कोविड -१९ आढावा व नियोजन सभा; ग्रामीण भागात लॉकडाऊनची कडक अमंलबजावणी करा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


    अकोला,दि.८(जिमाका)- जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तात्काळ नियोजन करून परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी ग्राम पातळीवरील सर्व विभागांनी उपाययोजना करावी, लॉकडवूनची कडक अंमलबजावणी करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  आज ग्राम प्रशासनातील कर्मचाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी आज प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती, ग्रामपंचायत निहाय आढावा घेऊन मार्गदर्शन केले. 

ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या आढावा सभेस सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, अशा सेविका, अंगणवाडी सेविका, जि. प. शाळा मुख्याध्यापक त्या त्या ग्रामपंचायत कार्यालयातून उपस्थित होते. त्याचप्रमाणे  आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारीआरोग्य केंद्रातून तर तालुका स्थरावरील अधिकारी, कर्मचारी तालुका कार्यालयातून सहभागी झाले. यावेळी पं.स.  तेल्हारा   सकाळी ११ वा,पं.स.  पातूर    दुपारी सव्वा १२ वा.,पं.स.  बाळापूर,  दुपारी एक वा.,पं.स.  बार्शीटाकळी  दुपारी दोन वा. याप्रमाणे बैठका झाल्या. गावातील लोकांना वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणा साठी बाहेर न पडण्याचे आवाहन करावे, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची अमंलबजावणी करावी, चाचण्या वाढवणे, पॉझिटिव्ह पेशंट च्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या करणे इ.सूचना देण्यात आल्या.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :