पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष लेखः- गुणकारी दशपर्णी अर्क

खरीप हंगाम तोंडावर आला असून   या हंगामातील कापूस ,   सोयाबीन ,   तूर ,   मूग आणि भाजीपाला या पिकांवरील मित्रकिडींचे संरक्षण आणि शत्रू किडींचे निर्मूलन करण्यासाठी दशपर्णी अर्क गुणकारी आहे. दशपर्णी अर्क हे उत्‍तम प्रतीचे किडनाशक ,   बुरशीनाशक व टॉनिक म्हणूनही वापरता येते. दशपर्णी अर्क तयार होण्‍याकरीता ३० दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे खरीप हंगामासाठी दशपर्णी अर्क तयार करण्‍याची हीच योग्‍य वेळ आहे. दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत दशपर्णी अर्क तयार करण्‍याकरीता १० प्रकारच्‍या वेगवेगळया उग्र वासाच्‍या वनस्‍पतीच्‍या पाल्‍याचा उपयोग करण्यात येतो.   पाणी २०० लिटर ,   शेण २ किलो ,   गोमुत्र १० लिटर ,   हळद पावडर २०० ग्रॅम ,   अद्रक पेस्‍ट ५०० ग्रॅम ,   तंबाखु १ किलो ,   हिरवी तिखट मिर्ची १ किलो ,   लसुन १ किलो ,   करंज पाला   २ किलो (लहान फांद्यांसह) ,   सिताफळ पाला २ किलो ,   एरंडी पाला २ किलो ,   पपई पाला २ किलो ,   कडुलिंब पाला ५ किलो ,   निरगुडीचा पाला २ किलो ,   रुईचा पाला २ किलो ,   धोतऱ्याचा पाला २ किलो ,   गुळवेल पाला २ किलो ,   बेलाचा पाला २ किलो ,   झेंडुचा पाला २ किलो ,  

कोविडः एक पॉझिटीव्ह

             अकोला दि. 31 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर)   33   जणांचा अहवाल प्राप्त झाला .    त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला ,   असे   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1   व खाजगी 0) 1 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0= एकूण पॉझिटीव्ह 1 . आरटीपीसीआर ‘एक ’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात   एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला . त्यात एका महिला रुणाचा समावेश असून हे रुग्ण अकोला मनापा क्षेत्रातील रहिवासी आहे ,   अशी माहिती   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून   मिळाली. सक्रिय रुग्ण ‘एक ’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66214 (500 81 +15142+991)   आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण आहेत ,   अशी माहिती    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे. ०००००

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ; भरड धान्याच्या बेकरी उत्पादनांमुळे लोहाऱ्याच्या शेतकरी गटाला सापडला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग

इमेज
अकोला,दि.३१(जिमाका)- यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित आहे. भरड धान्य सहज खाता येण्याजोग्या स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून लोहारा ता. बाळापूर येथील विदर्भ शेतकरी बचत गट यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेत बेकरी व्यवसायात प्रवेश केला आणि बाजरी, ज्वारी, नाचणी यांच्या बिस्कीट, कुकीज, ब्रेड सारखे उत्पादनांना सुरुवात केली. ग्राहकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग मिळाला आहे.        संयुक्‍त राष्‍ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष  ‘आंतरराष्‍ट्रीय भरड धान्य वर्ष’ घोषित केले आहे. एकीकडे जंकफुडचा आहारात वाढता समावेश. त्यामुळे स्थूलपणा ते विविध आजारांचा करावा लागणारा सामना. आहारातील पोषण मूल्याची झालेली कमतरता. या सर्व समस्यांवरील उपाय म्हणजे आहारात भरड धान्याचा समावेश. अनेकांना ह्याचे महत्व पटले असून  त्यांनी आपल्या आहारात ज्वारी, बाजरी व नाचणी, अशा भरड धान्याचा समावेश सुरु केला आहे. पण हल्ली लोकांना ‘रेडी टू इट’ आणि ‘रेडी टू सर्व्ह’ प्रकारात पदार्थ हवे असतात. अशा पदार्थांचे पोषण-मूल्यवर्धित अस

बार्शीटाकळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर

इमेज
अकोला,दि.३१(जिमाका)- तहसील कार्यालय, पंचायत समिती व एकात्मक बालविकास सेवा योजना प्रकल्प   यांच्या संयुक्त विदयमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.२९) पंचायत समिती बार्शीटाकळीच्या सभागृहामध्ये हे शिबीर पार पडले. शिबिराचे उद्घाटन मुर्तीजापुर मतदार संघाचे आ. हरीष पिंपळे यांनी दीप प्रज्वलन व पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून केले. सभापती श्रीमती सुनंदाताई मानतकर, जि प. सदस्य गणेश बोबडे, रायसींगजी राठोड, उपसभापती संदीप चौधरी, सदस्य श्रीमती संगीताताई जाधव,गणेश झळके, गजानन मानतकर, तहसिलदार दीपक बाजड आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी केले.   या कार्यक्रमात विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स शासकीय विभागांनी लावले होते. गटविकास अधिकारी कालीदास तापी, सहायक गटविकास अधिकारी श्रीमती सुनिता इंगळे यांचीही उपस्थिती होती. महिला आर्थिक विकास महामंडळ लोक संचालीत साधन केंद्र उमेद कृषी विभाग, महावितरण, आरोग्य विभाग, संजय गांधी योजना विभाग, पंचायत समिती, एकात्मीक बाल विका

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

इमेज
अकोला, दि.31(जिमाका)-   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर   यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी शरद जावळे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिक्षक शिल्पा बोबडे, अजय राऊत, सुमेध आठवले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ०००००

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरात युवकांना मार्गदर्शन

इमेज
अकोला, दि.30(जिमाका)-   राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून युवकांना रोजगांराच्या संधी व मागदर्शन करण्यात येत आहे. यावेळी करिअर संधी, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, परदेशातील शिक्षणाच्या संधी, व्यक्तीमत्व विकास अशा विविध विषयावर तज्ज्ञाव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.              व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रमिलाताई ओक हॉल , नवीन बस स्टॅन्ड जवळ अकोला येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गजानन चोपडे, संस्था व्यवस्थापन समिती औ . प्र . संस्था मुलींची अकोला अध्यक्ष जयंत पडगीलवार, प्रभात किडस संचालक डॉ . गजानन नारे, कौशल्य विकास , रोजगार ,   उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त, द. ल. ठाकरे, ज्येष्ठ साहत्यिक प्रा. अनघा सोनखासकर, डॉ. सुनील बिहडे, प्रा. संजय पाटील, प्रा. योगेश वाडतकर, ज्येष्ठ साहत्यिक महादेव भुईभार, प्रवचनकार संगीता ठोकरे, पालक व विद्यार्थी मोठया संख्येने

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ; शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

   अकोला ,   दि. 30(जिमाका)-    महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे , या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा , असे आवाहन   महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. योजनेकरीता पात्रता :   योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रुपयांचे कर्ज दिल्या जाईल. लाभार्थ्यांचे वय 17 ते 30 वयोगटातील असावा , महाराष्ट्राचा रहिवाशी असावा , इयत्ता बारावीमध्ये 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. या योजनांची अधिक माहिती घेण्यासाठी व अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी    www.msobcfdc.org   या संकेतस्थळावर अथवा महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले आहे.    00000

डाक अदालत शुक्रवार(दि.16)

इमेज
            अकोला , दि .30( जिमाका )-   डाक सेवे बाबत   तक्रार सहा आठवड्यापेक्षा जास्त काळ अनु त्त रीत   असेल अशा तक्रारींने निवारण करण्यासाठी    शुक्रवार दि. 16 जून रोजी   सकाळी 11   वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालय ,   अकोला विभाग ,   सिव्हिल लाईन अकोला ये थे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या डाक अदालतीस तक्रारदाराने   स्वत:च्या खर्चाने उपस्थित रहावे. सोबत अनुत्तरीत तक्रारीबाबतचा   अर्ज व त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत ज्या अधिका ऱ्याकडे   दाखल केली   आहे त्यांचा हुद्दा ,   व दाखल केल्याची   तारीख ,   एका अर्जासोबत एकच तक्रार असावी. आपली तक्रार प्रवर अधिक्षक ,   अकोला यांच्याकडे सोमवार दि. 12 जून पुर्वी समक्ष अथवा पोस्टाने पाठवावी ,   असे आवाहन डाक कार्यालयाचे प्रवर अधिक्षक , अकोला यांनी केले. 000000

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष लेखः- तंबाखू सेवनः सोडवा व्यसन; फुलवा जीवन

इमेज
    तंबाखु सेवनामुळे अनेक शारिरीक आणि आर्थिक हानी होतात. तंबाखूसेवनामुळे अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे ‘तंबाखू सेवनाचे व्यसन सोडवा आणि आपले अमूल्य असे जीवन फुलवा’, हा संदेश जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून देणे आवश्यक आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन (WNTD) (दि.३१ मे) हा तंबाखू सेवनाच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे, तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी प्रभावी धोरणांचा पुरस्कार करण्यासाठी जगभरात साजरा केला जातो.   जागतिक आरोग्य संघटने (World Health Organization) च्या मते, तंबाखू पिकवण्यामुळे शेतकऱ्यांचे तसेच जमिनीचे आरोग्य पणाला लागते. तंबाखू उद्योगामुळे तंबाखू लागवडीला चालना दिली जाते, परिणामी अन्नधान्य पिकांची लागवड कमी होते आणि जागतिक अन्न संकटे निर्माण होऊ शकतात. जागतिक तंबाखू विरोधी दिन या सर्व मुद्यांवर   जनजागृती करुन शेतकऱ्यांना शाश्वत अन्न-धान्य पिकवण्यास आणि अन्न सुरक्षा व पोषण गुणवत्ता सुधारण्याबाबत प्रेरणा देईल.   जागतिक तंबाखू विरोधी दिनाची पार्श्वभुमि   जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सन १९८७ मध्ये तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि आरोग्यावरील घातक परि

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त उद्या (दि.३१) जनजागृती रॅली, मौखिक कर्करोग तपासणी शिबिर

  अकोला, दि.२९(जिमाका)- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बुधवार दि.३१ रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त  जनजागृती रॅलीचे तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयात मौखिक कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीचा मार्ग  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – एचडीएफसी चौक- पंचायत समिती- टॉवर चौक- अशोक वाटीका चौक- मार्गे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे समारोप.  या कार्यक्रमास व रॅलीत व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे. यानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालयात मौखिक कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आले आहे. ०००००

दोनवाडा व केळीवेळी येथील आपत्ती प्रतिसाद पथकाला बचाव साहित्याचे वितरण

इमेज
अकोला, दि.२९(जिमाका)- मौजे दोनवाडा व मौजे केळीवेळी या गावांना नैसर्गिक आपत्ती कालावधीत उपयोगी पडणारे बचाव साहित्य वितरीत करण्यात आले. आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात साहित्याचे वितरण करण्यात आले. आ. सावरकर यांच्या हस्ते ४ सीटर बोट ,५ लाईफ जॅकेट ,४ लाईफ रिंग ,२०० फुट  रोप इत्‍यादी साहीत्‍य वितरीत करण्‍यात आले . उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे ,तहसिलदार सुनिल पाटील तसेच मौजे दोनवाडा व मौजे केळीवेळी सरपंच,पोलीस पाटील,तलाठी,ग्रामसेवक,व गावातील नागरीक उपस्थित होते. ०००००