रिक्षाचालकांचे अर्थसहाय्य थेट खात्यावर जमा होणार; ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचे कामकाज सुटीच्या दिवशीही राहणार सुरु

     अकोला,दि.२(जिमाका)- कोविड १९ च्या पार्श्वभुमिवर रिक्षाचालकांना एक वेळ अर्थसहाय्य म्हणून १५००(पंधराशे) रुपये इतके मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून परवानाधारक रिक्षाचालकांना द्यावयाचा लाभ थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या लाभासाठी सर्व परवानाधारक रिक्षा चालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. त्यासाठी रिक्षाचालकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मदत कक्ष सर्व कार्यालयीन दिवसांसोबत सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली आहे.

या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार,  परवानाधारक रिक्षाचालकास http://transport.maharashtra.gov.in/1133/Autorickshaw-Financial-Assistance- Scheme  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज सादर करतांना अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक प्राप्त होईल. या ऑनलाईन अर्जात वाहन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक,  ऑटोरिक्षा परवाना क्रमांक, वाहन क्रमांक, आधार क्रमांक नमूद करावा लागेल.  वारसदार असल्यास तो पर्यायही निवडावा लागेल. आधार कार्ड ,मोबाईल क्रमांक  आणि बॅंक खाते हे परस्परांशी संलग्न केलेले असणे अनिवार्य आहे. आपल्या अर्जाची प्रत्यक्ष स्थिती अर्जदार आपल्या मोबाईलवर तपासू शकतो.

अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर  परिवहन कार्यालय अर्जातील नमूद तपशिल कार्यालयातील अभिलेख्यांशी पडताळून पाहिल. ही सत्यता तपासल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मंजूर करुन  अर्जदाराच्या बॅंक खात्यात  १५०० रुपये शासनाकडून जमा करण्यात येतील.

ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने कार्यालयात येण्याची व उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. मात्र अर्ज भरतांना  अडचण आल्यास कार्यालयाच्या मदत कक्षात ०७२४-२९५७०७० या दूरध्वनीवर संपर्क साधून  निराकरण करावे. रिक्षाचालकांना तातडीची मदत उपलब्ध व्हावी यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात  कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. हे कामकाज कार्यालयीन तसेच सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ