कॉमन सर्व्हिस सेंटर व सनदी लेखापाल कार्यालय सुरु करण्यास सशर्त परवानगी
अकोला,दि. 4 (जिमाका)- शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निर्गमीत
करण्यात आलेल्या आदेश कायम ठेवून कॉमन सर्व्हिस सेंटर, सनदी लेखापाल व सराफा व्यापाऱ्यांना
दुकान उघडून तपासणी करण्याकरीता दि. 15
मेचे सकाळी सात वाजेपर्यंत सशर्त सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
निर्गमित केले आहे.
अकोला महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील शहरी व
ग्रामीण भागातील कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत,
सनदी लेखापाल यांचे कार्यालयांना सकाळी सात ते रात्री आठवाजेर्यंत तर सराफा व्यापाऱ्यांना
दुकान उघडून तपासणी करण्याकरीता गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मुभा
देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा