कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या पुनवर्सनासाठी बाल कल्याण समितीकडे दाखल करावे
अकोला, दि.12 (जिमाका)- कोवीड -19 आजारामुळे
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे पालनपोषण, यथायोग्य
संरक्षण व संगोपनाच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक
आहे. अशा बालकांचा पुनर्वसनासाठी शोध घेऊन संबंधित तलसिलदार, गटविकास अधिकारी व
बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी केले.
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून
कोविड संसर्गामुळे पालकांना विलगीकरण किवा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केल्यामुळे
बालकांच्या पालनपोषणाच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच बालकांचे दोन्ही पालक
मृत्यू झालेले आहे अशा बालकांना बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमातंर्गत
पालनपोषण व संरक्षण करण्यात येतात. आई
किवा वडील तसेच दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाले असल्यास किवा कोरोनाची लागण झाली
असल्यास अशा 18 वर्षाखालील बालकांची तात्पुर्त्या व दिर्घकाळ स्वरुपाचे पुर्नवसनाकरीता
बाल कल्याण समितीकडे दाखल करावे. जेणे करुन अशा बालकांना बालगृहांमध्ये पुर्नवसन
करण्याता येईल.
जिल्हा व तालुकास्तरावर अशी बालके आढळून
आल्यास तहसिलदार, गटविकास अधिकारी, अंगणवाडी सेवीका, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस
पाटील यांनी बालकांचे शुभचिंतक या नात्याने चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री
क्रमांकावर किवा बालकल्याण समितीतील राजु लाडुलकर (9421464566), सौ.पाल्लवी
कुळकर्णी (9763288870), सुनिल लाडुलकर (9422064247), सुनिल साळूके (9764748675)
यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास
मरसाळे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा