कोविशिल्ड लसीचे 10 हजार डोज प्राप्त

 

अकोला, दि.12 (जिमाका)- जिल्हयात आज (12 मे) कोविशिल्ड लसीचे 10 हजार डोज प्राप्त झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 56 हजार 620 लस प्राप्त झाले असून त्यापैकी 2 लक्ष 31 हजार 474 लाभार्थ्यांना  लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोव्हक्सिनचे 2 हजार 960 लस उपलब्ध असून याचा वापर फक्त दुसऱ्या डोजकरीता करण्यात येणार आहे. तसेच कोविशिल्डचे 20 हजार 340 लस उपलब्ध असून 70 टक्के दुसऱ्या डोजकरीता तर पहिल्या डोजसाठी 30 टक्के देण्यात येणार आहे. कोविशिल्डचा दुसरा डोज 42 दिवसानंतरच घेता येईल. त्याआधी लसीचे कोविन ॲपवर नोंद होणार नाही, याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी, अशी माहिती माता बाल संगोपण अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांनी दिली आहे.

18-44 या वयोगटासाठीचे कोविड लसीकरण राज्य शासनाच्या सुचनेनुसार पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगीत करण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे सर्वच लसिकरण केंद्रावर टोकण वाटप केलेल्याच व्यक्तीचे लसीकरण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी केंद्रावर गर्दी करुन नये. तसेच कोविड प्रतिबंधात्मक नियमाचे सर्वांनी पालन करावे. प्रत्येक लाभार्थ्यांचे लसीकरण होणार असून त्याकरीता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :