पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मतदार पडताळणी कार्यक्रमामध्‍ये सर्वांनी सहभागी व्‍हावे

अकोला , दि . ३१ ( जिमाका )- दिनांक 1 जानेवारी, 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांना आणि नवीन मतदार म्हणून पात्र असलेल्या मतदारांना संधी देण्यासाठी दिनांक 01.01.2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम  तसेच मतदार यादीमध्ये मृत/स्थलांतरित मतदाराची नावे असल्याबाबत अनेक तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत आणि यामुळे मोहिम रूपाने सर्व मतदारांचा तपशील व छायाचित्रे दुरुस्त व प्रमाणित करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार आयोगाने सन 2020 च्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमापूर्वी पूर्वतयारी म्हणुन मतदार पडताळणी कार्यक्रम ( EVP ) घेणेबाबत निर्देश दिलेले आहेत.                            त्‍याअनुषंगाने मतदार पडताळणी EVP कार्यक्रमामध्ये , नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन  खालील  कागदपत्रांपैकी एका कागदपत्राची प्रत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांचेकडे देऊन त्यांच्या सध्या असलेल्या मतदार तपशीलांचे प्रमाणिकरण याव्‍दारे अकोला जि

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन

  यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सध्याही जमीनीत ओल आहे , त्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे. काही ठिकाणी फुलोऱ्यावर तर काही ठिकाणी शेंगा धरलेल्या आहेत. शेतकरी बंधुना तूर पिकापासुन चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.मात्र मागील दोन-तीन दिवसापासुन असणारे ढगाळ वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. अश्या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांपासुन नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवशक आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये खालील प्रकारच्या अळ्यांचा समावेश होतो. शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा):- या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या , फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३०ते ४० मि.मि. लांब पोपटी रंगाची असून पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठया अळया शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात. पिसारी पतंग:- या पतंगाची अळी १२.५ मि.मि.लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म क

अतिवृष्टी, गारपीटीचा इशारा

अकोला , दि . ३१ ( जिमाका )-   भारतीय हवामान विभाग नागपुर यांनी दिलेल्या संदेशानुसार आज (दि. ३१डिसेंबर २०१९) ते शुक्रवार, दि.३ जानेवारी २०२० दरम्यान विदर्भातील सर्व   जिल्ह्यात पाऊस , वीज पडणे , अतिवृष्टी , गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.   या इशाऱ्यानुसार जिल्ह्यातील क्षेत्रिय यंत्रणांनी योग्य ती दक्षता   घ्यावी व आपापल्या मुख्यालयी उपस्थित राहावे , असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. ०००००

बालगृह, शिशुगृहातील बालकांची आरोग्‍य तपासणी

अकोला , दि .30( जिमाका )- जिल्हा माहिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत बालगृह व शिशुगृहातील बालकांची  आरोग्य तपासणी  शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या  चमुने गुरूवार              दि.26 रोजी केली. जिल्हा माहिला   व बालविकास विभागांतर्गत अकोला जिल्ह्यात 4 बालगृहे   व 1 शिशुगृह कार्यरत असुन   काळजी व संरक्षणाची   गरज असणारी 135 बालके निवासी आहे.   गरूवार दि. 26 रोजी   शासकीय बालगृह व निरीक्षण गृह,   गायत्री बालिकाश्रम, उत्कर्ष शिशुगृह येथील   बालकांची   शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील डॉक्टरांच्या चमुने आरोग्य तपासणी केली व बालकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या वैद्यकीय पथकामध्ये   बालरोग तज्ञ, डॉ. सैयद सर ,दंतरोगतज्ञ डॉ. पुजा घारोळे ,स्त्रीरोग तज्ञ डॉ.हर्षा कारोडे, डॉ. आर्या बर्वे ,जनऔषधवैद्यक तज्ञ, डॉ. राजवर्धन गवई व इतर सहायक डॉक्टर होते शासकीय बालगृहात   21 बालके गायत्री बालिकाश्रमा मध्ये 65 बालिकांची व उत्कर्ष शिशुगृहात 18 बालकांची   आरोग्य तपासणी करण्यात आली आरोग्य तपासणीच्या वेळी शासकीय बालगहांचे अधिक्षक   झुंबर जाधव, गायत्री बालिकाश्रमाच्या   अधिक्षीका

शिक्षक मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

अकोला , दि .30( जिमाका )- अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघातील अंतिम मतदार यादी  आज (सोमवार, दि. 30) पासुन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, तसेच  जिल्ह्यातील सर्व तहसिल , उपविभागीय कार्यालये येथील सुचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिक्षक मतदार संघाच्या मतदारांनी  याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन  शिक्षक मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी  अधिकारी तथा जिल्हाधिकारी अकोला जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. या संदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेली माहिती अशी की, मा. भारत निवडणूक आयोगाने दि. 1 नोव्हेंबर 2019   या अर्हता   दिनांकावर   आधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणीच्या कार्यक्रम घोषित   केला होता. या कार्यक्रमा अंतर्गत प्राप्त   दावे व हरकती नुसार प्राप्त दि. 23 नोव्हेंबर   रोजी प्रारूप   मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली होती. त्या नंतर पुन्हा दि. 23 नोव्हेंबर ते दि.9 डिसेंबर   या कालावधीमध्ये प्राप्त झालेले दावे व हरकती   निकाली काढून अंतिम मतदार यादी आज (सोमवार, दि. 30 रोजी ) जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील नोटीस बोर्डावर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालय ,

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जानेवारी महिन्यातील तालुकास्तरीय शिबीर रद्द

अकोला , दि . 30   ( जिमाका )-   मोटारवाहन निरिक्षक यांच्या मार्फत मोटार वाहन नोंदणी तपासणी वाहन चालक   अनूज्ञप्ती इत्यादी कामकाजासाठी तालुकास्तरावर शिबिर आयोजित करण्यात येतात. त्याचा माहे जानेवारी ते जुन 2020 साठी शिबिरांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये होणारे दि. 6 जानेवारी व 7 जानेवारी 2020 तेल्हारा येथील मासिक दौरे निवडणुक जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या आचार संहितेमुळे रद्द करण्यात आले आहेत, याची नोंद घ्यावी,असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार यांनी केले आहे. 00000

मनमानी प्रवास भाडेवाढी विरोधात तक्रार करण्याचे आवाहन

अकोला , दि .30( जिमाका )- गर्दीच्या हंगामाचा गैरफायदा घेऊन खाजगी बस वाहतुकदारांनी प्रवाशांकडून शासनाने निर्धारीत केलेल्या दरांपेक्षा अधिक भाडे आकारुन मनमानी केल्यास त्याबद्दल प्रवाशांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करावी,असे आवाहन  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.   महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या सवंर्गासाठी संपुर्ण बससाठी   येणाऱ्या प्रति कि.मी. भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही,असे कमाल   भाडेदर शासनाने दि. 27 एप्रिल 2019 रोजी   शासन   निर्णय जारी करून निश्चित केले आहेत. तथापि, गर्दीच्या हंगामात खाजगी बस मालकाकडुन निर्धारित भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन   कार्यालयाच्या   वतीने भरारी पथके तयार करुन त्यामार्फत वेळोवेळी   तपासणी करुन खातरजमा करण्यात येते. जे खाजगी वाहतुकदार निर्धारित दरापेक्षा अधिक   दर आकारतील त्यांच्यावर   कडक कारवाई करण्यात येईल. तरी खाजगी वाहतु

नाताळ व नववर्ष निमित्य किरकोळ मद्यविक्री दुकानाचे वेळापत्रक

अकोला , दि . 24 ( जिमाका )-    नाताळ -2019 नववर्ष -2020 आगमनाचे नमित्याने जिल्ह्यातील सर्व एफएल-2, एफएल- 3, एफएल-4, एफएलबिअर-2 व सीएल-3 किरकोळ   मद्यविक्री अनुज्ञप्त्या अधीक कालावधीकरीता खालील नमुद केलेल्या वेळेत सुरू ठेवण्यास महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 139 (1)(सी) व कलम 143 (2)(एच-1) (4) अन्वये शासनाने मान्यता दिलेलेली आहे. खालीलप्रमाणे   जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या अधीक कालावधीकरीता सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. अनुज्ञप्तीचा प्रकार- एफएल-2 विदेशीमद्य किरकोळ विक्रीचे दुकान एफएलबिआर-2 (बिअर शॉपी) दिनांक- 25 डिसेंबर   व 31 डिसेंबर 2019, शिथिल करावयाचा कालावधी- रात्री22.30 ते दुस-या   दिवशी पहाटे 1.00 वाजेपर्यंत, अनुज्ञप्तीचा प्रकार-एफएल-3 परवानाकक्ष अनुज्ञप्ती) एफएल -4 (क्लब अनुज्ञप्ती) सीएल-3 (देशीदारू विक्री दुकाने), दिनांक 25 डिसेंबर   व 31 डिसेंबर 2019, शिथिल करावयाचा कालावधी- रात्री 23.00 ते दुस-या दिवशी पहाटे 5.00   वाजेपर्यंत. तरी वरील प्रमाणे अनुज्ञप्तीच्या वेळेत सोबत देण्यात येत असल्याची सर्व संबधीत अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अकोला

भेसळयुक्त,बनावट व अवैध मद्यविक्री ची तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक

अकोला , दि . 24 ( जिमाका )-   वर्षाअखेर (३१ डिसेंबर) निमित्त होणारी संभाव्य मद्यविक्री व उलाढाल पाहता भेसळयुक्त व बनावट मद्य विक्रीला आळा घालण्यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांकावर थेट तक्रार नोंदविता येणार आहे. बनावट,अवैध मद्य विक्रीबाबत कुणाला काहीही माहिती असल्यास , तक्रार नोंदविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या   18008333333 हा टोल फ्री क्रमांक आणि 8422001133 या व्हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क   विभागाच्याबअकोला जिल्हा अधीक्षक स्नेहा सराफ यांनी केले आहे.                                                           00000

सार्वजनिक वितरण व्यवस्था माहे जानेवारीचे अन्न धान्य परिमाण व नियतन

अकोला , दि .23( जिमाका )-   जिल्ह्यात जानेवारी 2020 या महिन्यासाठीसार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करावयाचे  अन्नधान्य  परिमाण व नियतन शासनाने निश्चित करुन दिले आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा शाखेकडून प्राप्त माहिती याप्रमाणे- वाटप परिमाण- लक्षनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत   अन्न-धान्य , नियंत्रिक साखर इ. जिवनावश्यक   वस्तूंचे वाटप परिणाम व दर जिल्हा पुरवठा शाखेने   शासनाच्या निर्देशानुसार निश्चित केले आहेत. ते याप्रमाणे- १) प्राधान्य गट गहू- प्रतिव्यक्ती   तीन किलो (दर प्रति किलो दोन रुपये) २) प्राधान्य गट तांदूळ- प्रतिव्यक्ती दोन किलो(प्रति किलो तीन रुपये) ३) अंत्योदय योजना गहू- प्रति कार्ड 15 किलो ( प्रति किलो दोन रुपये) ४) अंत्योदय योजना तांदूळ- प्रति कार्ड 20 किलो (प्रति किलो तीन रुपये) ५) एपीएल शेतकरी कुटूंबाकरीता गहू- प्रति व्यक्ती चार किलो (प्रति किलो दोन रुपये) ६) एपीएल शेतकरी कुटूंबाकरीता तांदूळ-   प्रति व्यक्ती एक किलो (प्रति किलो तीन रुपये) ७) अन्नपूर्णा योजना- प्रतिकार्ड पाच किलो गहू व तांदूळ प्रति कार्ड (मोफत) ८) नियंत्रित साखर अंत

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक प्रचाराच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

अकोला , दि . 23 ( जिमाका )-   जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी करणा-या उमेदवारांना आपल्या निवडणुक   प्रचाराच्या जाहिराती प्रसारित करण्यापुर्वी प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय  माध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणीकरण समितीकडे अर्ज करावा; असे आवाहन जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी केले आहे. या संदर्भात आज येथील लोकशाही सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक संदर्भात पेड न्युज समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याबैठकीला   निवासी उपजिल्हाधिकारी   संजय खडसे व माध्यम सनियंत्रण   व जाहिरात   प्रमाणिकरण समितीचे सदस्य   उपस्थित होते.   उमेदवारांनी किंवा पक्षाव्दारे टेलिव्हीजन किंवा रेडिओवर   प्रसारीत होणा-या   कोणतीही जाहिराती प्रसारीत करण्यापुर्वी    प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे.   प्रस्तावित जाहिरात   तयार करण्यासाठी आलेला खर्च , प्रसारीत करण्यासाठी येणारा खर्च, जाहिरात कोणत्या उमेदवारांसाठी / पक्षासाठी देण्यात येणार आहे आदि माहिती जाहिरात प्रमाणीत करण्याच्या अर्जामध्ये नमुद करावी. तसेच

मुस्लीम संघटनेच्या मेळाव्या निमित्य शहरातील वाहतुकीत बदल

अकोला , दि . 21 ( जिमाका )-   जिल्हृयातील सर्व मुस्लीम संघटनेच्या वतीने रविवार दि. 22 रोजी  सकळी  9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यामध्ये जिल्हयातील विविध मुस्लीम संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते नागरीक  तसेच कॉग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जवळपास  50 हजार जनसमुदाय सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्ट्रीने  वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.   दि.22     रोजी   सकाळी   9   वा. पासून ते     दुपारी 2 वाजेपर्यंत अकोला शहरातील व अकोला – अकोट राज्य महामार्गावरील जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहने पर्यायी मार्गाने   वळविण्यात आले आहे.   असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.          अ . क्र . सध्‍या   सुरु असलेला मार्ग अ . क्र . पर्यायी मार्ग १ अकोट रोड कडुन आपातापा चौक – रेल्वेस्टेशन चौक- अग्रेसन चौक- टॉवर चौक- धिंग्रा चौक- अशोक वाटीका चौक- नेहरू चौक- अमरावती