाजवळील औरंगाबाद शेत शिवाराकडून जाणा-या जुना बोर्डी रस्त्याच्या किंवा उमरा, बोर्डी शिवपुर   वापर करता येईल.. पोपटखेड , मोहाळा, आंबोडा, अकोलखेड, अकोला जहागीर , अकोट-अंजनगाव रस्त्याचा वापर करता येईल.   शहापूर , मलकापुर, पोपटखेड, रूधाडी, वस्तापूर, रुईखेड, अकोट अंजनगाव रोड या मार्गाचा वापर करता येईल. 00000

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज स्विकारण्यासाठी गुरूवार दि.31 पर्यंत मुदतवाढ

               अकोला , दि. 2 3 ( जिमाका)-   शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भोजन , निवास व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेणेसाठी रोख रक्कम त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा करणेबाबतची '' भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत विद्यार्थ्यांकडून समक्ष / टपालव्दारे अर्ज स्वीकृत करण्यासाठीची  गुरूवार (दि. 31) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.             या योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 10 वी , 12 वी, पदवी , पदविका परिक्षेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्ता गुण अनिवार्य आहे .   दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता टक्केवारीची मर्यांदी 40 टक्के आहे .   योजनेचा लाभ घेणे करिता विद्यार्थी हा अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाला असणे अनिवार्य असणे आवश्यक आहे . ( उदा . इयत्ता 11 वी , पदवी / पदविका प्रथम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येईल .)                 या योजनेकरिता अर्ज सादर करण्याची यापुर्वीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर   होती . अर्ज स्वीकारण्याची मुदत गुरूवार (दि. 31) पर्यं

दिव्यांगांचा टक्का वाढवणाऱ्या शिलेदारांचा सत्कार...

इमेज
अकोला , दि. 2 3 ( जिमाका)-   विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांच्या मतदानाची टक्केवारी ही        91 टक्के पर्यंत वाढली असुन ही टक्केवारी संपूर्ण राज्यात सर्वाधिक असण्याचा अनुमान आहे. ही बाब निश्चितच अकोला जिल्हा प्रशासनाला व ही कामगिरी करणाऱ्या प्रत्येक घटकाला भूषणावह आहे. गत लोकसभा निवडणुकीमध्ये ही टक्केवारी अमरावती विभागातून सर्वाधिक ठरली होती. या बाबीचा गौरवपूर्ण उल्लेख विभागीय आयुक्त तथा दिव्यांग मतदार व मतदार साक्षरता अभियानाचे   निरीक्षक पियुष सिंह   यांनी वेळोवेळी केलेला आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ही टक्केवारी शंभर टक्के पर्यंत नेण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न प्रशासनाने करावेत, असे आवाहन त्यांनी केले होते. त्या आवाहनानुसार आज जिल्ह्याची दिव्यांग मतदार मतदान ची टक्केवारी ही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा एकोणवीस टक्‍क्‍यांनी वृद्धिंगत झाली आहे. ही टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी   जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदार साक्षरता अभियानाचे जिल्हा नोडल अधिकारी आयुष प्रसाद व उपजिल्हा निवडणूक अधिक

कपाशीवरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

अकोला , दि. 2 2 ( जिमाका)-   शेतामध्ये नियमितपणे निरीक्षण आणि देखरेख करून एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतीं चा अवलंब करावा. कपाशी ची प्रा दुर्भाव ग्रस्त फुले व हिरवी बोंडे त्वरीत वेचून अळ्यास हित नष्ट करा वीत जेणेकरून , अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मद त होईल ., किडीचे वेळेवर व्यवस्थाप नासाठी अंडीपुंज असलेली पाने तसेच सुरुवातीच्या अवस्थेतील अ ळ्या हाताने गोळा करून नष्ट करा व्यात.,अंडी अवस्थेतील कीड नियंत्रणसाठी ट्रायकोग्रामा या प रोप जीवी किटकांचे शेतात प्रसारण करावे अथवा कापूस पिकाच्या पानां स ट्रायकोकार्ड लावावे., नवीन लष्करी अळी वरील प रोपजीवी व परभक्षी किटकांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कडुलिंबावर आधारित कीटकनाश कां चा वापर करावा ., प्रादुर्भावीत पिकांचे अवशेष तातडीने नष्ट करावेत ., प्रौढ नर पतंग नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा ., मुख्य शेत तणविरहीत ठेवणे तसेच, आजुबाजू चे क्षेत्र स्वच्छ ठेवावे. ,किटकनाशक नोंदणी समितीने मंजूर केले ल्या शिफारशीप्रमाणे नोंदणीकृत   कि टकनाश कांचा वापर करावा., कापूस एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती http:/

अकोल्यातल्या लेकरांना स्पॅनिश ‘मायेची ऊब’: अनाथांच्या जीवनात ममतेचे प्रकाशपर्व

इमेज
अकोला , दि . २२(डॉ.मिलिंद दुसाने )- ‘ कधी लेकरं मायेची ऊब शोधतात तरी कधी मायेची ऊब लेकरांना शोधते ’ . हे दोघे शोध घेत जेव्हा एकत्र येतात तेव्हा जन्मते हृदयस्पर्शी कहाणी. या हृदयस्पर्शी कहाणीतली लेकरं आहेत अकोला जिल्ह्यातली  आणि या गोंडस पाखरांना आपल्या पंखाखाली घेऊन मायेची ऊब देणारी माऊली आहे स्पेन देशातली. ही भेट घडवून अनाथ बालकांच्या जीवनात ममतेच्या प्रकाशपर्वाचा  नव्या अध्यायाची सुरुवात करण्यात प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी मोलाची भुमिका बजावत प्रशासनाचा मानवी चेहरा अधिक उजळ केला आहे. अकोल्यातली दोन गोजिरवाणी निरागस मुलं शुभांगी आणि आकाश. बालपणापासून नशिबी आले ते दुर्दैवाचे दशावतार.   जन्म घेऊन जगात आले नाही तोच जन्मदात्याच्या मृत्यू. कुटूंबाचा आधारच कोसळला. मुलांची आई मुलांना घेऊन माहेरी आली. तरुण विधवा मुलीच्या पुनर्वसनाचा विचार करुन म्हाताऱ्या आजीने ह्या मुलांच्या आईचा पुनर्विवाह करुन दिला. मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी म्हाताऱ्या आजीनं घेतली खरी पण इथली परिस्थिती ही गरिबीची. गरिबीवर आजीची माया मात करत होती. त्यात एक मामा व्यसनी, तर दुसरा मानसिक रुग्ण. मुलांची आई आपलं नवं

जिल्ह्यातील १७१ मतदान केंद्रांचे वेबकास्टींग होणार असून त्याचा नियंत्रण कक्ष जिल्हा नियोजन सभागृहात सज्ज करण्यात आला आहे.

इमेज

मतदान यंत्र वितरण व मतदान चमू आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना

इमेज

मतदान पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कर्तव्य कालावधी 22 पर्यंत

             अकोला , दि. 20 ( जिमाका)-   जिल्ह्यातील28-अकोट,29- बाळापूर, 30- अकोला पश्चिम,31- अकोला पुर्व, 32- मुर्तिजापुर या पाचही विधानसभा मतदार संघात सोमवार  दि. 21 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.  या निवडणूक कर्तव्याकरिता नियुक्त कर्मचारी हे दि. 22 पर्यंत निवडणूक प्रक्रियेत व्यस्त राहणार  आहेत. तरी संबंधित मतदार केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सोमवार  दि. 22 रोजीचा सामान्य कर्तव्याचा कालावधी गैरहजर समजण्यात येवू नये, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

‘एक्झिट पोल’ ला मनाई

  अकोला , दि. 20 ( जिमाका)-    विधानसभा निवडणूक 2019  च्या अनुषंगाने सोमवार दि. 21 रोजी सकाळी           7 ते सायंकाळी साडेसहा  वाजे दरम्यान कोणत्याही  प्रकारे  एक्झिट पोल घेणे ,  त्याचे संचलन करणे, मुद्रित , इलेक्ट्रॉनिक व तत्सम अन्य माध्यमात प्रसि द्ध करण्यास मनाई करण्यात  आली आहे, असे भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 कलम 126  अ (1) अन्वये जाहिर केले आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांनी भरले मतदार जनजागृतीचे रंग

इमेज
              अकोला , दि. १९( जिमाका)- विधानसभा निवडणूक २०१९ च्या मतदार जनजागृतीसाठी शनिवार दि.१९ रोजी  शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत दहा हजार विद्यार्थी सहभागी  होऊन मतदार जनजागृतीचे रंग भरले. मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रमाअंतर्गत   मतदार जागृती रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.१९ रोजी   सकाळी आठ वाजता लालबहादूर स्टेडीयम   येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तथापि पावसामुळे ही स्पर्धा विविध शाळांमध्ये घेण्यात आली. यावेळी   अकोला शहरातील १११ विद्यालयांतील इयत्ता ७ वी, ८ वी   व ९ वी या वर्गातील   सुमारे १० हजार   विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश अंधारे यांनी   दिली आहे.