पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माहिती अधिकारी पदी रितेश भुयार रुजू

इमेज
अकोला,   दि . ३१   (जिमाका)- येथील जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी (वर्ग-२) या रिक्तपदावर रितेश भुयार यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली असून ते कार्यालयात रुजू झाले आहेत. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयातील माहिती सहायक सतिश बगमारे , दूरमुद्रक चालक सचिन गजभिये , विश्वनाथ मेरकर , गजानन इंगोले , हबीब शेख , मंदार कुलकर्णी आदी उपस्थित होते.              रितेश भुयार हे नवी दिल्ली येथील महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र येथे गेली नऊ वर्ष उपसंपादक यापदावर कार्यरत होते. त्यांची पदोन्नतीने माहिती अधिकारी (वर्ग २) या पदावर अकोला येथे नियुक्ती झाली आहे. त्यां नी यापूर्वी   दिल्लीत हिंदुस्थान समाचार (वृत्तसंस्था), दै.पुढारी, आकाशवाणी आणि माहिती व नभोवाणी मंत्रालयांतर्गत कार्यरत इलेक्ट्रॉनीक मिडीया मॉनिटरींग सेंटर येथे कार्य केले आहे. तसेच पुणे येथे   दै.जनमन, हिंदुस्थान समाचार   आणि   जनवार्ता   ( स्थानिक वृत्त वाहिनी)मध्येही कार्य केले आहे. 0000

कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’ पॉझिटीव्ह, एक डिस्चार्ज

  अकोला दि. 31 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 26 अहवाल प्राप्त झाले.   त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर एक डिस्चार्ज देण्यात आला ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0 )0+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0 = एकूण पॉझिटीव्ह 0 . आरटीपीसीआर ‘निरंक’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. एक डि स्चार्ज आज दिवसभरात एक रुग्णां ला डिस्चार्ज देण्यात आला , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. सक्रिय रुग्ण ‘पाच’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 659 78 (498 45 +15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाच सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील एक   रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर चार जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती  

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
अकोला,   दि . ३१   (जिमाका)-      जिल्हा प्रशासन,    जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी    यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय एकता दौडला युवक युवती व नागरीकांचा उत्‍स्फुर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात येते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्य हस्ते हिरवी झेंडी दाखवून दौडचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्प्लवार , क्रीडा प्रबोधनीचे प्राचार्य सतिशचंद्र भट, मनपाचे नगर सचिव अनिल बिडवे, नेहरु युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक उदय देशमुख, क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडियम   येथून या दौडला सुरुवात झाली तेथून अग्रसेन चौक मार्गे प्रमुख मार्गांवरुन   वसंत देसाई स्टेडियम येथे समारोप करण्यात आला. या दौडमध्ये अधिकारी कर्मचारी स्थानिक विद्यालय, शारिरीक शिक्षण शिक्षक, विविध सं

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ आणि ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा

इमेज
अकोला,दि.३१(जिमाका)- देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ व देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी  यांची पुण्यतिथी ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला.       येथील लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे,सदाशिव शेलार यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.       उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे यांनी यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. ०००००  

राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभागी व्हा; वसंत देसाई स्टेडियम येथे सोमवारी(दि.31) आयोजन

  अकोला ,   दि . 30   ( जिमाका)-      क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनाच्या विद्यमाने     सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी दि. 31 रोजी स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे सकाळी साडेसात वाजता राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमध्ये  अकोला शहर व जिल्ह्यातील    अधिकारी कर्मचारी स्थानिक विद्यालय    व महाविद्यालयातील स्काऊट , गाईड , एन.सी.सी. व एन.एस.एस पथकातील विद्यार्थी , शारीरीक शिक्षण शिक्षक , विविध संघटनेचे पदाधिकारी , युवक-युवती , खेळाडू , नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्प्लवार यांनी केले. 00000

कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘दोन’ पॉझिटीव्ह, एक डिस्चार्ज

  अकोला दि. 30 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 54 अहवाल प्राप्त झाले.   त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर एक डिस्चार्ज देण्यात आला ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 2 व खाजगी 0 )2+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0 = एकूण पॉझिटीव्ह 2 . आरटीपीसीआर ‘दोन’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महि लांचा समावेश असून हे रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. एक डि स्चार्ज आज दिवसभरात एक रुग्णां ला डिस्चार्ज देण्यात आला , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. सक्रिय रुग्ण ‘ सहा ’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 659 78 (498 45 +15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील एक   रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत

कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘दोन’ पॉझिटीव्ह, तीन डिस्चार्ज

  अकोला दि.29 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 75 अहवाल प्राप्त झाले.   त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर तिघां ना डिस्चार्ज देण्यात आला ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 2 व खाजगी 0 )2+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0 = एकूण पॉझिटीव्ह 2 . आरटीपीसीआर ‘दोन’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुषाचा समावेश असून हे रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. तीन डि स्चार्ज आज दिवसभरात तीन रुग्णां ला डिस्चार्ज देण्यात आला , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. सक्रिय रुग्ण ‘पाच’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 659 76 (498 43 +15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाच सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील एक   रुग्ण उपचार

बालगृहातील 105 बालकांना आकाश दिवे बनविण्याचे प्रशिक्षण

इमेज
अकोला,दि.28(जिमाका)-   जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड लाईन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने बालगृहातील 105 बालकांना आकाश ‍दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.             जिल्ह्यात महिला व बालविकास विभागांतर्गत मान्यता प्राप्त बालगृहांमधील प्रवेशीतांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता   बालगृहातील 105 बालकांना   आकाश दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्याण बालकांनी तयार केलेले 25 आकाश दिवे   बालगृहामध्ये सजविण्यात आले. अकोला ‍जिल्ह्यात हे प्रशिक्षण सुर्योदय बालगृह व गायत्री बालीकाश्रम व शासकीय बालगृह या ठीकाणी देण्यात आले. या प्रशिक्षणाचे नियोजन ‍ महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडूलकर, जिल्हा परीवीक्षा अधिकारी गिरीश पुसदकर, चाईल्ड लाइनच्या समन्वयक हर्षाली गजभीये आदिंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 000000

राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाकरीता अर्ज मागविले

अकोला,दि.28(जिमाका)-   जनजाती गौरव दिनाचे(दि.15)औचित्य साधून आदिवासी विकास विभागाव्दारे       दि. 15 ते 18 नोव्हेंबर, या कालावधीत नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.   या महोत्सवामध्ये राज्यस्तरीय आदिवासी पारंपारिक हस्तकला प्रदर्शन व विक्री, पारंपारिक खाद्य महोत्सव, पारंपारिक नृत्य स्पर्धा आणि लघुपट/माहितीपट इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील आदिवासी बांधव व बचत गटानी मंगळवार दि.1 नोव्हेंबर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज करावा. तसेच उपक्रमासंबंधीत अधिक माहिती व आवेदन अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल भवन, न्यु. राधाकिसन प्लॉट, अग्रसेन भवन, अकोला येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी आदिवासी बांधव व आदिवासी बचत गटानी आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी(विकास) मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे. 000000

कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘एक’ पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज

  अकोला दि.28 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 51 अहवाल प्राप्त झाले.   त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोघां ना डिस्चार्ज देण्यात आला ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी 0 )1+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0 = एकूण पॉझिटीव्ह 1 . आरटीपीसीआर ‘एक’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका पुरुषाचा समावेश असून हा रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. दोन डि स्चार्ज आज दिवसभरात दोन रुग्णां ला डिस्चार्ज देण्यात आला , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. सक्रिय रुग्ण ‘सहा’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 659 74 (498 41 +15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील एक   रुग्ण उपचारासाठी दाखल आहे

जिल्हाधिकारी यांना भेटण्याच्या वेळेत बदल; अभ्यागतांना दररोज दुपारी 12 ते 1 दरम्यान भेटता येणार

             अकोला,दि.28(जिमाका)-   जिल्हाधिकारी यांना अभ्यागत व शेतकऱ्यांनी भेटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.यानुसार कामकाजी दिवसांमध्ये दररोज दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान अभ्यागतांना भेटण्याची तर शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत भेटण्याची वेळ आठवडयाच्या प्रत्येक सोमवारी   सकाळी १०.३० वाजता करण्यात आली आहे. अभ्यागत व शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेल्या   वेळेतच जिल्हाधिकाऱ्यांची   भेट घ्यावी, अशी माहिती   जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे. आता सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान अभ्यागतांना भेटता येणार आहे. तर, शेतकऱ्यांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर सोमवारी सकाळी १०.३० वाजताची वेळ निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी, सामान्य नागरिकांचे निवेदन, अडचणी व समस्यांचे निराकरण करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सोमवार आणि शुक्रवारी दुपारी 4 ते 5 वाजे दरम्यानची वेळ निश्चित करण्यात आली होती. बदललेल्या वेळेनुसार कृषी विभागासंबधीत ‘ प्रधानमंत्री पिक विमा योजना’ ,  ‘ हवामान आधारित फळपिक विमा योजना’ ,  ‘   प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ ,   पिक कर्ज ,  

गांधीग्राम पूलावरुन पायदळ वाहतूकीस सशर्त परवानगी

       अकोला दि.27(जिमाका)-   गांधीग्राम येथील जुन्‍या पुलाला तडा गेल्‍यामुळे त्‍यावरील वाहतूक संपुर्णपणे बंद करण्यात आली होती. या संदर्भात आज आढावा बैठकीत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांनी प्रस्तावित केल्यानुसार अकोट रोडवरील गांधीग्रामजवळील पुर्णा नदीवरील पुलावरून 15-20 लोकांना टप्प्या टप्‍याने केवळ पायी चालण्याच्या वाहतुकीस पाच दिवसाकरीता अटीशर्तीसह सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज निर्गमित केले आहेत. आदेशात म्हटल्याप्रमाणे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम अकोला यांनी कठडे लावून बॅरेकॅटींग करावी. वाहतुक यंत्रणा सुरळीत करण्‍यासाठी पोलीस विभागाकडुन पुरेसा पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात येईल. तसेच कार्यकारी अभियंता यांनी पुलाचे दररोज निरीक्षण करुन तसा अहवाल चार दिवसात सादर करावा, असे आदेशाव्दारे कळविण्यात आले आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 00000

कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’ पॉझिटीव्ह, तीन डिस्चार्ज

  अकोला दि.27 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) दोन अहवाल प्राप्त झाले.   त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर तिघां ना डिस्चार्ज देण्यात आला ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0 ) 0 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0 = एकूण पॉझिटीव्ह 0 . आरटीपीसीआर ‘ निरंक ’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. तीन डि स्चार्ज आज दिवसभरात तीन रुग्णां ला डिस्चार्ज देण्यात आला , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. सक्रिय रुग्ण ‘सात’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 659 73 (498 40 +15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सात सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील एक   रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर सहा जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत,

कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘दोन’ पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज

    अकोला दि.2 6 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 67 अहवाल प्राप्त झाले.   त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 2 व खाजगी 0 ) 2 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0 = एकूण पॉझिटीव्ह 2 . आरटीपीसीआर ‘ दोन ’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला . त्यात दोन महिलांचा समावेश असून हे सर्व रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. दोन डि स्चार्ज आज दिवसभरात दोन रुग्णां ला डिस्चार्ज देण्यात आला , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. सक्रिय रुग्ण ‘1 0 ’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 659 73 (498 40 +15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 0 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील द