रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1046 चाचण्यात 180 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 15 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.14) दिवसभरात झालेल्या 1046 चाचण्या झाल्या त्यात 180
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल
दिवसभरात अकोला येथे 83 चाचण्या
झाल्या त्यात 19 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, अकोट येथे 84 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, बाळापूर येथे आठ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, बार्शीटाकळी येथे सहा चाचण्या झाल्या त्यात एकाचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 29
चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मुर्तिजापूर
येथे 100 चाचण्या झाल्या त्यात 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका
येथे 571 चाचण्या झाल्या त्यात 70 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,
अकोला आयएमए येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 51 चाचण्या झाल्या त्यात
15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 77 चाचण्या
झाल्या त्यात 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर जिल्हा आरोग्य
कर्मचाऱ्यांचे 28 चाचण्या
झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1046 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 180 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत
जिल्ह्यात 1 लक्ष 31 हजार 128 चाचण्या झाल्या पैकी 11861 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा