पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नदी नाला काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

अकोला,दि.31 (जिमाका)-  भारतीय मोसम विभाग नागपूर  यांचे संदेशानुसार  2 ऑगष्ट पर्यंत  विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाऊस , विज पडणे, अतिवृ ष्टी होण्याची  शक्यता वर्तविली आहे.  तसेच दि.29 जुलैपासुन  पुर्णा नदीच्या  पाणीपातळीमध्ये  सातत्याने वाढ होत  आहे. तसेच इतरही  नदी नाल्यांना  पुर आला आहे. त्यानुसार  नदी, नाला काठावरील  गावांना  सतर्कतेचा इशारा  देण्यात आला असून क्षेत्रिय यं त्रणां नी  आपल्या कार्यक्षेत्राच्या मुख्यालयी हजर रहावे असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत .

प्रथम हप्त्याचे प्रदान ऑगष्ट महिन्याच्या निवृत्ती वेतनासोबत

अकोला,दि.31 (जिमाका)- अकोला  कोषागारातुन निवृत्तीवेतन घेणा ऱ्या   व दिनांक 1 जानेवारी 2016 पुर्वी  सेवानिवृत्त  झालेल्या  सर्व राज्य  शासकीय  निवृत्तीवेतन धारक/कुटूंब निवृत्तीवेतन धारक यांना कळविण्यात येते की, माहे जुन 2019 च्या निवृत्तीवेतनासोबत  काही  निवृत्ती वेतन धारकांना 7 वेतन आयोगाच्या  फरकाच्या रकमेपैकी प्रथम हप्त्याचे प्रदान करण्यात आलेले आहे.  उर्वरीत  निवृत्तीवेतन धारकांना  जुलै 2019  च्या  निवृत्तीवेतनासोबत  करण्यात  येणार होते परंतु  काही तांत्रिक  अडचणीमुळे जुलै 2019  च्या  निवृत्तीवेतनासोबत प्रथम हप्त्याचे प्रदान करण्यात येणार नसुन  ते माहे ऑगष्ट 2019 च्या  निवृत्तीवेतनासोबत करण्यात येणार आहे तरी  संबंधीत निवृत्तीवेतन / कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी यांची नोंद घ्यावी असे कोषागार अधिकारी मा.ब. झुंजारे यांनी कळविले आहे.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना : सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्तीची निवड

अकोला,दि.31 (जिमाका)-   महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  योजनेतंर्गत ता. पातुर जि. अकोला मध्ये सामाजिक अंकेक्षण  करण्याकरिता निवड करावयाची साधन व्यक्तीची संख्या –ग्राम  साधन  व्यक्ती- 60, समुह सधन व्यक्ती- 05  व तालुका सधन व्यक्ती- 01 या प्रमाणे  गाव पातळीवर  केलेल्या कामाचे  सामाजिक अंकेक्षण  केले जाणार  आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये गावांचे सामाजिक  अंकेक्षण करावयाचे  आहे. त्या ग्रामपंचायतीची  यादी ग्रामपंचायत/तहसिल/ पंचायत समिती तेथे  पहावयास मिळणार आहे.   अर्जाचे नमुने   ता पातुर ये थे किंवा   पं.स. पातुर येथे उपलब्ध होतील, ग्राम साधन व्यक्ती किमान 10 वी पास उपलब्ध न झाल्यास 8 वी पास, समुह सा धन व्यक्ती किमान   12 वी पास उपलब्ध न झाल्यास   10 वी पास, तालुका सधन व्यक्ती किमान   पदविधर उपलब्ध    न झाल्यास 12 वी पास असे राहील. ग्राम पंचायत क्षेत्रातील शैक्षणिक अहर्ताधारण केलेल्या व्यक्तीच्या निवडीकरीता ग्रामपंचायतस्तरांवर   उमेदवारांचे   अर्ज ग्रामपंचायतस्तरावर/ स्थानिक   पातळीवर   संकलित   करून   परिपुर्ण अर्ज दिनांक 14 ऑगष्ट   रोजी सायं . पाच वाजेपर्यंत मग्ररोहयो

मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवा- विभागीय आयुक्त पियुष सिंह

अकोला, दि.३१(जिमाका)- आगामी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान प्रक्रियेसंदर्भात अधिकाधिक जनजागृती करावी व नागरिकांचा मतदानातील सहभाग वाढवावा, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी आज येथे संबंधित यंत्रणांना दिले. मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्‍त पुर्नरिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे. त्‍याअनूषंगाने दि.15 ते 30 जूलै या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करून अकोला जिल्ह्यातील नागरीकांकडून मतदार नोंदणी, वगळणी, स्थलांतर आदीं करीता नमुना 6 , 7 , 8 , आणि 8 अ भरुन घेण्‍यात आले. या अभियानांतर्गत जिल्ह्यात ६१५८ जणांचे अर्ज निवडणूक यंत्रणेकडे दाखल झाले आहेत.  अशी माहिती यावेळी देण्यात आली.  त्याअनुषंगाने मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयूक्‍त अमरावती विभाग यांनी सदर मोहिमेचे अनूषंगाने मान्‍यता प्राप्‍त राजकीय पक्षांसोबत आढावा सभा आज सकाळी जिल्‍हाधिकारी अकोला यांच्या दालनात आयोजित केली होती. या सभेस विभागीय आयुक्‍त , अमरावती विभाग पियुष सिंह यांचेसह जिल्हाधिकारी जितेंद्र पा

शिक्षकांच्या समस्या पंधरा दिवसात निकाली काढा- डॉ. रणजित पाटील

इमेज
मुख्याध्यापकांच्या वेतननिश्चिती प्रकरणांसाठी शिबिराचे आयोजन अमरावती , दि .31 : जिल्ह्यातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाशी निगडीत शिक्षकांच्या सेवाविषयक प्रलंबित असलेल्या समस्या येत्या पंधरा दिवसांत निकाली काढून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ . रणजित पाटील यांनी आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले . जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते . यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . सानप , शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) निलीमा टाके , शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) प्रिया देशमुख , वेतन पथक अधिक्षक श्री . बिजवे यांचेसह शिक्षण विभागाचे अधिकारी व विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते . शिक्षकांच्या सेवा विषयक समस्यांसंदर्भात शिक्षक संघटनांचा व वैयक्तिक प्रकरणांचा आढावा घेत असतांना डॉ . पाटील म्हणाले की , शिक्षकांच्या संदर्भातील सर्व सेवाविषयक व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तातडीने करावा . काही प्रकरणांत जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्यास संबंधितावर

पिक कर्ज वाटपाला प्राधान्य द्या-किशोर तिवारी यांचे निर्देश

इमेज
अकोला,दि.31 (जिमाका)-   खरीप हंगामासाठी शेतक ऱ्यां ना खरेदीसाठी पिक कर्ज   वाटपाला   बॅकांनी   प्राधान्य द्या, असे निर्देश   कै. वसंतराव   नाईक शेती   स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या   नि यो जन भवनात मंगळवारी (दि.30 रोजी) सायंकाळी आयोजीत आढावा   बैठकीत ते   बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक   आलोक ताराणीया, उपनिबंधक सहकारी संस्था   डॉ. प्रविण लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जि ल्ह्यात पिक कर्ज वाटपाचे   1398 कोटी 78 लाख रूपयाचे उद्दिष्ट आहे. तरी सर्व बॅंकां नी 15 ऑगष्ट पर्यंत उद्दिष्ट   पुर्ण करावे ,अशा सुचना यावेळी किशोर तिवारी यांनी दिल्या. जिल्ह्यात उपनिबंधक सहकारी संस्था   व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक   यांच्या सहकार्याने   बॅं कांनी मंडळ निहाय पिक कर्ज वाटप तसेच   कर्ज पुर्नगठणसंबंधी मेळावे आयो जि त केल्यामुळे पिक कर्ज वाटपाला गती आ ली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर   यांनी यावेळी दिल

विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक

इमेज
अकोला,दि.31 (जिमाका)-   अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी  आज जिल्हाधिकारी  कार्यालयात  जिल्हास्तरीय आढावा बैठकीत  विविध  विषयांचा आढावा घेतला. नियोजन सभागृहात आज सकाळी आयोजीत बैठकीस जिल्हाधिकारी   जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी   आयुष   प्रसाद, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर,   निवासी उपजिल्हाधिकारी   राम लठाड तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्तांनी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंअंतर्गत जिल्ह्यात झालेल्या   कामासंदर्भात यंत्रणानिहाय   आढावा   घेतला. आता पाऊस होते असुन जमिनीत पुरेसा ओलावाही निर्माण झाला असुन   रोप लागवडीचे   काम तात्काळ पुर्ण करावे. यामुळे रोपे जगण्याच्या प्रमाणातही वाढ होईल, अशी सुचना   यंत्रणांना   केली. यावेळी विभागीय आयु क्त   सिंह   यांनी   प्रधानमंत्री   किसान   सन्मान   निधी , स्वच्छ भारत   अभियान, आयुष्यमान भारत योजना   प्रधानमंत्री आवास योजना,ई- सेवा केंद्राच्या कामकाजाबाबत आढावा घेतला.तसेच महसुल विभागाच्या विविध   उपक्रमांचाही आढावा घेतला.

जिल्ह्यातील दोन ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम

अकोला,दि.30 (जिमाका )-   राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील  नव्याने स्थापित दोन ग्रामपंचायत निवडणूकांकरीता निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.  त्यात जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील केलपाणी व केलपाणी बु. या दोन ग्रामपंचायतीतील थेट सरपंच तसेच प्रत्येकी तीन या प्रमाणे सहा प्रभागांमध्ये एकूण १४ सदस्यांची निवड करण्यासाठी या निवडणूका होणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेकडून प्राप्त माहितीनुसार, या निवडणूक कार्यक्रमात दि.१ ऑगस्ट रोजी तहसिलदार हे निवडणूक अधिसुचना प्रसिद्ध करतील. दि.९ ते १६ऑगस्ट दरम्यान ( सुटीचे दिवस वगळून) नामनिर्देशन पत्र सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळात स्विकारले जातील.   नामनिर्देशन पत्रांची छाननी   १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपासून होईल. नामनिर्देशन पत्र माघारीसाठी दि.२१ रोजी दुपारी ३ वा. पर्यंत मुदत असेल.   आवश्यकता भासल्यास दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळात मतदान होईल. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणूक उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे ही   संगणकीकृत पद्धतीने भरण्याची सुव

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांसाठी पुरस्कार

अकोला,दि.30 (जिमाका)-   राष्ट्रीय व आंतररा ष्ट्री य विविध क्षेत्रात उत्कृष्ठ  कार्य करणा ऱ्या   माजी  सैनिक /पत्नी/पाल्य तसेच  शैक्षणिक वर्ष 2018-2019  मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  विभागीय  शिक्षण  मंडळातून  इयत्ता  10 वी , 12 वी बोर्डात  90 % पेक्षा अधिक गुण  मिळविणा ऱ्या   माजी सैनिकांच्या पाल्यांना   विशेष गौरव  पुरस्काराकरीता निवड करण्या साठी   अर्ज  मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची  शेवटची  तारीख  15 सप्टेंबर पर्यंत    आहे. तरी अकोला  जि ल्ह्या तील सर्व  माजी  सैनिक/विधवा  पत्नी   यांनी  नोंद घ्यावी असे जिल्हा  सैनिक  कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे. राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध   क्षेत्रात   उत्कृष्ठ कार्य करणा रे, माजी सैनिक /पत्नी पाल्य यांना   शैक्षणिक वर्ष   2018-2019 मध्ये खेळातील   पुरस्कार प्राप्त   खेळाडू , साहित्य , संगित , गायन, वादन , नृत्य   इत्यादी   क्षेत्रातील पुरस्कार विजते, यशस्वी   उद्योजकांचा   पुरस्कार   मिळविणारे , संगणक क्षेत्रात अति उत्कृष्ठ कामगिरी   करणारे, तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे   लक्षणीय

जि.प.उपकर निधीःलाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध

अकोला,दि.30 (जिमाका)- जिल्हा परिषद कृषि विभाग अकोला  अंतर्गत  सन 2019-20 मध्ये अर्थसंकल्पानुसार  जिल्हा  परिषद उपकर निधीमधुन सात योजनांना मंजुरी  मिळाली होती . या योजनेतून सर्वसाधारण शेतक ऱ्यां ना 90 टक्के अनुदानावर प्लास्टीक ताडपत्री, 450 GSM  पुरविणे, प्लास्टीक  ताडपत्री 370 GSM  पुरविणे, ओपनवेल सबमर्सिबल पंप 5 एच पी पुरविणे,  सबमर्सिबल पंप 5 एच पी 8 स्टे जेस  पुरविणे, डिझेल पंप 5 एच पी पुरविणे, सोयाबीन  स्पायरल सेप्रेटर/ग्रेडर पुरविणे, एचडीपीई पाईप पुरविणे आदी बाबी अंत र्भू त आहेत. या योज ने अंतर्गत  15 जुलै अखेर पर्यंत   4907 अर्ज तालुकानिहाय  प्राप्त  झाले हेाते . त्यापैकी 4273 अर्ज निकषानुसार पात्र ठरले असुन  634 अर्ज अपात्र आहेत. या पात्र/अपात्र ठरलेल्या  लाभार्थ्यांची यादी जिल्हा  परिषद , अकोला यांचे   www.z.p. akola.nic.in या संकेतस्थळावर तसेच संबं धि त तालु क्या तील पं.स मुख्यालयी  व जि.प. कृषि विभाग  मुख्यालयी नोटीस बोर्डावर अवलोकनार्थ प्रसिध्द करण्यात आली आहे , असे जिल्हा परिषद अकोला प्रशासनातर्फे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, अकोला यांनी कळविले आहे.

डॉ.आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना: ५ ऑगस्टपासून पं.स.स्तरावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारणार

वृत् अकोला,दि.30 (जिमाका)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि   क्रांती   योजनेतंर्गत सन 2019-20   मध्ये राबविण्यासाठी शासनाने दिलेल्या   मान्यतेनुसार पंचायत समितीस्तरावर   नविन विहीर   व इतर   बाबी करीता   ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. कृषि आयुक्तालय   पुणे   स्तरावरून   सदर योजने करीता ऑनलाईन   प्रणाली   विकसीत   करण्यात आली आहे. योजने अंतर्गत अर्ज संबंधीत अर्जदारांकडुन ऑनलाईन अर्ज भरण्याची   अं ति म   मुदत , साईट सुरू झाल्यापासुन    एक महिन्या पर्यंत देण्या त आली आहे. या योजने अंत र्गत   अर्ज कर ण्या स इच्छुक   लाभार्थ्यांनी   पंचायत समितीस्तरावरील कृषि अधिकारी (विघयो) यांचेशी संपर्क   साधून सोमवार दि. 5 ऑगष्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन   अर्ज सादर करावयाचा आहे. ऑनलाईन   अर्ज   करणेसाठी   www.agriwell.mahaonline.gov.in   या   संकेतस्थळावर नविन युजर येथे नोंदणी करून संपुर्ण माहिती व आवश्यक दस्तावेज अपलोड करावे . ऑनलाईन भरलेल्या   अर्जाची प्रिंट काढुन त्याव र अर्जदाराने   स्वाक्षरी करावी व ऑनलाईन   जोडलेले सर्व मुळ दस्तावेज पंचाय

वाशिम येथे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची गुरुवारी (दि.1ऑगस्ट) सुनावणी

अकोला,दि.29(जिमाका)- बालकांच्या अधिकारांच्या उल्लंघनाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी गुरुवार दि. 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची सुनावणी वाशिम येथे होणार आहे. या सुनावणीत अकोला जिल्ह्यातील बाल हक्क उल्लंघनाच्या तक्रारीही संबंधितांना दाखल करता येणार आहेत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी योगेश जवादे  यांनी केले आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या खंडपिठाद्वारे आयोजित या सुनावणीत बालहक्क उल्लंघनाची   तक्रार पालक, बालक, आई वडील, काळजीवाहक वा अन्य कोणीही व्यक्ती दाखल करु शकते. यात प्रामुख्याने बालकामगार, त्रासात असलेली बालके,   बाल न्याय किंवा दुर्लक्षित , दिव्यांग, विशेष बालके यांची काळजी, भिक्षावृत्ती, बालकांचे गैरवर्तन,   बालकांची काळजी घेणाऱ्या संस्था, बालकांची खरेदी विक्री, बालकांचे मृत्यू,   अपहरण, माध्यमांद्वारे होणारे उल्लंघन, बालकांचे लैंगिक शोषण, बालकांचे आरोग्य या प्रकारच्या तक्रारी आयोगासमोर दाखल करता येऊ शकतील. सदर सुनावणी दि.1 ऑगस्ट रोजी   सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम   येथे होणार आहे. सुनावणीसाठी सकाळी 9 वाजेपासून नोंदणीस प्रारंभ हो