रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 1354 चाचण्यात 125 पॉझिटीव्ह
अकोला,दि.25 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.24) दिवसभरात
झालेल्या 1354 चाचण्या झाल्या त्यात 125 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला येथे 14 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, अकोट येथे 97 चाचण्या झाल्या त्यात 20 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे 29 चाचण्या
झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, पातूर
येथे 22 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, तेल्हारा
येथे 78 चाचण्या झाल्या त्यात सहा
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 197 चाचण्या झाल्या त्यात
15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला
महानगरपालिका येथे 613 चाचण्या झाल्या त्यात 21 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात 70 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर
हेडगेवार लॅब येथे 84 चाचण्या झाल्या त्यात 29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. बार्शीटाकळी येथे 124,
अकोला आयएमए येथे 26 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1354 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 125 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 46 हजार 263 चाचण्या
झाल्या पैकी 13336 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा