रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1576 चाचण्यात 212 पॉझिटीव्ह

 

 अकोला,दि. 9 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.8) दिवसभरात झालेल्या 1576 चाचण्या झाल्या त्यात 212 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

  काल दिवसभरात अकोट येथे 72 चाचण्या झाल्या त्यात आठ  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे 18 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. पातूर येथे 66 चाचण्या झाल्या त्यात 19 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तेल्हारा येथे 82 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 192 चाचण्या झाल्या त्यात 41 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 878 चाचण्या झाल्या त्यात 55 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 26 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे येथे 21 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 114 चाचण्या झाल्या त्यात 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 91 चाचण्या झाल्या त्यात 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोला येथे 12 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1576 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 212 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 23 हजार 462 चाचण्या झाल्या पैकी 10666 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ