ग्रामिण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुधारित निर्देशाचे पालन करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर




अकोला, दि.11 (जिमाका)- ग्रामीण भागात कोरोनाचा  वाढता  प्रादुर्भाव रोखण्यासाठी  ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासनाने कोविड उपचारासंदर्भात दिलेल्या सुधारित निर्देशाचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

 जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आज जिल्हाधिकारी पापळकर यांनी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधून आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, उपअधिष्ठाता डॉ. कुसमाकर घोरपडे,  डॉ. अष्ट्रपुत्रे, डॉ. श्यामकुमार सिरसाम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदि उपस्थित होते.

 यावेळी ग्रामीण भागातील संपर्क चाचण्या, नियमित चाचण्या वाढविण्याबाबत व त्यातून बाधीत रुग्णांचा शोध घेऊन त्याच्यावर तात्काळ उपचार करावे. रुग्णालयांनी ऑक्सीजनची गरज लक्षात घेऊन ऑक्सीजनचा उपलब्धताबाबत खातरजमा करावे. यासाठी डुरा सिलेंडर, जम्बो सिलेंडर व ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्सची खरेदी करण्याचे नियोजन करावे. तसेच आवश्यक असणाऱ्या कोरोना रुग्णांना रेमडिसिविर इंजेक्शनची दैनंदिन मागणी प्रशासनाकडे नोंदवावी. ऑक्सीजन पुरवठा  व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने ऑक्सीजन सिस्टरची नेमणूक करावी. कोरोनामुक्त झालेल्या व मधुमेहाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीना म्युकोरमायकोसिस आजाराचे लक्षण असणाऱ्यांची माहिती अद्यावत ठेवावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. याबैठकीत उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ