रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1691 चाचण्यात 223 पॉझिटीव्ह

 

 अकोला,दि.2 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.1) दिवसभरात झालेल्या 1691 चाचण्या झाल्या त्यात 223 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

  काल दिवसभरात अकोला येथे 12 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  अकोट येथे 157 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बाळापूर येथे 27 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी येथे तीन चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, पातूर येथे 22 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 73 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 92  चाचण्या झाल्या त्यात 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 1121 चाचण्या झाल्या त्यात 103  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 37 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 48 चाचण्या झाल्या त्यात 22 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 83  चाचण्या झाल्या त्यात 34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 16  चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1691 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 223 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 12  हजार 516 चाचण्या झाल्या पैकी 9385 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन