2240 अहवाल प्राप्त, 347 पॉझिटीव्ह, 565 डिस्चार्ज, 17 मृत्यू
अकोला,दि.16(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 2240 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1893 अहवाल
निगेटीव्ह तर 347 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 565 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 17
जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.15) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 190 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 50272(38123+11972+177)
झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे
एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 347+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 190= एकूण पॉझिटीव्ह- 537.
शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 240476 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक
तपासणीचे 237492 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2594 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 240390 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 202267 आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
347 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 347 अहवाल
पॉझिटीव्ह आले. त्यात 160 महिला व 187
पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-35, अकोट-14, बाळापूर-62, तेल्हारा-49,
बार्शी टाकळी-10, पातूर-सहा, अकोला-171. (अकोला ग्रामीण-35, अकोला मनपा क्षेत्र-136)
दरम्यान काल (दि. 15)
रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 190 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व
ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
565 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 24, आर्युवेदिक महाविद्यालय
येथील 10, केअर हॉस्पीटल येथील सहा, समाज
कल्याण वसतीगृह येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन,
कोविड केअर सेंटर बाळापूर येथील तीन, कोविड
केअर सेंटर अकोट येथील 12, खैर उम्मत हॉस्पीटल येथील दोन,
भोयसर हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, उपजिल्हा
रुगणालय येथील दोन, अकोल ॲसीडेंट येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल
येथील दोन, देवसार
हॉस्पीटल येथील चार, आयकॉन येथील नऊ, ओझोन
हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, आधार हॉस्पीटल येथील चार, सहारा हॉस्पीटल येथील दोन,
इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल
येथील एक, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, काले हॉस्पीटल येथील दोन,
तर होम आयसोलेशन मधील 460 असे एकूण 565
जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
17 जणांचा मृत्यू
आज दिवसभरात 17 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खदान येथील 56 वर्षीय
पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते.
तर अन्य बाळापूर येथील 41 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 9
रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील 70
वर्षीय महिला असून या रुग्णास
दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते,शंकर नगर येथील 70 वर्षीय महिला असून या रुग्णास दि.
12 मे रोजी दाखल करण्यात आले होते, तर
कौलखेड येथील 79 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते,बार्शीटाकळी येथील 55
वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते. पातूर येथील 62
वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी
दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी येथील 55 वर्षीय पुरुष
असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते.
तेल्हारा येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 15
रोजी दाखल करण्यात आले होते, रामदासपेठ येथील 50
वर्षीय पुरुष रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट
येथील 39 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, बाळापूर येथील 51
वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 1 रोजी दाखल
करण्यात आले होते, तारफैल येथील 68 वर्षीय
पुरुष असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल करण्यात आले होते.
तसेच खाजगी रुग्णालय येथे चार जणांचे मृत्यू झाले. त्यात अकोट येथील 48 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 29 एप्रिल रोजी
दाखल करण्यात आले होते, रणपिसे नगर येथील 19 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात
आले होते, मलकापूर ता.मुर्तिजापूर येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल
करण्यात आले होते, तळेगाव बाजार ता. तेल्हारा येथील 44
वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 10 रोजी
दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात
आली.
6775 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 50272(38123+11972+177)
आहे. त्यात 908 मृत झाले
आहेत. तर 42589 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6775 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा