पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोमवारी(दि.3) लोकशाही दिन

अकोला ,   दि.30(जिमाका)-    जिल्हास्तरीय लोकशाही दिन   व दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी दिव्यांग लोकशाही दिनांचे आयोजन सोमवार दि . 3 ऑक्टोंबर   रोजी दुपारी तीन वाजता लोकशाही सभागृह ,   जिल्हाधिकारी कार्यालय ,   अकोला येथे आयोजीत केले आहे ,   असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे   यांनी कळविले आहे . 00000

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२३: मतदार नोंदणी संदर्भात अधिकाऱ्यांची कार्यशाळा

इमेज
  अकोला ,   दि.३०(जिमाका)-   निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार   अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रम शनिवार दि.१ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. त्यासंदर्भात सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आली. या कार्यशाळेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, अभयसिंह मोहिते पाटील, डॉ. रामेश्वर पुरी तसेच सर्व तहसिलदार आदी उपस्थित होते. माहिती देण्यात आल्यानुसार मतदार नोंदणी कार्यक्रम या प्रमाणे- जाहीर सूचना प्रसिद्धी शनिवार     दि. १ ऑक्टोबरला होईल. प्रथम पुन:प्रसिद्धी शनिवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी, तर व्दितीय पुन:प्रसिद्धी मंगळवार, दि. २५ ऑक्टोबरला करण्यात येईल. दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम दिनांक सोमवार दि.७ नोव्हेंबर. हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई शनिवार, दि. १९ नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी बुधवार, दि. २३नोव्हेंबर रोजी करण्यात येईल.   दावे व हरकती स्वीक

प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी संस्थेची नेमणूक; प्रस्ताव मागविले

अकोला दि .30( जिमाका)-   प्राण्यांवर व पर्यावरणावर होणारे दुष्परीणाम पाहता कठोर कारवाई करण्याचे दृष्टीने 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या, नायलॉन मांजाचा वापर त्याचप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती यांची आयात, साठवणूक, उत्पादन, वितरण व विक्री आणि खरेदी / वापर करणाऱ्या प्रतिष्ठानांवर / व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याकरीता मानधन तत्वावर मन्युष्यबळ उपलब्ध असणाऱ्या संस्थेची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी दि.10 ऑक्टोंबर रोजी सकाळी 12 वाजता जिल्हाधिकारी यांचे दालन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आवश्यक सर्व कागदपत्रासह इच्छुक संस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. 000000

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत तीन पॉझिटीव्ह, सहा डिस्चार्ज

  अकोला दि. 30( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 78   अहवाल प्राप्त झाले.   त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला . तर सहा   जणांला   डिस्चार्ज देण्यात आला ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 3 व खाजगी 0)3+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   0= एकूण पॉझिटीव्ह 3 . आरटीपीसीआर ‘तीन’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.   त्यात दोन पुरुष व एक महि लेचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर येथील एक तर अकोला मनपा क्षेत्रातील दोन जण रहिवासी आहेत , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सहा   डिस्चार्ज आज दिवसभरात सहा   जणांला   डिस्चार्ज देण्यात आला , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.                                     सक्रिय रुग्ण ‘ 21’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्

रविवारी(दि.2) अग्रसेन भवन येथे फिजिओथेरपी कॅम्प; खेळाडुंनी लाभ घ्यावा, क्रीडा विभागाचे आवाहन

                 अकोला,दि.30(जिमाका)-   रविवार दि. 2 ऑक्टोबर रोजी स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अग्रसेन भवन अकोला येथे मोफत फिजिओथेरपी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.    या कॅम्पचा जिल्ह्यातील एकविध खेळाच्या संघटना, क्रीडा मंडळे, शैक्षणिक संस्था यांच्या अंतर्गत येणाऱ्या खेळाडुंनी फिजिओथेरपी कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‍जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे. 000000

सेवा पंधरवडा; शिबीरामध्ये अकोला येथे 49 तर बाळापूरात 104 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरण

इमेज
        अकोला , दि.30(जिमाका)- सामाजिक न्याय   व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, समाजकल्याणचे आयुक्त व महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्टपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने   गुरुवार दि.29 रोजी अकोला येथे आर.एल.टी. महाविद्यालय येथे तर बाळापूर तालुक्यात अंजुमन अन्वरुल इस्लाम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, बाळापूर येथे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये अकोल्यातील 49 तर बाळापूर तालुक्यातील 104 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.   बाळापूर तालुक्यात अंजुमन अन्वरुल इस्लाम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे बाळापूर व पातुर तालुक्याचे संयुक्त जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीरात अर्जदारांचे 105 प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी 65 प्रकरणाचे तपासण्या पूर्ण करण्यात आले. तसेच यापुर्वी बाळापूर व पातूर तालुक्यातून प्राप्त झालेल्या प्रकरणापैकी 104 प्रकरणे जात वैधता प्रमाणपत्र या शिबीरात वितरण करण्यात आले.   तसेच अकोला येथे आर.एल.टी. महाविद्या

सेवा पंधरवडा; मलकापूर येथे शिबीराचे आयोजन

        अकोला , दि.29(जिमाका)- 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्टपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने समाजकल्याण व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. कन्नुभाई वोरा अंध महाविद्यालय, मलकापूर येथे आज (दि.30) शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात आधार कार्ड, संजय गांधी निराधार योजना, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, युडीआयडी प्रमाणपत्र नोंदणी करण्यात येणार आहे. या शिबीराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले. 00000

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत चार पॉझिटीव्ह, तीन डिस्चार्ज

  अकोला दि. 29( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 102   अहवाल प्राप्त झाले.   त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला . तर तीन   जणांला   डिस्चार्ज देण्यात आला ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 4 व खाजगी 0)4+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   0= एकूण पॉझिटीव्ह 4 . आरटीपीसीआर ‘चार’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.   त्यात एक पुरुष व तीन महि लांचा समावेश असून हे   रुग्ण मुर्तिजापूर व अकोला मनपा क्षेत्रातील प्रत्येकी दोन प्रमाणे रहिवासी आहेत , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. तीन   डिस्चार्ज आज दिवसभरात तीन   जणांला   डिस्चार्ज देण्यात आला , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.                                             सक्रिय रुग्ण ‘ 24’ जिल्ह्या

पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम घोषीत; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु

अकोला , दि.29(जिमाका)- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. त्यानअुषंगाने जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर मतदारांनी संबधित तहसिल कार्यालय व पदनिर्देशीत ठिकाणी नोंदणीसाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी केले. पुनरिक्षण कार्यक्रम याप्रमाणे:   मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्दी शनिवार     दि. 1 ऑक्टोबरला होईल. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसची प्रथम पुन:प्रसिध्दी शनिवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी, तर वर्तमानपत्रातील नोटीसची व्दितीय पुन:प्रसिध्दी मंगळवार, दि. 25 ऑक्टोबरला करण्यात येईल. नमुना 18 किंवा 19 व्दारे दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम सोमवार दि. 7 नोव्हेंबर राहील. जुना नमुना स्वीकारला जाणार नाही.    हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई शनिवार, दि. 19 नोव्हेंबर तर प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी बुधवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. दावे व हरकती स्वीकारण्या

सेवा पंधरवडा; मुर्तिजापूर शिबीरात 192 जात प्रमाणपत्र वितरण

        अकोला , दि.29(जिमाका)- 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्टपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गाडगे महाराज महाविद्यालय,मुर्तिजापूर येथे बुधवार दि.28 रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये अर्जदारांचे 71 प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी 45 प्रकरणाचे तपासण्या पूर्ण करण्यात आले. तसेच यापुर्वी मुर्तिजापूर व बार्शीटाकळी येथून प्राप्त झालेल्या प्रकरणापैकी 192 प्रकरणे जात वैधता प्रामणपत्र या शिबीरात वितरण करण्यात आले. या शिबीरामध्ये गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य संतोषराव ठाकरे, जिल्हा जात प्रमाणप पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी समीर कुर्तकोटी, उपायुक्त विजय साळवे, संशोधन अधिकारी शुभांगी कोरडे,पोलिस निरीक्ष्ज्ञक मंजुशा डव्हळे, विधी अधिकारी व इत्तर समिीचे कर्मचारी उपस्थित होते. 00000

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांचा जिल्हा दौरा

अकोला , दि.29(जिमाका)- अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर(राज्यमंत्री दर्जा) हे शुक्रवार दि. 30 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्याचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे. शुक्रवार दि. 30 रोजी दुपारी अडीच वाजता अकोला येथून डिव्हीकारने दर्यापूर जि.अमरावतीकडे रवाना होतील. त्यानंतर शनिवार दि.1 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अंजनगाव जि.अमरावती येथून अकोला येथे आगमन व रात्री साडेआठ वाजता अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण. 000000

जिल्ह्यामध्ये 311 महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन

अकोला , दि.29(जिमाका)- सामाजिक न्याय विभागाव्दारे जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व सहायक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच समान संधी केंद्र   स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने   जिल्ह्यातील सर्व 311 महाविद्यालयात समान संधी केंद्राची स्थापना करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून मागासवर्गीय मुलामुलींना शिष्यवृत्ती, फ्रिशीप व इतर शासनाच्या योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उद्योजकता व्यवसाय, रोजगार निर्मितीसह आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी दिली. 00000  

सेवा पंधरवाडा कालावधीत गोल्डन ई-कार्ड व ई-श्रम कार्ड नोंदणीकरीता शिबीराचे आयोजन करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

इमेज
       अकोला , दि.29(जिमाका)-   आयुष्मान भारत योजनेतंर्गत गोल्डन ई-कार्ड तसेच असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम कार्ड सीएससी/आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा पंधरवाडा कालावधीत नोंदणी पूर्ण करुन घ्यावी. याकरीता आपल्या स्तरावर शिबीरांचे आयोजन करुन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल याकरीता शर्थीचे प्रयत्न करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबधिताना दिले.             जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयुष्मान भारत व ई-श्रम योजनेअंतर्गत स्मार्ट कार्ड नोंदणी संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, सूचना प्रसारण अधिकारी अनिल चिंचोले, दुरदृष्य प्रणालीव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गरजू व गरिब व्यक्तीना मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात. तसेच ई-श्रम पोर्टलवर नोंदणीव्दारे असंघटीत कामगारांकरीता सामाजिक सुरक्षा व शासनाचे विविध योजनेचा लाभ दिल्या जातो. याकरीता पात्र लाभार्थ्यांनी

विशेष लेखः- घोणस अळी ओळख व व्यवस्थापन

इमेज
  काही दिवसापासून ऊसावर अळी आढळून आली आहे. जिची ओळख बोली भाषेमध्ये स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून आहे. या अळीचा दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले , त्यामुळे या अळीबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भीती दिसुन येते तसेच त्याबद्दल बरचसे गैरसमज निर्माण झाले आहेत. अळीची ओळख :- या अळीला स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी किंवा डंक अळी असेही म्हणतात. ही एक पंतगवर्गिय कीड असून ती लीमाकोडिडे (स्लग कैटरपिलर पतंग) या कुटुंबातील आहे. या अळ्यांना त्यांच्या चिकटून राहण्याच्या स्वभावामुळे आणि संथ हालचाली व लक्षणामुळे स्लग अळी असे म्हणतात. या अळीचे पतंग त्यांच्या भक्षकांसाठी मऊ आणि पौष्टिक खाद्य असतात. पंतग फार वेगाने फिरत नाहीत आणि उडू शकत नाहीत , म्हणून ते पक्ष्यांचे आणि इतर भक्षकांचे सहज होणारे आणि मुख्य खाद्य आहेत. म्हणून या जातीच्या अळ्यांनी स्वतःचा भक्षाकांपासून बचाव करण्यासाठी शरीरामध्ये भडक रंग आणि काटे विकसित केले आहेत. या त्यांच्या शरीराच्या गर्द आणि प्रखर तेजस्वी रंगाद्वारे आणि काटे किंवा केसांद्वारे त्यांच्या भक्षकांना डंख मारण्

उद्योजकांचे प्रशिक्षण: निर्यातक्षमता वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

इमेज
  अकोला ,   दि.२९(जिमाका)-   जिल्ह्यातील उद्योजकांनी आपापल्या क्षेत्रात अधिक सजग होऊन  आपल्या उत्पादनांची निर्यातक्षमता वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी शासनामार्फत विविध टप्प्यांवर मार्गदर्शन सुविधा उपलब्ध आहेत, त्याचा लाभही उद्योजकांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले. जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,उद्योग संचालनालय,उद्योग विभाग, लघु उद्योग विकास बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने दी अकोला अर्बन बॅंक येथे ‘ गुंतवणुक वृद्धी, निर्यात प्रचलन,एक जिल्हा एक उत्पादन ’ याविषयावर उद्योजकांचे दोन दिवसीय (दि.२९ व ३०)प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या विभागीय व्यवस्थापक मंजुषा जोशी,जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक नयन सिन्हा, उद्योग लघुभारतीचे आशिष चंद्रा, अकोला इंड्स्ट्रीयल असो. चे उन्मेष मालू,व्यवसाय सुलभता ‘मैत्री सेवा’ चे राजकुमार कांबळे,   सिड्बी नागपूरचे व्यवस्थापक आशिष मुनगट तसेच जिल्ह्यातील उ

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत तीन पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज

  अकोला दि. 28( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 88   अहवाल प्राप्त झाले.   त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला . तर दोन   जणांला   डिस्चार्ज देण्यात आला ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 3 व खाजगी 0)3+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   0= एकूण पॉझिटीव्ह 3 . आरटीपीसीआर ‘तीन’ आज   दिवसभरात   आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.   त्यात एक पुरुष व दोन महि लांचा समावेश असून हे सर्व रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहेत , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. दोन   डिस्चार्ज आज दिवसभरात दोन   जणांला   डिस्चार्ज देण्यात आला , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.                                             सक्रिय रुग्ण ‘ 23’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण सं