पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष लेख : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीला गती; कृषी पंपांना वीज; शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीची तजवीज

इमेज
सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती होताना कार्बन उत्सर्जन होत नाही. सुदैवाने आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातील ऊर्जानिर्मिती क्षेत्रात सौर ऊर्जेचा भक्कम पर्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात या योजने अंतर्गत सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी २१० एकर जमिनिचे अधिग्रहण करण्यात आले आहे. लवकरच या जमिनीवर सौर प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरूवात होईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना १, अंतर्गत जिल्ह्यात बार्शिटाकळी तालुक्यात पिंपळखुटा येथे १.७५ मेगावॅट क्षमतेचा सौरप्रकल्प उभारून कार्यान्वितही करण्यात आला आहे.या अंमलबजावणीमुळे कृषीपंपांना दिवसाचे १२ तास वीज पुरवठा मिळणार असून साहजिकच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीची तजवीज यातून होणार, हे नक्की.   या योजनेत   जास्तीत जास्त फीडर सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने भर हा शेतीसाठी वीज पुरवठ्यावर दिला जात आहे. या योजनेच्या कार्यान्वयनामुळे शेतीला दिवसा १२ तास व

पद्म पुरस्कारःनामांकन-शिफारशींसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध

अकोला, दि.३०(जिमाका)- भारत सरकारतर्फे विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी आता ऑनलाईन पद्धतीने नामांकन व शिफारशी स्विकारण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने संकेतस्थळावर दुवे उपलब्ध करुन दिले आहेत. पद्म पुरस्कार-२०२४ साठी ऑनलाईन नामांकन शिफारशी स्विकारण्यास दि.१ मे २०२३ पासून सुरुवात झाली असून नामांकने स्विकारण्याची अंतिम तारीख १५सप्टेंबर २०२३ आहे. कला, साहित्य,शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या क्षेत्रात विशिष्ट आणि अद्वितीय कामगिरी-सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. वंश व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र मानल्या जातात. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सर्व सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र मानले जात नाहीत. या पुरस्कारांसाठी सर्व नागरिकांना नामांकन, शिफारशी पाठवण्याचे आवाहन केले जात आहे. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आण

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन ;दि.३१ जुलै २०२३ अंतिम मुदत

इमेज
       अकोला, दि.३०(जिमाका)- जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६   cup & cap model ( ८०:११०) नुसार राबविण्याबाबत दि.२६ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार सूचना प्राप्त आहेत. या योजने अंतर्गत सोयाबीन, मूग,उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे. अंतिम दिनांकापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभा गी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.                 अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंमलबजावणी करिता एचडीएफसी इर्गो जनरल इन्सुरन्स कं.लि. , मुंबई या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. संपर्क-एचडीएफसी इर्गो जनरल इन्सुरन्स कं.लि. डी- ३०१ , तिसरा मजला , ईस्टर्न बिझनेस डिस्ट्रिक्ट (मॅग्नेट मॉल) लाल बहादुर शास्त्री मार्ग , भांडुप (पश्चिम) , मुंबई-४०००७८. टोल फ्री क्र : १८००२६६०७००. ई-मेल: pmfby.maharashtra@hdfcergo.com   अधिसूचित पिके- खरीप ज्वारी, कापूस, तूर, उडीद, मूग, सोयाबीन. जिल्ह्यातील सर्व तालुके व सर्व महसूल मंडळां

अकोला ग्रामिण साठी अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया

अकोला, दि.३०(जिमाका)- एकत्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय अकोला ग्रामिण अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस या मानधन तत्वावरील ४२ पदाची भरती राबविण्यात येत आहे. याबाबतचा जाहिरनामा बुधवारी (दि.२८जुन) जारी करण्यात आला असुन पात्र महिला उमेदवारांनी  दि.३ते १४ जुलै पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास योजना अकोला ग्रामिण यांनी केले आहे. या पदभरती प्रक्रियेत आपोती खुर्द ,मारोडी , म्हैसांग , मजलापुर , घुसरवाडी , दोनवाडा , एकलारा , लाखोंडा बु , दहिहांडा , धामणा , सांगवी खु , निराट , निभोंरा , आगर , लोणाग्रा , पाळोदी , टाकळी जलम , उगवा , मंडाळा , कापशीतलाव , लोणी , चांदुर , कुरणखेड ,पातुर नंदापुर ,टाकळी पोटे ,येळवण,   देवळी , पैलपाडा , कानशिवणी , बाभुळगांव , बोरगांव मंजु ,वाकी व वरोडी या गावांतील पदभरती शासन निर्णयानुसार करण्यात येत आहे. या करिता संबधित गावात दवंडी देण्यात येत आहे. त्या त्या गावातील इच्छुक व पात्र महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावेत, असे कार्यालय  तर्फे कळविण्यात आले आहे. या पदासाठी किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण व स्थानिक रा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा शनिवारी (दि.1 जुलै) वर्धापन दिन सोहळा

  अकोला, दि. 28(जिमाका)- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७० वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि.१ जुलै रोजी असून यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ललित कला भवन, भिमनगर, डाबकी रोड, अकोला येथे सायं. ५ वा. होणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त वैशाली नवघरे यांनी केले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आपात्कालीन पीक नियोजन शिफारसी

  अकोला, दि. 28(जिमाका)- पाऊस आगमन विलंबाच्या पार्श्वभुमिवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी आपात्कालीन पीक नियोजनाबाबत शिफारसी शेतकऱ्यांसाठी जारी केल्या आहेत.  या शिफारशींनुसार, दि.२ ते १५ जुलै दरम्यान पावसाचे आगमन  कालावधीत- कापूस पिकासाठी अमेरिकन तसेच देशी कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. साधारणतः २० टक्के जादा बियाणे वापरावे. सुधारीत व संकरीत वाणांच्या बाबतीत दोन झाडांमधील अंतर कमी करावे. मुग, उडीद, सोयाबीन या पिकांचा आंतरपिक म्हणून आंतर्भाव करावा. कापूस- ज्वारी- तूर- ज्वारी या त्रिस्तरीय आंतरपिक पद्धतीचा (सहाःएकःदोनःएक) अवलंब करावा. ज्वारी पिकासाठी संकरीत ज्वारीचा सी.एस.एच-९ किंवा सी.एस.एच-१४ वाण वापरावा२० ते २५ टक्के जादा बियाणे पेरणी करावी. सोयाबीन पिकासाठी सोयाबीन टी.ए.एम.एस-३८, ती.ए.एमएस-९८-३१ किंवा जे.एस-३३५ या पैकी उपलब्ध वाण वापरावे. सोयाबीनच्या दोन, सहा किंवा नऊ ओळींनंतर तुरीची एक ओळ पेरावी. मुग, उडीद, तूर नेहमीप्रमाणे पेरणी करावी. विद्यापीठाने केलेल्या या शिफारशींचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी क

मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु

  अकोला, दि.२८(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात इयत्ता ११ वी, आयटीआय, पॉलिटेक्निक साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज वाटप सुरु झाले असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दि.३१ जुलै आहे. गुणवत्ता व आरक्षण निहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.  अकोला शहरातील रहिवासी नसलेल्या मात्र अकोला मनपा हद्दीतील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन गृहपाल एस.एस. लव्हाळे यांनी केले आहे. ०००००

पीक कर्जाचे नुतनीकरण दि.30 जूनपूर्वी करा -जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

  अकोला, दि. 28(जिमाका)- खरीप हंगाम सन २०२३-२४ या वर्षात शेतकऱ्यांनी दि.३० जून पुर्वी शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकार विभाग यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहिती नुसार,विविध बॅंकांकडून पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे. सन २०२३-२४ या वर्षात अकोला जिल्ह्यातील १,४७,९५० शेतकऱ्यांना १,२७,५०० लक्ष रुपये   खरीप पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट दिले आहे. दि.२६ पर्यंत जिल्ह्यातील ७६,४८२ शेतकऱ्यांना ८०,२४० लक्ष रुपये खरीप पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील नव्याने पीक कर्ज घेण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमागणी अर्ज बॅंकांकडे दाखल करावे. आणि नुतनीकरणापासून दूर असलेल्या अशा शेतकऱ्यांनी दि.३० जुनपुर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी केले आहे. खरीप पीक कर्ज वाटपाचे निर्धारीत उदिष्ट साध्य करण्यासाठी नवीन पीक कर्ज वाटप करणे तसेच पीक कर्ज वाढीसह नुतनीकरण करणे आवश्यक आहे. सर्व बॅंका पीक कर्ज वाटपासाठी गावोगावी शिबीरे घेत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या घरी जावून सुद्धा पीक कर्जाच

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२४ साठी ऑनलाईन अर्ज

  अकोला, दि.२८(जिमाका)- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२४ साठी विद्यार्थ्याचे आधार कार्ड संलग्न करुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत, अशी माहिती प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी कळविली आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२४ इयत्ता ५ वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. विद्यार्थी व पालक अकोला जिल्ह्यातील रहिवासी असावा. ऑनलाईन प्रवेश अर्ज विनामूल्य आहेत. ऑनलाईन अर्ज अपलोड करतांना विद्यार्थ्याचा फोटो (जेपीजी फाईल स्वरुपात) पालकाची सही (स्कॅन करुन) द्यावे. इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा विहित नमुन्यातील सर्टिफिकेट (स्कॅन कॉपी) जोडावे. प्रवेश अर्ज भरुन दि.१० ऑगस्ट पर्यंत अपलोड करावा. प्रवेश परीक्षा दि.२० जानेवारी २०२४ होणार आहे. प्रवेश अर्ज अपलोड करण्यासाठी   https://cbseitms.rcil.gov.in     किंवा www.navodaya.gov.in या लिंकवर संपर्क करावे,असे आवाहन प्राचार्य आर.एस. चंदनशिवे यांनी केले आहे. ०००००

अकोला (पूर्व) व अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघ पुनरिक्षण कार्यक्रम

  अकोला, दि.२८(जिमाका)- भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि.१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर  आधारीत अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मतदारांनी नावे नोंदविणे, वगळणे, केंद्र बदल इ.  कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे देऊन करता येतील अथवा ऑनलाईन पद्धतीने करता येतील असे मतदार नोंदणी अधिकारी अकोला(पूर्व) विधानसभा मतदार संघ डॉ. शरद जावळे व अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघ श्रीमती अनिता भालेराव यांनी कळविले आहे. पुनरिक्षण कार्यक्रम याप्रमाणे-शुक्रवार दि.२१ जुलै ते सोमवार दि.२१ ऑगस्ट   मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी / पडताळणी. मंगळवार दि.१७ ऑक्टोबर एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, मंगळवार दि.१७ ऑक्टोबर ते गुरुवार दि.३० नोव्हेंबर दावे हरकती स्विकारण्याचा कालावधी, मंगळवार दि.२० डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढणे, शुक्रवार दि.५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.

तेल्हारा तालुक्यात अंगणवाडी मदतनीस भरती

  अकोला, दि.२७(जिमाका)- एकात्मिक बालविकास सेवा योजना तेल्हारा अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस या मानधन तत्त्वावरील ५३ पदांची  भरती  राबविण्यात येत आहे. याबाबतचा जाहिरनामा दि.२६ जून रोजी जारी करण्यात आला आहे,असे बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना तेल्हारा यांनी कळविले आहे. या भरती प्रक्रियेत  अडगाव मंडलातील ६, हिवरखेड-१ मधील ११, पंचगव्हाण -११, दानापूर-८, दहिगाव-४, हिवरखेड-२-१३, याप्रमाणे पदांची भरती होणार आहे. ज्या ज्या गावातील पदांची भरती होणार आहे, तेथे दवंडीद्वारे  सुचना देण्यात येत आहे. इच्छुक पात्र महिलांनी आपले अर्ज एकात्मिक बालविकास सेवा योजना, तेल्हारा, योगेश्वर कॉलनी, पंचायत समिती, तेल्हारा समोर, तेल्हारा येथे दि.३ ते १४ जुलै दरम्यान जमा करावे. पात्रता व निकषः अंगणवाडी मदतनीस पदासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण (गुणपत्रक जोडावे) स्थानिक रहिवासी असणे आवश्यक (रहिवासी दाखला जोडावा.) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.   लहान कुटुंबाची अट. विधवा, अनाथ मुली, अनु जाती, जमाती, इतर मागासवर्गीय उमेदवारांना तसेच अंगणवाडी मदतनीस पदावर   किमान दोन वर्षाचा शासकीय अनुभव असल्यास

मोटार वाहन निरीक्षकांचे तालुकास्तरीय शिबिरांचे वेळापत्रक

  अकोला, दि.२७(जिमाका)- उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाअंतर्गत मोटार वाहन तपासणी, वाहन चालक अनुज्ञप्ती इ. कामकाजासाठी तालुकास्तरावर शिबिरे आयोजित केले जातात. ह्या शिबिरांचे तालुकानिहाय वेळापत्रक उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. तालुकानिहाय शिबिरांचे वेळापत्रक याप्रमाणे- बाळापूर- दि.४ व १८ जुलै, दि.२ व १४ ऑगस्ट, दि.४ व १२ सप्टेंबर, दि.४ व १३ ऑक्टोंबर, दि.३ व १६ नोव्हेंबर, दि.४ व १५ डिसेंबर २०२३. मुर्तिजापूर- दि.७ व २० जुलै, दि.४ व १८ ऑगस्ट, दि.६ व २० सप्टेंबर, दि.६ व १८ ऑक्टोंबर, दि.७ व २२ नोव्हेंबर, दि.६ व २० डिसेंबर २०२३. अकोट- दि.१० व २१ जुलै, दि.८ व २१ ऑगस्ट, दि.८ व १८ सप्टेंबर, दि.१० व २० ऑक्टोंबर, दि.९ व २४ नोव्हेंबर, दि.८ व १८ डिसेंबर २०२३. तेल्हारा- दि.६ व १३ जुलै, दि.१० व २५ ऑगस्ट, दि.७ व २५ सप्टेंबर, दि.११ व २३ ऑक्टोंबर, दि.२ व १७ नोव्हेंबर, दि.११ व २२ डिसेंबर २०२३. पातूर- दि.११ व २५जुलै, दि.११ व २३ ऑगस्ट, दि.१५ व २७ सप्टेंबर, दि.१६ व २६ ऑक्टोंबर, दि.१० व २८ नोव्हेंबर, दि.१३ व २६ डिसेंबर २०२३. बार्शीटाकळी- दि.१९ व २८ जुलै,

बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु

            अकोला,दि. 26 (जिमाका)-   सामाजीक   न्याय विभागांतर्गत असलेले बार्शीटाकळी येथील   शासकीय वसती गृहात   मागासव र्गीय   मुलांचे ऑनलाईन   प्रवेश सुरु झाले आहे. शासकीय   वसती गृ हात   प्रवेशाकरीता   मागासवर्गीय वि द्यार्थ्यांनी   वर्ग   आठवी   ते पदवी प र्यंत   शिक्षण घेत असले ले तसेच   बाहेर   गावच्या    विद्यार्थ्यांना   टक्केवारीनुसार व शास नाच्या निर्देशाप्रमाणे   वसती गृ हात   रिक्त   असलेल्या जागेवर मोफत प्रवेश देणे सुरू आहे. वसती गृ हामध्ये   विद्यार्थ्यांना   राहण्याची , नास्ता   व   जेवणाची   मोफत सु विधा   पुरविण्यात   येईल.    तसेच स्टेशनरी भत्ता ,   गणवेश भत्ता , मासीक निर्वाह भत्ता व अभ्यासकरीता सोईसुविधा दिल्या   जाईल. प्रवेशासाठी विद्यार्थांने app.eprashasan.com/onlineadmission/hostel या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.   अधिक माहितीकरीता गृहपाल के.एम. तिडके (मो.न. 8308058833) व कनिष्ठ लिपीक जी.एन. राठोड यांचेशी संपर्क साधावा,   असे आवाहन   समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त व   बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृह पाल   के. एम. त

हवामान अंदाजः28 जूनपर्यंत पावसाची शक्यता

अकोला,दि.26(जिमाका)-   भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 28 जूननपर्यंत जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.    विज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा.   वारा वादळाचे स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी,असे सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

नशामुक्त भारत पंधरवाडा; ग्रामिण भागात पथनाट्यव्दारे केले जनजागृती

इमेज
अकोला , दि. 26 (जिमाका)-   जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाव्दारे नशामुक्त भारत पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या अभियानाची जनजागृती व्हावी याकरिता कलापथकाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. शाहिर मधुकर नावकार आणि त्यांचा संच यांच्याव्दारे ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद समाजकल्याण कार्यालयाचे नोडल अधिकारी संतोष आडे यांनी दिली.             ग्रामिण भागातील नागरिकांना नशांच्या दुष्यपरिणामाबाबत जनजागृती व्हावी यासाठी दि. 12 ते 26 जून दरम्यान कलापथकाव्दारे जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी पथनाटय, भारुड, लोकगीत अशा विविध माध्यमातून नागरिकांना व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली. तसेच यावेळी समाजकल्याण कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याव्दारे नशांच्या दुष्यपरिणामाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. 000000

प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अकोला , दि . 26( जिमाका )-   जिल्ह्यात प्राण्यांची वाहतूक करतांना प्राणी संरक्षण कायद्याची   प्रभावी अंमलबजावणी करा, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.                   बकरी ईद   या सणाच्या पार्श्वभुमिवर आज जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. त्यानुसार बकरी ईद हा सण गुरुवार दि. 29 जून रोजी (चंद्र दर्शनानुसार) साजरा होणार आहे. जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी निर्देश दिले की, प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलवबजावणी करावी.   तसेच राज्यात प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा 1960, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976, महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा 1995, गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे.   या सर्व कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी.   जनावरांची वाहतूक करताना वाहतूक अधिनियमानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी   जनावरांची स्वास्थ तपासणी   केल्याचे व जनावर वाहतूक योग्य असल्याचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी. बकरी ईदच्या दिवशी जिल्ह्यात कुठेही   जनावरांची अवैध वाहतूक व कत्तल होणार नाही ,तसेच कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. यासाठी जि

जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी नोंदणी करण्याचे आवाहन

    अकोला , दि. 23( जिमाका)-     जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होत असते. व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा सन 2024 मध्ये ल्योन (फ्रान्स) येथे होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील 23 वर्षाखालील पात्र युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या कौशल्यांचे सादरीकरण करण्यासाठी नोंदणी करावी , असे आवाहन     जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे   सहायक आयुक्त   द. ल. ठाकरे यांनी केले आहे.            जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा 23 वर्ष ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार स्पर्धकाचा जन्म दि. 1 जानेवारी 2002 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक राहिल. तसेच ॲडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ,   क्लाऊड कंप्युटींग ,   सायबर सिक्युरिटी ,   डिजिटल कन्स्ट्रक्शन ,   इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी ,   इंडस्ट्री 4.0 ,   इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग , मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट इंटिग्रेशन अँड   वॉटर   टेक्नॉलॉजी   या क्षेत्रातील उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा त्यानंतरचा असावा.              जागतिक कौशल्य स्पर्धेत नोंदणीसाठी https://kaushalya.ma

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

अकोला , दि. २६ (जिमाका)-   राज्यातील अनुसुचित जमातीच्या 10 विद्यार्थांना   परदेशात   पदवी / पदव्युत्तर   अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे त्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या   दिनांक 31 मार्च 2005 व 16 मार्च 2016 च्या शासन निर्णयानुसार विहित नमून्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला या कार्यालयात उपलब्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांनी   शुक्रवार दि.30 जूनपर्यंत विहित नमून्यातील अर्ज   परिपूर्ण भरून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला   येथे सादर करावे.अर्ज करण्याकरीता आवश्यक असलेली पात्रता अटी व शर्ती   ही याच कार्यालयाच्या सुचना फलकावर उपलब्ध आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे यांनी केले आहे. 0000000

अकोल्याच्या दोघा तरुणांच्या ‘स्टार्टअप’ला पुरस्कार

इमेज
अकोला , दि. २६ (जिमाका)-  ‘ ॲग्रोशुअर’ या नावाने कृषी अवजारांच्या उत्पादनात नाविन्यपूर्ण प्रयोग करुन शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कृषी अवजारे उत्पादन करणाऱ्या अकोल्याच्या अक्षय वैराळे व अक्षय कवळे या दोघा विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला नुकताच युनायटेड नेशन डेव्हलेपमेंट प्रोग्रॅम, अटल इनोव्हेशन मिशन व निती आयोग आयोजित ‘युथ को-लॅब’ स्पर्धेतील लैंगिक समानता व महिला आर्थिक सक्षमीकरण या गटातील पुरस्कार मिळाला आहे. ॲग्रोशुअर प्रॉडक्टस ॲण्ड इनोव्हेशन, शिवनी जि. अकोला येथे अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे या दोघा तरुण उद्योजकांनी तीन वर्षांपूर्वी हा उद्योग लहान स्तरावर सुरु केला होता. हे दोघेही तरुण मेकॅनिकल इंजिनिअर असून   निर्मिती व विपणन या दोन्ही बाजू हे दोघे उद्योजक सांभाळतात.   या उद्योगातून ते नऊ जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देतात. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडतील असे ट्रॅक्टर व पॉवर विडर चलित जोडणी अवजारे बनवितात. त्यांच्या अवजारांमुळे शेतकऱ्यांना कोळपणी, निंदणी, फवारणी, पेरणी, मशागतीची कामे इ. यंत्रचलित करता येतात. त्यामुळे मजूरीच्या खर्चात बचत होते. शिवाय ही यंत्रे स्वतः शेतकरी