2413 अहवाल प्राप्त, 252 पॉझिटीव्ह, 521 डिस्चार्ज, नऊ मृत्यू
अकोला,दि.26(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 2413 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2161 अहवाल निगेटीव्ह तर 252
जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 521 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नऊ
जणांचा उपचारा
दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 78 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 54587(41051+13359+177)
झाली आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी
दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 252 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 78= एकूण
पॉझिटीव्ह- 330.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 260871 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 257835 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2646 नमुने
होते. आजपर्यंत एकूण 260788 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची
संख्या 219737 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
252 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 252 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात 98 महिला व 154 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-26, अकोट-31, बाळापूर-26, तेल्हारा-17, बार्शी
टाकळी-16, पातूर-21, अकोला-115. (अकोला ग्रामीण-23, अकोला मनपा क्षेत्र-92), दरम्यान काल (दि.25) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन
चाचण्यांच्या अहवालात 78 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण
संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
521 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 39, जिल्हा
स्त्री रुग्णालय येथील पाच, उपजिल्हा
रुग्णालय येथील तीन, आर्युवेदिक
महाविद्यालय येथील पाच, पीकेव्ही
येथील सहा,जिल्हा परिषद
कर्मचारी येथील तीन, हॉटेल
रिजेन्सी येथील पाच, बिहाडे
हॉस्पीटल येथील चार, युनिक
हॉस्पीटल येथील दोन, देवसार
हॉस्पीटल येथील दोन, देशमुख
हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल
स्कायलार्क येथील तीन, बबन
हॉस्पीटल येथील तीन, ठाकरे
हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, केअर
हॉस्पीटल येथील चार, आधार
हॉस्पीटल येथील तीन, गोयंका
हॉस्पीटल येथील तीन, फतेमा
हॉस्पीटल येथील तीन, इन्फीनीटी
हॉस्पीटल येथील दोन, क्रिस्टल
हॉस्पीटल येथील दोन, तर
होम आयसोलेशन मधील 420 असे एकूण 521 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.,अशी माहिती
जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
नऊ जणांचा
मृत्यू
दरम्यान आज दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यात खाजगी रुग्णालयातील दोन
जणांचा समावेश आहे.
चरणगाव ता. पातूर येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 20 रोजी दाखल
केले होते.
मोठी उमरी येथील 23 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 23 रोजी दाखल केले होते.
खेर्डा खु. ता.बार्शीटाकळी येथील 55 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.
24 रोजी दाखल केले होते.
चोहट्टा बाजार येथील 28 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले
होते.
संत कव्हर नगर, अकोला
भागातील 73 वर्षीय पुरुष असून या रुग्णास
दि. 24 रोजी दाखल केले होते.
काजळेश्वर ता.बार्शीटाकळी येथील 65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 22 रोजी
दाखल केले होते.
पातूर येथील 72 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 17 रोजी दाखल केले होते.
खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
अकोला येथील 52 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते.
मलकापूर येथील 56 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल केले होते,अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
5675
जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 54587(41051+13359+177) आहे. त्यात 1037 मृत झाले आहेत. तर 47875 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5675
जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा