कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’ पॉझिटिव्ह
अकोला दि.31(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 61 अहवाल प्राप्त झाले. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0 +रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 0. आरटीपीसीआर ‘निरंक’ आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सक्रिय रुग्ण ‘15’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66096(49963+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. ०००००