रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 1605 चाचण्यात 75 पॉझिटीव्ह
अकोला,दि.29 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.28) दिवसभरात झालेल्या 1605 चाचण्या झाल्या त्यात 75 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट येथे 88 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, बाळापूर येथे पाच चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बार्शीटाकळी येथे
एक चाचणी झाली त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, पातर येथे 25 चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा
येथे 52 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर
येथे 169 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका
येथे 1117 चाचण्या झाल्या त्यात 11
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात 48 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, हेगडेवार लॅब येथे 61 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला आयएमए येथे नऊ, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 30 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1605
जणांच्या चाचण्या होऊन त्यात 75 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 52 हजार 362 चाचण्या झाल्या
पैकी 13649 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा
रुग्णालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा