पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंध 15 मेपर्यंत कायम

                         अकोला , दि.   30 (जिमाका)-   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता व संसर्गाची साखळी तोडण्याच्यादृष्टीने 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आले होते.   ‘ब्रेक द चेन’  अंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता दि. 15 मेचे सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन कालावधी वाढविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदेश निर्गमित केले.        1. मद्यविक्री - जिल्‍हयातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्‍ये  मद्यविक्री संदर्भाने  निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आदेशानुसार   अंशतः बदल करुन  पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्‍यात येत आहेत.   अक्र तपशिल कालावधी १ मद्य विक्री नमूना FL-2 ,FL/BR-II, Form E, Form E-2 व  FLW-2 या अनुज्ञप्‍तीतून घरपोच या प्रकाराने मद्य विक्री करता येईल. नमूना CL-3  अनुज्ञप्‍तीतून फक्‍त सीलबंद बाटलीतून घरपोच य प्रकारानेमद्यविक्री करता येईल. सकाळी ७.०० ते रात्री ८.०० कोणत्‍याही परिस्थितीत मद्य विक्रीची दुकाने उघडून Take away किंवा पार्सल पध्‍दतीने  दुक

नितीनकुमार डोंगरे यांचा सेवानिवृत्ती समारंभ; जिल्हा प्रशासनाच्या प्रतिमा संवर्धनात डोंगरे यांचे मौलाचे योगदान

इमेज
अकोला , दि. 30 (जिमाका)-   जिल्हा माहिती कार्यालयाचे श्री. नितीनकुमार डोंगरे यांनी  सेवाकालावधीमध्ये प्रसिद्धी विषयक कामकाजामुळे जिल्हा प्रशासनाच्या प्रतिमा संवर्धनात मौलाचे योगदान दिले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्यांना भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या. श्री . डोंगरे यांना आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला .  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, गाडवे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, पत्रकार संघाचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे आदि पत्रकार उपस्थित होते. श्री. डोंगरे यांच्या निरोप समारंभ आयोजीत कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , पुष्प गुच्छ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार केला . श्री . डोंगरे हे 1991 पासून सामूहिक दूरचित्रवाणी योजना विभागात तंत्र अधिकारी पदावर कार्यरत होते. सन 2001 वर्षी सामूहिक दूरचित्रवाणी विभाग बंद झाल्यानंतर त्याची माहिती व जनसंपर्क विभागात पदस्था

1754 अहवाल प्राप्त, 336 पॉझिटीव्ह, 468 डिस्चार्ज, 11 मृत्यू

अकोला , दि. 30( जिमाका)-   आज दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1754 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1418   अहवाल निगेटीव्ह तर 336 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह    आले.   दरम्यान 468   जणांना    डिस्चार्ज    देण्यात आला ,   तर 11 जणांचा   उपचारा दरम्यान मृत्यू झाला ,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.    त्याच प्रमाणे काल (दि. 29 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.    त्यामुळे    आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण    संख्या 40160 ( 31095 + 8888 + 177 ) झाली आहे ,   अशी    माहिती शासकीय वैद्यकीय    महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात ए कूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 336 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 201 असे एकूण पॉझिटीव्ह 537 आहेत.            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 206145 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 203268 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2490 नमुने होते. आजपर्य

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणास आजपासून (दि.१ मे) सुरुवात

  अकोला, दि.३० (जिमाका)- वय वर्षे १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तिंसाठी कोविड लसीकरणास शनिवार दि.१ मे पासून सुरुवात होत आहे. या संदर्भात जिल्ह्यास सध्या ७५०० कोविशिल्ड या लसींचे डोस उपलब्ध झाले असून सद्यस्थितीत अकोला शहरातील पाच लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. नंतर जसे जसे डोस उपलब्ध होतील तसे अन्य लसीकरण केंद्र कार्यान्वित होतील. यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार,   लसीकरणासाठी लाभार्थ्यांना   कोविन ॲप वरुन नोंदणी करणे व त्यानुसार लसीकरणाची तारीख व वेळ निश्चित करणे अनिवार्य आहे. लस उपलब्ध होण्यास होणारा संभाव्य उशीर लक्षात घेता दि.१ मे रोजी लसीकरण हे   दुपारी एक ते पाच यावेळात करण्यात येईल. अन्य दिवशी लसीकरण हे सकाळी नऊ ते पाच यावेळात   सुरु राहिल. अकोला शहरात सध्या   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भरतीया रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, डाबकी रोड, आर.के.टी. आयुर्वेद कॉलेज जठारपेठ आणि जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे   लसीकरण उपलब्ध होईल. अकोला महानगरात   वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता अकोला मनपा क्षेत्रात सोमवार दि.३ मे पासून लसीकरणाची वेळ सका

इमारत बांधकाम कामगारांना नोंदणी शुल्क जमा करण्याचे आवाहन

  अकोला, दि.३० (जिमाका)- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ , मुंबई अंतर्गत दि . २२ एप्रिल   पर्यंत नोंदीत बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या मान्यतेनुसार कोविड - १९ विषाणुच्या प्रादुर्भाव कालावधीत १५०० रुपयांचे अर्थ सहाय्य देण्याचे घोषीत केले आहे . त्यानुसार मं डळाकडे जुलै २०२० ते २२ एप्रिल २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांपैकी ज्यांची नोंदणी फी व वर्गणी मंडळाकडे लॉकडाऊनमुळे जमा करणे शक्य झाले नाही , अशा बांधकाम कामगारांना मंडळा चे स्मार्ट कार्ड देता आले नाही . अशा कामगारांनी त्यां ची नोंदणी फी पंचवीस रुपये व वर्गणी फी बारा रुपये खाली दिलेल्या मंडळाच्या दोन स्वतंत्र खात्यात जमा करावे , असे आवाहन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ , मुंबई   यांनी केले आहे. बाब रक्कम रुपये बँकेचे नाव बँकेचे खाते क्रमांक IFS C Code नोंदणी   फी २५/- सेंट्रल बँक ऑफ इंडि

पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हादौरा

  अकोला, दि.३० (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास ,   शालेय शिक्षण ,   महिला व बालविकास ,   इतर मागासवर्ग ,   सामाजिक व शैक्षणिक    मागास प्रवर्ग ,   विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण ,   कामगार राज्यमंत्री    तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू क डू हे शनिवार दि.१ मे रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत.  त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शनिवार दि.१   मे रोजी सकाळी ७ वा ५५ मि. नी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन, सकाळी आठ वा. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती, स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात, सकाळी साडे आठ वा. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक, स्थळ- लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,   सकाळी सव्वा नऊ वा. डॉ. पंजाबराव देशमुख   कृषी विद्यापीठ येथील कोविड हॉस्पिटलची पाहणी,   सकाळी सव्वा दहा वा.   जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोविड लसीकरण केंद्रास भेट, सकाळी ११ वा. शहरातील प्रतिबंधात्मक केंद्रांना भेटी, सकाळी साडेअकरा वा.   शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव नंतर सोईने   कुरळपूर्णा जि

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

इमेज
    अकोला , दि . 30 ( जिमाका )-   राष्ट्रसंत   तुकडोजी   महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्र वार (दि. 30 ) रोजी अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात राष्ट्रसंत   तुकडोजी   महाराज   यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1334 चाचण्यात 201 पॉझिटीव्ह

    अकोला , दि. 30 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि. 29 ) दिवसभरात झालेल्या 1334 चाचण्या झाल्या त्यात 201   जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.    काल दिवसभरात अकोट येथे 13 चाचण्या झाल्या त्यात दोन जणां चे अहवाल पॉझिटीव्ह आ ले, बाळापूर येथे 16 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आ ला, बार्शीटाकळी येथे 69 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आ ला, पातूर येथे 29 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आ ला, तेल्हारा येथे 65 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आ ला, मुर्तिजापूर येथे 138 चाचण्या झाल्या त्यात 35 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आ ले . तर अकोला महानगरपालिका येथे 726 चाचण्या झाल्या त्यात 53 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आ ला, अकोला आयएमए येथे 23 चाचण्या झाल्या त्यात ति घांचा अहवाल पॉझिटीव्ह आ ला , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 98 चाचण्या झाल्या त्यात 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले , तर हेडगेवार लॅब येथे 140 चाचण्या झाल्या त्यात 65 जणांचे अहवा

मर्यादा तोडणाऱ्या मंगल कार्यालयांवर कडक कार्यवाही करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा इशारा

  अकोला , दि. 29 (जिमाका)- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. लग्नप्रसंगाना अटीशर्तीसह 25 व्यक्तीची परवानगी देण्यात आली आहे. परंतु काही मंगल कार्यालयामध्ये नियमाची पालन होताना दिसून येत नाही. तसेच या ठिकाणी मर्यादापेक्षा जास्त प्रमाणात नागरिक एकत्र येवून गर्दी करत असल्याचे निर्देशान येत आहे. अशा मंगल कार्यालयांवर कार्यवाही करण्यात येत आहे. यापुढे अशा मर्यादा तोडणाऱ्या मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापकावर कार्यवाही करुन मंगल कार्यालय सिल करण्यात येणार आहे. तसेच या मंगल कार्यालयाचे सर्व लग्न व इतर कार्यक्रम रद्द करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. लग्न व इतर सभारंभात   मोठ्या प्रमाणात गर्दी ही कोरोना संसर्गाला आमंत्रणच आहे. यासाठी मंगल कार्यालय व्यवस्थापनासह लग्न कार्यालयात येणाऱ्या वधू-वर पक्षाकडील   व्यक्तीनी कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करुन लग्न सभारंभास 25 व्यक्तीच्या परवानगीपेक्षा जास्त संख्या होणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे. अन्यथा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या कडक दंडात्मक कार्यवाहीसह इतर कार्यवा

2553 अहवाल प्राप्त, 504 पॉझिटीव्ह, 438 डिस्चार्ज, 10 मृत्यू

  अकोला , दि. 29( जिमाका)-   आज दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2553 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2049   अहवाल निगेटीव्ह तर 504 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह    आले.   दरम्यान 438   जणांना    डिस्चार्ज    देण्यात आला ,   तर 10 जणांचा   उपचारा दरम्यान मृत्यू झाला ,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.    त्याच प्रमाणे काल (दि. 28 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 168 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.    त्यामुळे    आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण    संख्या 39623 ( 30759 + 8687 + 177 ) झाली आहे ,   अशी    माहिती शासकीय वैद्यकीय    महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात ए कूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 504 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 168 असे एकूण पॉझिटीव्ह 672 आहेत.            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 204460 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 201589 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2484 नमुने होते. आजप