पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 'स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' स्पर्धा अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे जिल्हाधिकाऱ्यांचे महाविद्यालयांना आवाहन

इमेज
अकोला, दि. ३१ : जिल्ह्यातील विद्यार्थ्याच्या अभिनव संकल्पना व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज'  स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनासहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी महाविद्यालयांना केले आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाईन बैठक दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. होणार असून, सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले आहे.  ऑनलाईन बैठकीची  लिंक  https://meet.google.com/yzv-bnak-hcn अशी आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा 0724-2433849 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा 9665775778 या क्रमांकावर संपर्क साधावा. महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्व महाविद्यालये, शासकीय, खासगी औ

महसूल सप्ताह नियोजनपूर्वक व समन्वयाने सर्वदूर यशस्वी करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

    महसूल सप्ताह नियोजनपूर्वक व समन्वयाने सर्वदूर यशस्वी करा -          जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 31 : महसूल विभागामार्फत उद्यापासून (दि. 1 ऑगस्ट) 7 ऑगस्टपर्यंत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबरोबरच   विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी शिबिरे घेण्यात येतील. सर्व तालुक्यांत महसूल सप्ताहाचे नियोजनपूर्वक व समन्वयाने यशस्वी आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. सप्ताहाच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना ते बोलत होते. महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव व विविध अधिकारी उपस्थित होते. सप्ताहाचा शुभारंभ मं गळवारी (दि. 1 ऑगस्ट) सकाळी 7 वाजता श्रमदानाने होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी श्रमदानात सहभागी होतील. दि. 2 ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’, दि. 3 ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा’, दि. 4 ऑगस्ट रोजी ‘जनसंवाद’ कार्यक्रमात कार्यक्रम होईल. दि. 5 ऑगस्ट रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’, दि. 6 ऑगस्ट, रोजी ‘महसूल सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद’ होईल. दि. 7 ऑगस्ट, रोजी सप्ताहातील कार्

मागासवर्ग आयोगाचा दि. 8 ऑगस्टला जनसुनावणी कार्यक्रम

मागासवर्ग आयोगाचा दि. 8 ऑगस्टला जनसुनावणी कार्यक्रम अकोला, दि. 31 : राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य अकोला येथे दि. 8 ऑगस्ट रोजी भेट देणार असून, त्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी, क्षेत्रपाहणी व विविध बाबींचा बैठकांद्वारे आढावा घेतला जाईल.         आयोगाचे सदस्य सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, डॉ. गजानन खराटे, डॉ. निलिमा सरप (लखाडे), डॉ. गोविंद हरिबा काळे, लक्ष्मण हाके, ज्योतिराम चव्हाण आदी दौ-यात उपस्थित असतील. त्यांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे:  दि. 8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात   सकाळी    10.30 ते 12.30    वा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., शिक्षणाधिकारी   (माध्यमिक व प्राथमिक) यांच्यासोबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संवर्गाच्या    इतर    मागासवर्ग    बिंदुनामावली व जिल्हा बदलीबाबत    बैठक व चर्चा, तसेच जिल्हा    जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांची आढावा बैठक.                        दुपारी 12.30 ते 1.30    वाजता    तेलंगी समाज    जनसुनावणी, सकल धनगर समाज जनसुनावणी, दु. 2 वाजता मलकापूरकडे (अकोला) रवाना,  दु. 2.30 ते 5    वाजता मलकापूर हडगर समाज क्षेत्

विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज विहित मुदतीत भरून घ्यावेत समाजकल्याण कार्यालयाची महाविद्यालयांना सूचना

  विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज विहित मुदतीत भरून घ्यावेत समाजकल्याण कार्यालयाची महाविद्यालयांना सूचना अकोला, दि. 28 : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. सर्व महाविद्यालयांनी योजनेत पात्र विद्यार्थ्यांकडून विहित मुदतीत अर्ज भरून घ्यावेत. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्राचार्यांची असेल, असे जिल्हा समाजकल्याण कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आदी शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. या योजनेत चालू शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल लवकरच सुरू होणार आहे. तथापि, मागील वर्षी अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज भरण्यास दि. 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत 2022-23 य

जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा अकोला, दि. 28 : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात दि. 28 ते 30 जुलैदरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा प्रकल्प 75.85 टक्के भरलेला आहे. या प्रकल्पाच्या क्षेत्रात पाऊस झाल्यास कोणत्याही क्षणी मोर्णा नदीत विसर्ग सोडला जाऊ शकतो. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पात 71.42   जलसाठा झाला असून, आज दुपारनंतर वान नदीपात्रात 52.08 घ.मी. प्र. से. पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पातून 13.57 घ. मी. प्र. से. यानुसार विसर्ग पूर्णा नदीत सुरू आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील इतर नदी-नाले, लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहेत.             ही स्थिती लक्षात घेता नागरिकांनी नदी, नाल्यांमध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये. पूर

जिल्हाधिका-यांचा कार्यालयातील सहका-यांशी संवाद

इमेज
  जिल्हाधिका-यांचा कार्यालयातील सहका-यांशी संवाद कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून कामे वेळेत पूर्ण करा -            जिल्हाधिकारी अजित कुंभार   अकोला, दि. 28 :   जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम सेवा मिळवून देणे हे आपले  सर्वांचे कर्तव्य असून, ही जबाबदारी ओळखून कामे पारदर्शकपणे व वेळेत पूर्ण करा, अशी सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज कार्यालयातील सर्व सहका-यांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांची बैठक जिल्हाधिका-यांनी आज नियोजन सभागृहात घेतली. अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद जावळे, उपजिल्हाधिकारी अनिल भालेराव, अनिल माचेवान, जिल्हा पुरवठा अधिकारी बबन काळे, अनिल चिंचोले यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार  म्हणाले की, प्रशासनात काम करताना स्वयंशिस्त आवश्यक आहे. त्याचे पालन सर्वांनी करावे. कुठलेही काम प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यालयीन शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे. नागरिक आपल्या कामांसाठी जिल्ह्यातून दुरदुरून कार्यालयात येत असतात. त्यांची कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कामात विलंब क

अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

  अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन अकोला, दि. 27 : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांनी पायाभूत सुविधांसाठी अनुदान मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. अल्पसंख्याक विकास विभागातर्फे शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषध व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान दिले जाते. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 31 जुलैवरून दि. 10 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. अधिकाधिक शाळांनी दि. 10 ऑगस्टपूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुदतीत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून व त्रुटींची पूर्तता करून अंतिम प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येतील.                 ०००    

कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
    जिल्हा विकास आराखड्याबाबत बैठक     कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा -         जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 27 : शेती क्षेत्राच्या विकासासाठी जिल्ह्यात   पीकवैविध्य व कृषी उत्पादकता वाढणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पुढील काळासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करून त्याचा समावेश जिल्हा विकास आराखड्यात करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.   जिल्हा विकास आराखड्याबाबत बैठक जिल्हाधिका-यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, उपवनसंरक्षक कुमारस्वामी एस.   आर., जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश निकम, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.   जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्ह्यातील दुग्धोत्पादन येथील गरजेपेक्षा   कमी असून, ते वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा समावेश आराखड्यात करावा. जिल्ह्यातून प्रत्यक्षात होणा-या निर्यातीचा अभ्यास करून निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबीही समाविष्ट

प्रधानमंत्री सन्मान योजनेचा 14 वा हप्ताचे वितरण; शेतकरी बांधवानी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्याचे आवाहन

अकोला , दि.26 (जिमाका) :   प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत   शेतकऱ्यांना 14 वा हप्ताचा लाभ वितरीत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दि. 27 रोजी राजस्थान मधील सिकर येथून ऑनलाईन पद्धतीने वितरीत होणार आहे. पात्र लाभार्थ्यांना एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीतील 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन जमा होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रसायन आणि खते, आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया उपस्थित राहणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी https://pwevents.ncog.gov.in या लिंकचा वापर करुन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे. 000000

नदीनाल्याच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

अकोला , दि.26 (जिमाका) :   भारतीय हवामान विभागाच्या संदेशानुसार आजपासून दि. 28 जुलैपर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता लक्षात घेता नदी नाल्यांच्या काठावरील गावांना व पुराचा प्रभाव असलेल्या वस्त्यांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्यात वीजेपासुन बचावासाठी झाडाखाली उभे राहू नये. नदी, नाले, तलाव, बंधारे यात मोठ्या संख्येने जलसाठा जमा होत आहे. अशा स्थितीत पोहण्याचे धाडस नागरिकांनी करु नये. रस्ता व पुलावरुन पाणी वाहत असल्यास ओलांडू नये. योग्य दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. 00000

इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहांसाठी जागेचा शोध सुरू जागामालकांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अकोला, दि. 26 : अकोला जिल्ह्यात इतर मागास व बहुजन कल्याण विभागातर्फे इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी, तसेच विद्यार्थिनींसाठी प्रत्येकी 100 क्षमतेची अशी दोन वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी भाडेतत्वावर इमारतीचा शोध सुरू आहे. इच्छूक जागामालकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्तांनी केले आहे. वसतिगृहांसाठी शासकीय जमीन मिळावी म्हणून महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ती व्यवस्था होईपर्यंत भाडेतत्वावर इमारत मिळवून वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत.   त्यानुसार अंदाजे 10 हजार चौ. फूट जागा उपलब्ध असल्यास जागामालकांनी इमारतीची कागदपत्रे व सोयीसुविधांच्या तपशीलासह सहायक आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ००००  

जिल्हाधिका-यांचा पत्रकार बांधवांशी संवाद ; पूरहानी टाळण्यासाठी कृती आराखडा व ठोस उपाययोजना करणार - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
अकोला, दि. 26 : जास्त पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याने पिकांचे व मालमत्तेचे नुकसान होते. पूरहानी रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने अकोला जिल्ह्यासाठी कृती आराखडा निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. श्री. कुंभार हे अकोला येथील जिल्हाधिकारीपदी मंगळवारी रूजू झाले. यानिमित्त नियोजन सभागृहात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.    श्री. कुंभार यांनी रूजू झाल्यावर पहिल्या दिवशी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. त्याची माहिती देताना ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे होणारी हानी रोखण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कृती आराखडा सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात येईल. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात नुकसानाच्या पंचनाम्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, तीन ते चार दिवसांत ते पूर्ण करण्यात येतील. त्याचप्रमाणे, सानुग्रह अनुदान वितरणही गतीने पूर्ण केले जाईल. ते पुढे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीचा निधी आगामी काळात आचारसंहितेमुळे   व्यपगत होता कामा नये. त्यासाठी सर्व नियोजि

जिल्हाधिका-यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी

इमेज
अकोला, दि. 25 : जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानाची पाहणी केली.     बाळापूर तालुक्यातील रिधोरा, निमकर्दा, उरळ आदी गावांना त्यांनी भेट दिली व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. बाळापूरचे तहसीलदार राहूल तायडे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुषंगाने पंचनामे तातडीने पूर्ण करून तसा अहवाल सादर करावा. नुकसानाची सविस्तर नोंद घ्यावी. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी दिले. अतिवृष्टीने निमकर्दा येथील पुलाचे झालेले नुकसान व विविध गावांतील शेतीच्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशीही संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ०००००

अकोला जिल्हाधिकारीपदी अजित कुंभार रूजू

इमेज
अकोला,दि. 25 (जिमाका) :   जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथील जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडून स्वीकारला.   त्यांनी आज विविध विभागप्रमुखांची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला.               श्री. कुंभार हे   भारतीय प्रशासकीय सेवेतील सन 2015 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी नांदेड येथे प्रकल्प अधिकारी, बीड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सहआयुक्त म्हणून काम केले आहे. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी आज विभागप्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्व कार्यालयांची पाहणी केली. विविध विभागांकडून सुरू असलेली, तसेच नियोजित विकासकामे विहित मुदतीत पूर्ण करावी. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कामे पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.   000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

         अकोला, दि. 24 (जिमाका) :   महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला जातो. त्याअनुषंगाने सन 2020-21 ते 2023-24 या कालावधीतील राज्य, विभागीय व जिल्हास्तरावरील   पुरस्कारासाठी समाजसेविका व संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. पात्र इच्छुक समाजसेविका व संस्थांनी आपला प्रस्ताव दि. 9 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिना प्रधान यांनी केले.               राज्यस्तरीय पुरस्कार : महिला व बालविकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिलांना तो पुरस्कार मिळाल्याचे पाच वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. पुरस्कारांचे स्वरुप रक्कम 1,00,001/- रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ.             विभागीय पुरस्कार : महिला व बालविकास क्षेत्रात संस्थेचे किमान 5 वर्ष कार्य असावे. नोंदण

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना; इच्छुक गोशाळांकडून 31 जुलैपर्यंत अर्ज मागविले

    अकोला, दि. 24 (जिमाका) :   पशुसंवर्धन विभागाअंतर्गत 2023-24 आर्थिक वर्षापासून सूधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अकोला जिल्ह्यातील अकोला तालुका वगळता सर्व तालुक्यात   राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र गोशाळांना   शासनाचे अनुदान मिळणार आहे. तरी पात्र संस्थांनी पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे आपले अर्ज सोमवार दि. 31 जुलैपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे. 00000

नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला वेग

  नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला वेग प्राथमिक अंदाजानुसार 1 लाख 42 हजार 752 हे. शेतीचे नुकसान अकोला, दि. 24 : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत अद्यापपर्यंतच्या सर्वेक्षणात प्राथमिक अंदाजानुसार 1 लाख 42 हजार 752 हे. आर. शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पंचनामे व सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला असून, ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत. जिल्ह्यात या महिन्यात दि. 13, दि. 19, दि. 22 व दि. 23 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील 52 महसूल मंडळांपैकी 34 मंडळे अतिवृष्टीत बाधित झाली. आपत्तीमुळे तीन व्यक्ती मृत्यू पावल्या. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतर्फे पाच गावांत बचाव कार्य करण्यात आले. एनडीआरएफ, तसेच स्थानिक बचाव पथकाने पुरामुळे अडकलेल्या 30 व्यक्तींना सुरक्षितस्थळी पोहोचविले. 248 कुटुंबाना सानुग्रह मदत देण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली.     आतापर्यंतच्या सर्वेक्षणात प्राथमिक अंदाजानुसार 1 लाख 37 हजार 678 हे. आर. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, तसेच 5 हजार

‘मनरेगा’बाबत तक्रार असल्यास रोहयो कक्षाकडे द्यावी

  ‘मनरेगा’बाबत तक्रार असल्यास रोहयो कक्षाकडे द्यावी प्रशासनाचे आवाहन अकोला, दि. 24 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंमलबजावणीबाबत कुठलीही तक्रार असल्यास नागरिकांनी ती रोहयो कक्षातील तक्रार निवारण प्राधिका-यांकडे द्यावी, असे आवाहन रोहयो कक्षातर्फे करण्यात आले आहे. योजनेच्या अंमलबजावणीबाबत तक्रार निकाली काढण्यासाठी तक्रार निवारण प्राधिकारी हे पद रोहयो कक्षात नियुक्त आहे. त्यांच्याकडून तक्रारीबाबत सुनावणी घेऊन कार्यवाही करण्याची जबाबदारी पार पाडली जाते. तथापि, प्रशासनाला योजनेबाबत तक्रारी प्राप्त होत नाहीत, असे निदर्शनास आले आहे.  त्यामुळे ‘मनरेगा’बाबतची कुठलीही तक्रार नागरिकांनी प्राधिका-यांकडे दाखल करावी. त्याबाबत वेळीच सुनावणी घेऊन आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आवाहन रोहयो उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले आहे. रोहयो कक्षात तक्रार निवारण अधिकारी म्हणून रवींद्र अग्रवाल (मो. क्र. 9423428187) कार्यरत आहेत. ०००  

युपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’चे अर्थसाह्य

    युपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’चे अर्थसाह्य   अकोला, दि. 24 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) 2023 या वर्षासाठी   युपीएससी   पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रत्येकी 50 हजार रू. एकरकमी अर्थसाह्य देण्यात येत आहे.     युपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जूनमध्ये जाहीर झाला. त्यानुसार ‘महाज्योती’मार्फत इतर मागासवर्ग , विमुक्त भटक्या जमाती ,   विशेष मागास प्रवर्गातील   उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले.   योजनेचा लाभ घेण्यासाठी 356 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 314 विद्यार्थी पात्र ठरले. यापैकी 298 विद्यार्थ्यांच्या खात्यात 50 हजार रू. जमा करण्यात आले आहेत. त्यानुसार सुमारे   1 कोटी 49 लक्ष रू. निधीचे विद्यार्थ्यांना वितरण झाले आहे. उर्वरित पात्र विद्यार्थ्यांनी बँक तपशील सादर केल्यावर त्यांनाही साह्य वितरीत केले जाणार आहे.   लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा ही दि.15 सप्टेंबरला होणार असून अर्थसाह्य वितरीत केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती ‘महाज्योती’चे नाग

लोकमान्य टिळक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

इमेज
अकोला, दि. २३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सहाय्यक अधीक्षक शिवहरी ठोंबे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. योगेश इंगळे,  ज्योती नारगुंडे आदींनीही  अभिवादन केले. ०००

सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी जिल्ह्यात मुसळधार पावसाने नदीनाल्यांना पूर: एक व्यक्ती वाहून गेली; बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू

इमेज
अकोला, दि. 22 : जिल्ह्यात गत २४ तासांत सरासरी ३७.९ मिमी पाऊस झाला. नदीनाल्यांना पूर आल्याने काही रस्ते बंद झाले आहेत. पुरात एक व्यक्ती वाहून गेली असून, शोधकार्य सुरू आहे.   जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व सर्व पथके सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, आवश्यकता पडल्यास अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध असावे म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडेही (एनडीआरएफ) पथकाची मागणी करण्यात आली. त्यानुसार एक पथक सायंकाळी दाखल होईल. जिल्ह्यात गत २४ तासांत सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. ती पुढीलप्रमाणे : तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा (130.3 मिमी), माळेगाव (144.3 मि. मी.), अडगाव (176.5 मिमी), पंचगव्हाण (130.3 मिमी), हिवरखेड (149.3), तसेच अकोट तालुक्यातील उमरा महसूल मंडळातही (70.50 मिमी) अतिवृष्टी झाली.   तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील नदीला पूर येऊन अंकित ठाकूर (वय 28) हा युवक वाहून गेला. त्याबाबत शोधकार्य सुरू आहे. मोर्णा नदीला पूर आला असून आगर ते उगवा रस्ता बंद आहे. नाल्याला पूर आल्याने अकोट-वणी वारुळा-मुंडगाव रस्ता बंद आहे. तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टी होऊन,