रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1831 चाचण्यात 234 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 4 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.3) दिवसभरात झालेल्या 1831 चाचण्या झाल्या त्यात 234 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा
रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला
येथे 44 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले, अकोट येथे 81 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बाळापूर येथे 41 चाचण्या
झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी येथे 13 चाचण्या झाल्या त्यात एकाचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, पातूर येथे 26 चाचण्या
झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, तेल्हारा येथे 88 चाचण्या झाल्या त्यात 12
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे
268 चाचण्या झाल्या त्यात 25 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 990 चाचण्या झाल्या त्यात 105 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,
अकोला आयएमए येथे 27 चाचण्या झाल्या त्यात पाच
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात 109 चाचण्या झाल्या त्यात 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 98
चाचण्या झाल्या त्यात 40 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 46 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,
असे 1831 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 234 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 15 हजार 535 चाचण्या झाल्या पैकी 9750 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा