रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1522 चाचण्यात 172 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 6 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.5) दिवसभरात झालेल्या 1522 चाचण्या झाल्या त्यात 172 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला
येथे 14 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह
आले, अकोट येथे 10 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे 22 चाचण्या
झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी येथे तीन चाचण्या झाल्या त्यात
एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, पातूर येथे 62 चाचण्या झाल्या
त्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तेल्हारा येथे 66 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, मुर्तिजापूर येथे 184 चाचण्या झाल्या त्यात 20
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला
महानगरपालिका येथे 910 चाचण्या झाल्या त्यात 57 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 20 चाचण्या झाल्या त्यात एकाचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 101 चाचण्या झाल्या त्यात 32
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 109 चाचण्या
झाल्या त्यात 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 21 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे 1522 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 172 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 18 हजार 836
चाचण्या झाल्या पैकी 10127 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा