दुकाने, आस्थापना सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत सुरु राहणार: ‘ब्रेक द चेन’,अंतर्गत जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश
अकोला, दि.३१(जिमाका)- अकोला जिल्ह्यात कोविड रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता Break The Chain अंतर्गत अकोला जिल्ह्याकरिता मंगळवार दि. १ जून चे सकाळी सात वाजल्यापासून ते मंगळवार दि.१५ जुनचे रात्री १२ वाजेपर्यंत निर्बंधासह आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
राज्यातील कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेची स्थिती लक्षात घेता, राज्याचे
मुख्य सचिव यांनी सुधारीत सुचना निर्गमित केल्या असुन त्यानुसार
राज्यातील निर्बंधांचा कालावधी मंगळवार
दि. १५ जून पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानिर्देशानुसार आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक
झाली. त्यानंतर आदेश निर्गमित करण्यात आले.
या आदेशात
म्हटल्यानुसार,
अ. निर्बंधासह सुरु ठेवण्यात आलेल्या
अत्यावश्यक/ बिगर अत्यावश्यक सेवा.
अ.क्र. |
बाब |
निश्चित करण्यात आलेली
वेळ |
१ |
सर्व प्रकारची जीवनावश्यक
दुकाने/किराणा/औषधी दुकाने/स्वस्त धान्य दुकाने |
सकाळी सात ते दु. दोन |
२ |
अकोला महानगरपालिका तसेच
जिल्हयातील शहरी व ग्रामीण
भागातील बिगर अत्यावश्यक दुकाने /
प्रतिष्ठाने |
सकाळी सात ते दु. दोन ( सोमवार ते शुक्रवार ) शनिवार व रविवार पूर्णतः बंद |
३ |
भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने( द्वार वितरणासह) |
सकाळी सात ते दु. दोन |
४ |
दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री ( डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी )
(घरपोच दुधविक्री नियमित वेळेनुसार सुरु
राहील.) ( स्विटमार्टची दुकाने वगळता) |
सकाळी सात ते दु. दोन सायंकाळी पाच ते सात. |
५ |
कृषी सेवा
केन्द्र व कृषी निविष्ठांची दुकाने
कृषी प्रक्रिया उद्योगगृहे \ शेती
औजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने. |
सकाळी सात ते दु. तीन ग्रामपंचायत स्तरावर संबधित कृषी सेवक, तालुका स्तरावर तालुकाकृषी अधिकारी यांची
राहील.जिल्ह्यात सदर प्रक्रियेचे नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी , अकोला यांची राहील. |
६ |
सर्व
राष्ट्रीयकृत बँका , खाजगी बँका, बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था, सुक्ष्म वित्त संस्था, सहकारी संस्था, पतपेढी संस्था, विमा,पोस्ट
पेमेंट बॅंक व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तिय संस्था. |
सकाळी दहा ते दु. तीन यावेळात सुरु राहतील. (१००% उपस्थितीसह ) |
७ |
पेट्रोलपंप/डीझेल/सीएनजी गॅस पंप |
सकाळी सात ते दु. दोन त्यानंतर दुपारी दोन ते रात्री आठ
या कालावधीत शासकीय/
मालवाहतूक, अॅम्ब्युलंन्स इ. अत्यावश्यक
वाहनांकरिता शेतकऱ्यांना
त्यांच्या शेतातील कामे तसेच मालाची वाहतूक करण्याकरीता शहनिशा करुन ट्रॅक्ट्रर
घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना |
८ |
M.I.D.C. व राष्ट्रीय महामार्ग व हायवेवरील पेट्रोल/
डिझेल पंप |
नियमित वेळेनुसार |
९ |
रेस्टॉरेन्ट , भोजनालय, उपहारगृह |
सकाळी सात ते रात्री आठ वा.पर्यंत फक्त होम
डिलेव्हरी सेवा पुरविण्यास परवानगी |
१० |
कृषी उत्पन्न बाजार समिती |
सकाळी सात ते दु. दोन |
११ |
सर्व वृत्तपत्रांची
छपाई आणि वितरण सुरू राहील. वृत्तपत्रांची घरपोच
सेवा करता येईल. |
नियमित वेळेनुसार |
१२ |
शिवभोजन |
वेळेनुसार |
१३ |
अकोला महानगरपालिका तसेच जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील CSC Centers. |
सकाळी नऊ ते दुपारी दोन. |
ब) इतर निर्बंध
१ . दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत.
मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना
विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत
संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल.
२. दुपारी तीन वाजेनंतर कोणत्याही व्यक्तीस
अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहील.
३. सार्वजनिक, खाजगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बगीचे पुर्णतः बंद राहतील. या
बाबत महानगरपालिका तसेच पोलीस विभाग यांनी आवश्यक तपासणी करुन संबंधीतांवर
नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करावी.
४. सर्व केशकर्तनालय, सलुन, स्पा, ब्युटीपार्लर संपुर्णतः बंद राहतील.
५. शाळा महावद्यिालय, शैक्षणीक
संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारची शिकवणी वर्ग
संपुर्णतः बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास
प्रतिबंध राहणार नाही. नियोजन व नियंत्रण करण्याची
जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा
परिषद अकोला यांची राहील.
६. सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल
कार्यालय हॉल हे पुर्णतः बंद राहतील. लग्न समारंभ
करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरुपात करावा. लग्नामध्ये
मिरवणूक, बॅन्ड पथक यांना परवानगी अनुज्ञेय राहणार नाही. लग्न समारंभाकरिता केवळ २५ व्यक्तींना
उपस्थित राहण्याची परवानगी असेल. व लग्न
सोहळा हा दोन तासापेक्षा जास्त चालणार नाही याची दक्षता घ्यावी. विवाह सोहळा बेकायदेशिररित्या पार पडणार नाही
याची संबंधीत ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती यांनी दक्षता घ्यावी. व नियमानुसार त्यांचेवर कायदेशिर कारवाई करावी. लग्न
समारंभाबाबतचे नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी संबंधित तहसिलदार व
उपविभागीय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची राहील.
७. सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा, त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू
राहतील.
८. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसचे
ऑनलाईन औषध सेवा २४ तास कालावधीत
सुरू राहतील.
९. धान्य वितरण प्रणाली सुरळीत सुरु राहण्याचे दृष्टीने
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतची वाहतूक अनुज्ञेय राहील.
-
वृत्तपत्र
वितरण संदर्भाने वाहतूक अनुज्ञेय राहील. त्यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत
बाळगणे अनिवार्य राहील.
-
सर्व
पेट्रोलपंपावर या आदेशान्वये नमूद करण्यात
आलेल्या परवानगी दिलेल्या बाबीकरिताच पेट्रोल वितरीत करण्यात यावे. मालवाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी
यांचे करिता पेट्रोल डिझेल, व एलपीजी गॅस याची उपलब्धता करुन देण्याबाबतची
जबाबदारी कंपनीचे
अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस यांची राहील. उपप्रादेशिक
परिवहन अधिकारी , पोलीस विभाग यांनी
दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा.
१०. गॅस एजन्सीज मार्फत घरपोच गॅस सिलेंडरचे
वितरण सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत करण्यात यावे. परंतू
ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये प्रत्यक्ष येऊन गॅस नोंदणी करण्यास अथवा सिलेंडर
घेण्यास प्रतिबंध राहील. गॅस एजन्सी येथे ग्राहक आढळुन
आल्यास संबधित एजन्सी कार्यवाहीस पात्र राहील. पर्यवेक्षणाची
जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी, यांची राहील.
११. मद्य विक्री- नमूना FL-2 , Form E, Form E-2 व FLW-2 CL-3 या अनुज्ञप्तीतून सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीत
मद्य विक्री करता येईल.
१२. कार्यालये- सर्व शासकीय, निमशासकीय,
खाजगी कार्यालय व आस्थापना या कालावधीत ही 25% कर्मचारी
क्षमतेसह सुरु राहतील. वित्त व्यवसायाशी
निगडीत सर्व कार्यालय यांचा देखील समावेश राहील. या सर्व कार्यालयांना आपले
कामकाज सुरू ठेवायचे असल्यास ते केवळ ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवता
येईल. आवश्यक कर्मचारी यांची संख्या कमी जास्त करण्याकरिता
स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक राहील. तथापि, कोषागार कार्यालय, म.रा.वि.वि.कं., विद्युत पारेषण पाणीपुरवठा व स्वच्छता ,विद्युत
पुरवठा , महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, धरण व्यवस्थापन पाटबंधारे, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत,कृषी विभाग, पशुसंवर्धन, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय तसेच कोरोना प्रतिबंधात्मक
उपाययोजना यांचेशी संबधित शासकीय, निमशासकीय विभाग/
कार्यालये ही सुरु राहतील.
१३. सर्व
आपले सरकार केंद्र व सेतू केंद्रे, आधार केन्द्र दोन वाजेपर्यंत सुरु
राहील.
१४. उक्त कालावधीत नागरिकांसाठी दस्त
नोंदणीचे कामकाज सुरु राहील.
१५. MIDC, उद्योग,
कारखाने, सुतगिरणी येथे केवळ In-situ पध्दतीने कामकाज सुरू राहील. व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांचेवर नियंत्रणाची
जबाबदारी राहील.
१६. शासकीय यंत्रणामार्फत मान्सुन पुर्व विकास
कामे आवश्यक पाणीपुरवठा व टंचाई विषयक कामे चालु राहतील. संबधित शासकीय यंत्रणांना
या करीता वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.
१७. आवश्यक नसलेल्या वस्तू ई कॉमर्स माध्यमातून
वितरीत करता येतील.
ई-कॉमर्स मार्फत घरपोच
सेवा सुरू राहतील. तसेच स्थानिक दुकानदार, हॉटेल यांचे
मार्फत घरपोच सेवा पुरवणारे कामगार यांचे कडे ग्राहकांच्या घरी जातांना बिल व
संबधित दुकानदारामार्फत देण्यात येणारे ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. संबधित
कर्मचाऱ्यांना निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील.
या
अहवालाची वैधता ७ दिवसाकरीता असेल.
१८. दुरसंचार,टेलिकॉम सेवा
(मोबाईल रिचार्ज सेंटर वगळता), विद्युत, पारेषण इत्यादी सेवा सुरळीतपणे रहावी याकरिता सेवा पुरविणारे
कर्मचारी यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये
कामे करता येईल. संबंधीत आस्थापना यांनी त्यांना वितरीत केलेले ओळखपत्र
सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
१९. धान्य वितरण प्रणाली सुरळीत सुरु राहण्याचे
दृष्टीने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतची वाहतूक अनुज्ञेय राहील.
२०. वृत्तपत्र वितरण संदर्भाने वाहतूक
अनुज्ञेय राहील. त्यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
२१. सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बस वाहतुक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने, यांची वाहतुक नागरीकांना
अत्यावश्यक कामाकरिता फक्त अनुज्ञेय राहील.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत
बाळगणे बंधनकारक राहील. तसेच रूग्णाकरीता रिक्षा
व खाजगी वाहनास परवानगी राहील. याबाबतीत नियंत्रण व नियोजनाची जबाबदारी पोलीस वाहतुक
शाखेकडे राहील.
२२. जिल्ह्याच्या मालवाहतूक व
रुग्णवाहतूक करणाऱ्या वाहनास व शासकीय वाहनास स्वतंत्र परवानगीची गरज असणार
नाही. तथापि मालवाहतूक शाखा, खत साठा
इ.बाबतीत फक्त लोडींग व अनलोडींग करण्यास परवानगी
अनुज्ञेय राहील. इतर कारणांकरिता व आवश्यक वैद्यकीय कारणांकरिता जिल्ह्याबाहेर वाहतूक
करावयाची असल्यास, https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरुन ई-पास काढून
वाहतूक करता येईल.
२३. पावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण होण्याचे
दृष्टीने केवळ In-situ पद्धतीने सुरू राहील.
२४. पाणी टंचाई तसेच पाणी पुरवठा संबंधीत कामे
सुरु राहतील.
२५. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्ती/पत्रकार तसेच
प्रसारमाध्यमांचे कार्यालय,
सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, वृत्तपत्रांचे वितरण तसेच टीव्ही न्यूज चॅनल सुरु राहतील.
या सर्व निर्देशाचे काटेकारपणे
अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला, महसूल
विभाग तसेच ग्रामीण भागात गट विकास
अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगरपालीका/ नगर पंचायतीचे मुख्याधिकारी
यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी
तथा INCIDENT COMMANDER व तहसिलदार व पोलीस विभाग यांची
राहील. तसेच सर्व आस्थापना यांनी कोरोना संक्रमण साखळी तोडण्याकरिता
त्रिसुत्री पद्धतीची अंमलबजावणी करावी. हे आदेश दि.१
जून
चे सकाळी सात वाजेपासून ते दि.१५चे रात्री १२ वाजेपर्यंत लागु राहतील.
या आदेशाचा
भंग करणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध्ज कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात
स्पष्ट करण्यात आले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा