पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष लेखः- कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन

अकोला , दि . 30 ( जिमाका )- सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 29 ते 30 से . तापमान असतांना सामान्यत : गुलावी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो . परंतु यावर्षी पावसाचा हंगाम वाढल्यामुळे व वरील पोषक वातावरण सध्या असल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधून बाहेर येत आहेत . हीच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही . मात्र सध्या कोषातून बाहेर निघालेल्या पतंगांचे मिलन होऊन त्यांनी अंडी टाकल्यांनतर 8 ते 10 दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव ज्या कपाशीला हिरवी बोंडे व पात्या आहेत अशा ठिकाणी दिसून येण्याची शक्यता आहे . या पार्श्वभूमीवर शेतकरी बंधुनी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे . कापूस पिकात त्वरीत किमान दोन फेरोमन सापळे ला वू न त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली /10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी . बोंडे / पात्या / फुले यामध्ये प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यापर्यंत आढळून आल्यास

सोमवारपासून मातृवंदना सप्ताह

अकोला , दि . ३० ( जिमाका )- जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये येत्या सोमवारी म्हणजेच दोन ते आठ डिसेंबर पर्यंत मातृवंदना सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री मातृवंदना  योजनेअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.२ पासून या सप्ताहास प्रारंभ होत आहे. ‘सुपोषित जननी   विकसित धारिणी’ हे घोषवाक्य   या सप्ताहात असणार आहे. याबाबत सप्ताहभर जनजागृती करण्यात येणार असून   आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन नवीन पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरुन घेतील.   लाभार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, बॅंक खाते काढणे या साठी विशेष शिबिर आयोजित केले जातील. आरोग्य पोषण, स्वच्छता याबाबत तज्ज्ञांचे व्याख्याने आयोजित करणे,   करेक्शन क्यु कमी करण्या करीता विशेष मोहिम, दुसऱ्या तिसऱ्या हप्त्याकरीता पात्र लाभार्थींना त्वरीत लाभ देण्याची प्रक्रिया इ. उपक्रम राबविण्यात येणार आहे,असे   जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी महा- वॉकेथॉन

अकोला , दि . ३० ( जिमाका )- रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी  शहरात महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेस महापौर अर्चनाताई मसने , प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर,  सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी  गोपाल वरोकार आदी मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. हुतात्मा चौक येथून या वॉकेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली.   या स्पर्धेत   नवोदय विद्यालय, अकोला, सुप्फा इंग्लिश स्कूल,   गणेश कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा विषयक बॅनर्स प्रदर्शित करुन जनजागृती केली. यावेळी   सुप्फा फाऊंडेशनचे अध्यक्ष   मोहम्मद फाजिल मोहम्मद अब्दुल रज्जाक, प्राचार्य अब्दुल   साबिर अब्दुल कादीर, डॉ. के. व्ही . मेहरे, डॉ. व्ही. यु. जामनिक   यांचीही उपस्थिती होती.

ई-पॉस द्वारे धान्यवितरण; ८४ टक्के शिधापत्रिकाधारकांना मिळतोय लाभ :उर्वरित शिधापत्रिकांची तात्काळ ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

अकोला , दि . ३० ( जिमाका )- जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानात  ई-पॉस मशिन्स बसविण्यात आल्या असून त्याद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून पात्र लाभार्थ्यांनाच निश्चित अन्नधान्याचा लाभ मिळत आहे. एकूण शिधापत्रिकाधारकांपैकी ८४ टक्के शिधापत्रिकाधारक सध्या ऑनलाईन नोंदणी झालेल्या शिधापत्रिकेद्वारे धान्य घेत आहेत. अद्यापही उर्वरित शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिका तात्काळ ऑनलाईन नोंदणी करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने रास्तभाव दुकानदारांना केले आहे. जिल्ह्यात २ लाख ९४ हजार ४२९   शिधापत्रिकाधारक ऑनलाईन नोंदणी झाले आहेत.   या शिधापत्रिकावर सदस्य संख्या तब्बल १७ लाख ३० हजार ६७० इतकी आहे. यातील ६ लाख ७१ हजार ४८७ लोइकांचे आधार सिडींग झाले आहे.    त्यातील   दोन लाख ५० हजार ७५ शिधापत्रिकाधारक प्रत्यक्ष धान्य वितरणाचा लाभ घेत आहेत. असे एकूण ८४.९३ टक्के लोक या सुविधेचा लाभ घेत आहेत. तरी अकोला जि ल्ह्या तील सर्व रास्त्भाव दुकानदारां नी, ज्या शिधापत्रिकाधारकांची अ द्या पही Online नोंदणी झालेली नाही अशा सर्व सदस्यांचे आधार कार्ड , मोबाईल क्रमांक , बॅकपासबुक व असल्यास गॅस बुक ही कागदपत्रे तहसिल

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधान व राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताह :असंघटीत क्षेत्रातील कामगारांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

इमेज
अकोला , दि . 30 ( जिमाका ) -    केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालय मार्फत असंघटीत कामगारांकरीता   प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व   राष्ट्रीय   पेन्शन योजना – लघु व्यापारी योजना 12 सप्टेंबर 2019 पासुन सुरू करण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान पेन्शन   योजना सप्ताह साजरा करण्यात येत आहे. तरी या सप्ताहात असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन   प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर   यांनी केले आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीस   निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे , सहाय्यक कामगार आयुक्त आर. डी. गुल्हाने ,   महिला व बालविकास अधिकारी योगेश जवादे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. असंघटीत कामगारांची नोंदणी   नागरी सुविधा केंद्रामार्फत (CSC) मार्फत स्वयंघोषणेच्या आधारे करण्यात येईल. 18 ते 40 वयोगटातील लाभार्थ्यांनी   55 ते 200 रूपयापर्यंत प्रतिमहा अंशदान भरावे लागेल वयाची 60 वर्ष पुर्ण झाल्यावर दरमहा   3 हजार रूपये मानधान लाभार्थ्यांन

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव स्विकारणेबाबत

अकोला , दि . 29 ( जिमाका )-  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकामध्ये राखीव जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्यात यावा. यासाठी संबंधितांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था.पुणे यांचे संकेतस्थळ https://barti.maharashtra.gov.in अथवा ऑफ लाईन पध्दतीने विहित नमुन्यात  भरावा. अर्जासोबत महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग, जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन 2012. नियम 14 नुसार, निवडणूक प्रयोजनार्थ नमुना नं.3 व नमुना नं.21 मध्ये विहित केल्यानुसार शपथपत्र सादर करावे. तसेच नियम 16 नुसार जाती प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह जात प्रमाणपत्राची मुळ प्रत, प्राथमिक शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या किंवा इतर शाळा किंवा महाविदयालय सोडल्याच्या प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत. नातेवाईकांच्या प्राथमिक शाळा सोडल्याच्या किंवा महाविदयालय सोडल्याच्या प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत. ,अशिक्षित व्यक्ती, अशिक्षित पालक किंवा नातेव

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक जिल्हाधिका-यांनी घेतला तयारीचा आढावा

इमेज
          अकोला , दि . 29 ( जिमाका )-  जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत  समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत या बैठकीस अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी राजेश खवले, सर्व  उपविभागीय अधिकारी तसेच  नोडल अधिकारी आदि उपस्थित होते               यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी आचार संहिता अंमलबजावणी; त्या संदर्भात प्राप्त तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र उपलब्धता, कर्मचारी प्रशिक्षण , नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरण्याबाबत संभाव्य तांत्रिक अडचणींबाबत कायदा व सुव्यवस्था, वाहतुक व्यवस्था, मनुष्यबळ उपलब्धता, मतदार जनजागृती इ बाबींचा आढावा घेतला.                या संदर्भात सर्व यंत्रणांनी सजग राहुन आपापले निवडणुक कर्तव्य पार पाडावे.   राज्य निवडणुक आयोगामार्फत वेळोवेळी प्राप्त होणा-या सुचनांचे व निर्देशांचे अंमल करावा, असे   निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. 00000

जागतिक एड्स दिनानिमीत्य रविवारी रॅली

         अकोला , दि . 29 ( जिमाका )-  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वतीने  जागतिक एड्स दिनानिमीत्य  रविवार दि. 1 डिसेंबर रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सकाळी 8.30 वाजता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते  रॅलीचे सुरूवात होणार आहे. एड्स प्रतिबंधात्मक संदेश सामान्यापर्यंत पोहचविणे हे रॅलीचे  मुख्य उद्देश असुन या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले. 00000

ओबीसी महामंडळाच्या एक रकमी कर्ज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

         अकोला , दि . २९ ( जिमाका )- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ  मर्यादित यांच्या कडून एक रकमी कर्ज परतावा योजना राबविण्यात येते.  या योजनेत  या महामंडळाकडून  ज्या लाभार्थ्यांनी दीर्घ मुदत वा बीज भांडवल अशा योजनांमधून लाभ घेतला असून कर्जाच्या रकमेची परतफेड  दिलेल्या कालावधीत  केलेली नाही, अशा लाभार्थ्यांनी एक रकमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेअंतर्गत एक रकमी कर्ज परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेवर दोन टक्के सूट देण्यात येते.  ही योजना ठराविक कालावधीसाठी असून  संबंधितांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. ०००००

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना बॅंक खाते आधार संलग्न करा; नवीन नाव नोंदणीही सुरु जिल्हा प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन

         अकोला , दि . २९ ( जिमाका )- शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपले बॅंक खाते हे आधार संलग्न करावे तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नाव नोंदणी केलेली नसेल त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी,असे आवाहन  जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्र शासनाने   शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही विहित अटी व शर्ती निर्धारित करण्यात आल्या आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन टप्प्यात   प्रति कुटूंब वार्षिक सहा हजार रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.   या संदर्भात कृषि आयुक्त पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी   त्यांचा बॅंक खाते क्रमांक हा आधार क्रमांकाशी संलग्न करावा. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी केली नसेल त्यांनी आपल्या नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन   नाव नों

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता नववी प्रवेशचाचणी परीक्षा

         अकोला , दि . २७ ( जिमाका )- जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता नववी प्रवेशासाठी समांतर प्रवेश निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ८ फेब्रुवारी २०२० रोजी होणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी  नोंदणी करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन भरावयाचे आहेत. त्यासाठी नवोदय विद्यालय समितीने   या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी  १० डिसेंबर पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज दाखल करावे असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय बाभुळगाव जि. अकोला डी.बी. सुमन यांनी केले आहे. ०००००

सैनिकी शाळा चंद्रपुर अखिल भारतीय सैनिकी शाळेची प्रवेशपरिक्षा 5 जानेवारी रोजी

अकोला , दि . 27 ( जिमाका )- सैनिकी शाळा चंद्रपुर करिता शैक्षणिक सत्र   2020-21 साठी अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परिक्षा 5 जानेवारी 2020 रोजी होणार आहे . ही परिक्षा चंद्रपूर , नागपूर , अमरावती , नांदेड , औरंगाबाद येथे घेण्यात येणार आहे .   यासाठी 2 डिसेंबर   रोजी ॲडमिट कार्ड ( प्रवेशपत्र ) पाठविण्यात येणार आहे . या परिक्षेचा निकाल 3 ते 5 फेब्रूवारी 2020 दरम्यान प्रसि द्ध होणार आहे .   उ त्ती र्ण होणा ऱ्या विद्यार्थ्यां ची वैद्यकीय चाचणी 20   फेब्रूवारी ते 10 मार्च   2020 दरम्यान घेण्यात येईल . अधिक माहितीसाठी www.sainikschoolchandrapur.com या वेबसाईटवर संपर्क साधावा , असे सैनिकी शाळा चंद्रपुरचे प्राचार्य स्क्वार्डन लेफ्टनंट महेशकुमार यांनी कळविले आहे . 00000