पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हा व तालुका न्यायालयांत ९ डिसेंबरला लोकअदालत

  जिल्हा व तालुका न्यायालयांत ९ डिसेंबरला लोकअदालत अकोला, दि. ३० : राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सर्व तालुका न्यायालयांत राष्ट्रीय लोकअदालत दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते ५.३० दरम्यान होणार आहे. त्यात दाखलपूर्व प्रकरणे व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची सुनावणी होईल. धनादेश अनादर प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, वीज, पाणी देयक प्रकरणे, आपसात तडजोड करता येण्याजोगी फौजदारी, वैवाहिक व इतर दिवाणी वाद आदी दाखलपूर्व प्रकरणांची सुनावणी होईल. त्याचप्रमाणे, बँक कर्जवसुली, धनादेश अनादर, अपघात भरपाई, वैवाहिक वाद, भूसंपादन, सेवाविषयक पगार, भत्ते, सेवानिवृत्ती आदी कायदेशीर प्रकरणे, महसूल प्रकरणे, भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकूम, विशिष्ट पूर्वबंध, करार पूर्तता आदीसंबंधी न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची सुनावणी होईल. असे होतात फायदे लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. साक्षी-पुरावे आदी बाबी टळून निकाल जलद लागतो. सामंजस्याने तोडगा निघाल्याने दोन

भटक्या विमुक्त जमातींतील व्यक्तींसाठी दि. २ व ३ डि्सेंबरला विशेष शिबिर

    महिला सेक्स वर्कर, तृतीयपंथी व्यक्तींचीही होणार नोंदणी भटक्या विमुक्त जमातींतील व्यक्तींसाठी दि. २ व ३ डि्सेंबरला विशेष शिबिर अकोला, दि. ३० :   जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीतील व्यक्ती, त्याचप्रमाणे महिला सेक्स वर्कर, तृतीय पंथी व्यक्तींच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर दि. २ व ३ डिसेंबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर   होणार आहे. अद्यापपर्यंत मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या सर्व व्यक्तींनाही यादिवशी नोंदणी करता येणार आहे.   जिल्ह्यातील एकही पात्र व्यक्ती मतदार म्हणून नोंदणी झाल्याशिवाय राहू नये. नियोजित शिबिरांच्या माध्यमातून अधिकाधिक नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले आहेत.   निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत विविध घटकांसाठी सातत्याने मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी भटक्या, विमुक्त जमातीतील व्यक्ती, त्याचप्रमाणे महिला सेक्स वर्कर, तृतीय पंथी व्यक्ती यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठ

‘विकसित भारत संकल्प यात्रे’द्वारे जिल्ह्यात जनजागृती

इमेज
  ‘विकसित भारत संकल्प यात्रे’द्वारे  जिल्ह्यात जनजागृती अकोला, दि. ३० : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रे’द्वारे प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत ६० हून अधिक गावांत यात्रा पोहोचली असून, दि. २६ जानेवारीपर्यंत गावोगाव जनजागृती करणार आहे. यात्रेद्वारे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांना संबोधित केले. अकोला तालुक्यातील दुधलम , मूर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे,   अकोट तालुक्यातील कावसा   व तेल्हारा तालुक्यातील   अडगाव बु   येथे प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग व स्थानिक नागरिक उपस्थित होते.   उपक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी व व्यापक जनसहभाग मिळविण्यासाठी जिल्ह्यात तालुका व ग्रामस्तरीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसीलदार व सदस्य सचिव हे तालुक्याचे गटविकास अधिकारी आहेत. या समितीत नगरपरिषद मुख्याधिका-यांसह आरोग्य, कृषी, भूमी अभिलेख, पाणीप

जिल्हाधिका-यांकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी नुकसानग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
जिल्हाधिका-यांकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी नुकसानग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा -            जिल्हाधिकारी अजित कुंभार   अकोला, दि. ३० : अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे पुर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज यंत्रणांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यातील दहिगाव, रामगाव, म्हैसांग या भागात भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी उपसंचालक विलास वाशीमकर, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर आदी यावेळी उपस्‍थित होते. रामगाव येथे पाऊस व साचलेल्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे, दहिगाव, म्हैसांग या भागातील शिवाराचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. वेचणी न झालेला कापूस ओला होणे, कापसाबरोबरच हरभरा, तूर पिकाचे या भागात नुकसान झाल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. यंत्रणेने नुकसानग्रस्त क्षेत्राची संपूर्ण पाहणी करून व शेतकरी बांधवांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन परिपूर्ण नोंदी घ्याव्यात. पंचना

राजकीय पक्ष प्रतिनिधींशी चर्चा; मतदान केंद्रांना भेट मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांच्याकडून कामकाजाचा आढावा

इमेज
  अकोला, दि. २९ : मतदार यादी अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व अचूक व्हावी. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व कार्यवाही विहित मुदतीत व्हावी, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले. मतदार यादीविषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक डॉ. पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही सभागृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, मतदार यादी निरीक्षकांचे समन्वय अधिकारी तथा उपायुक्त श्यामकांत म्हस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. यावेळी मतदार यादी निरीक्षकांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मतदाराच्या नावाची एकाहून अधिक नोंद असणे, मयत मतदाराचे नाव यादीत असणे, एकाच मतदाराचे दोन मतदारसंघात नाव असणे आदी त्रुटी व आक्षेपांबाबत दावे-हरकती आदी कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करावी. सर्व पक्ष प्रतिनिधींना यादी, तसेच आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध

राजकीय पक्ष प्रतिनिधींशी चर्चा; मतदान केंद्रांना भेट मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांच्याकडून कामकाजाचा आढावा

इमेज
अकोला, दि. २९ : मतदार यादी अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व अचूक व्हावी. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व कार्यवाही विहित मुदतीत व्हावी, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले. मतदार यादीविषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक डॉ. पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही सभागृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, मतदार यादी निरीक्षकांचे समन्वय अधिकारी तथा उपायुक्त श्यामकांत म्हस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. यावेळी मतदार यादी निरीक्षकांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मतदाराच्या नावाची एकाहून अधिक नोंद असणे, मयत मतदाराचे नाव यादीत असणे, एकाच मतदाराचे दोन मतदारसंघात नाव असणे आदी त्रुटी व आक्षेपांबाबत दावे-हरकती आदी कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करावी. सर्व पक्ष प्रतिनिधींना यादी, तसेच आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध कर

दुष्काळसदृश परिस्थितीत सवलती; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

  अकोला, दि. 28 : शासन निर्णयानुसार दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू सवलतीबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज निर्गमित केला आहे. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 1021 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत महसूल व वनविभाग दि. 10 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्यानुसार राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिली पेक्षा कमी झाले आहे. परिशिष्ट अ येथे नमूद केलेल्या एकूण 1021 महसूली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून 8 सवलती लागू करण्यास संबंधीत विभागांना आदेशित करण्यात आले आहे.   त्यानुसार जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आ

चोहट्टा बाजार जि. प. सर्कल पोटनिवडणूक मतमोजणी अकोटला होणार

  अकोला, दि. २८ : अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रिक्त जि. प. सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान दि. १७ डिसेंबर व मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे. अकोट येथील तहसील कार्यालय हे मतमोजणी केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. पोटनिवडणूक कार्यक्रमाची अनुसूची जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडून निर्गमित करण्यात आली. त्यानुसार  दि. २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत अकोट उपविभागीय कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील. रविवार दि. ३ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ५ डिसेंबर रोजी अकोट येथील उपविभागीय कार्यालयात सकाळी ११ वा. पासून करण्यात येईल व छाननीनंतर लगेच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येण्यात येईल. नामनिर्देशनपत्राचा स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिका-याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर आहे. जिल्हा न्यायाधीशांनी अपीलावर सुनावणी व निकाल

तेल्हारा तालुक्यात सघन कुक्कुट विकास गट स्थापणार

  तेल्हारा तालुक्यात सघन कुक्कुट विकास गट स्थापणार   अकोला, दि. २८ : तेल्हारा तालुक्यात सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वापर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्याचा निर्णय जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय निवड समितीकडून घेण्यात आला. या योजनेत ५० टक्के अनुदान देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी इ च्छूक लाभार्थींनी तेल्हारा पंचायत समितीत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ०००

महिला सन्मान बचतपत्र योजनेचा लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

      महिला सन्मान बचतपत्र योजनेचा लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन           अकोला, दि. २८ :   महिला सशक्तीकरणासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना लागू असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवर डाक अधिक्षक गणेश बा. आंभोरे यांनी केले आहे.          या योजनेमार्फत महिला खातेदार स्वतःसाठी किंवा पालक आपल्या अल्पवयीन मुलीच्या नावे कमीत कमी रू. 1 हजार रू. ते जास्तीत जास्त रू. 2 लाख जमा करून वार्षिक 7.5 टक्के त्रैमासिक चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळवू शकतात. त्यासाठी खातेदाराला आपले आधार कार्ड , पॅन कार्ड , 2 पासपोर्ट साईज फोटो आदी कागदपत्रे सादर करावे लागतात. खातेदार दि. 31 मार्च 2025 पर्यंत दोन खात्यांमध्ये 3 महिन्यांचे अंतर ठेवून खाते काढू शकतो.         महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व डाक कार्यालयात “ नारी शक्ती ” महिला बचतपत्र अभियानही राबविण्यात येत आहे.         अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील सर्व महिलांनी महिला सन्मान बचतपत्र योजनेत सहभागी होण्यासाठी जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा.     ०००                      

गायी-म्हशींमधील वंध्यत्व निवारण्यासाठी अभियान

  गायी-म्हशींमधील वंध्यत्व निवारण्यासाठी अभियान   अकोला, दि. २८   : शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गायी-म्हशींमध्ये उद्भवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी वंध्यत्व निवारण अभियानाला जिल्ह्यात   सुरुवात झाली आहे. मोहिमेत दि. १९ डिसेंबरपर्यंत गावोगाव शिबिरांद्वारे गायी-म्हशींची तपासणी व उपचाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे यांनी आज सांगितले.   राज्यातील पैदासक्षम गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के आहे. राज्यात वंध्यत्व असलेल्या व माजावर न येणा-या गाई-म्हशींची संख्या सुमारे ४० लाख आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात दुधाळ गाई-म्हशींची दूध उत्पादनक्षमता कमी आहे. त्यामुळे गावोगाव वंधत्व निवारण शिबिर घेण्यात येणार आहे.   शिबिरात पशुंचा आहार व स्वास्थ्य, तसेच पशुधनाची वंध्यत्व तपासणी करून निदान करण्यात येईल. जंत, गोचिड, गोमाशा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुधनावर, तसेच गोठ्यामध्ये नियमितपणे औषधी फवारणी, तसेच गाई-म्हशींमध्ये नियमित कालांतराने जंतनाशकाचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असे डॉ. बु

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

  अवेळी पावसाने शेतीचे नुकसान नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश अकोला, दि. २८ : जिल्ह्यात दि. २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या अवेळी पावसाने शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानाबाबत पंचनामे व सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. जिल्ह्यात अवेळी पावसाने शेती व फळपिकांच्या नुकसानाबाबत सविस्तर पंचनामे व सर्वेक्षण करावे. तालुकास्तरावर संयुक्त स्वाक्षरीचा अंतिम अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.     अवेळी पावसाने अंदाजे ४ हजार ६०८ हे. शेतजमीनीचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. अकोला तालुक्यात ४ हजार ५७६ हे. क्षेत्रावर गहू, हरभरा आदी पिकांचे , तर तेल्हारा तालुक्यात ३२ हे. वर भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बाळापूर तालुक्यात गायगाव शिवारात वारोडी बु. (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील इसाराम बिचकुले, तान्हाजी गोरे, सोना गजानन भिसे, श्यामराव बिचकुले आदींच्या मालकीच्या २० मेंढ्या दगावल्या. पातूर तालुक्यातील वहाळा येथील सारंगधर

मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण; जिल्ह्यात १५ मतदान केंद्रांची वाढ विविध कार्यालये व संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध

  मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण; जिल्ह्यात १५ मतदान केंद्रांची वाढ विविध कार्यालये व संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध अकोला, दि. २८ : छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावाला भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात १५ मतदान केंद्रे वाढली असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या एकूण १ हजार ७१९ झाली आहे. जिल्ह्यात यापूर्वी १ हजार ७०४ मतदान केंद्रे होती. पुनरीक्षण पूर्व उपक्रमात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करताना विविध प्रशासकीय कारणास्तव १५ केंद्रांची वाढ प्रस्तावित करण्यात आली. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. सर्व मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदमी कार्यालये, तहसील कार्यालये, दुय्यम निबंधक कार्यालये, पोलीस ठाणे, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती कार्यालये, गटविकास अधिका-यांमार्फत सर्व ग्रामपंचायती आदी ठिकाणी नागरिकांना अवलोकनार्थ प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांनादेखील यादीची इंग

‘सखी’चा संकटग्रस्त महिलांना आधार आतापर्यंत ३८५ संकटग्रस्त महिला व बालिकांना मदत

इमेज
  ‘सखी’चा संकटग्रस्त महिलांना आधार आतापर्यंत ३८५ संकटग्रस्त महिला व बालिकांना मदत   अकोला, दि. २८ : येथील सखी वन स्टॉप सेंटरकडून आतापर्यंत ३८५ संकटग्रस्त महिला व बालिकांना मदत पुरविण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील महिलांचा समावेश आहे. महिलाभगिनींनी अन्याय   सहन न करता त्याविरोधात खंबीरपणे उभे राहावे. कुठल्याही संकटात न घाबरता निर्भिडपणे तक्रार मांडावी, असे आवाहन केंद्राच्या प्रशासक अॅड. मनिषा भोरे यांनी केले आहे.                         समाजात आढळून येणाऱ्या संकटग्रस्त महिलांना आधार देण्यासाठी महिला व बाल विकास विभागांतर्गत सखी वन स्टॉप सेंटर चालवले जाते. त्याद्वारे कौटुंबिक हिंसाचार , बलात्कार , लैंगिक छळ , अॅसिड हल्ला , बाल अत्याचार , बालविवाह , अनैतिक वाहतूक , अपहरण , सायबर गुन्हा   व इतर कोणत्याही प्रकारे अत्याचारग्रस्त महिलांना मदत दिली जाते. त्यात केंद्राद्वारे समुपदेशन , कायदेविषयक मार्गदर्शन , पोलीस मदत , वैद्यकीय मदत व पाच दिवसीय तात्पुरता निवारा देण्यात येतो. जिल्हा स्त्री रुग्णालयात वॉर्ड क्र. ७ मध्ये सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित आहे.    

विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय आज घेणार मतदार यादीचा आढावा

  विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय आज घेणार मतदार यादीचा आढावा   अकोला, दि. २८   : छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात मतदार यादी निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्या बुधवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी मतदार यादीविषयक कामांचा आढावा घेणार आहेत.   मतदार यादी निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व संसद सदस्य, विधानसभा सदस्य व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चेसाठी बैठक बुधवारी दु. ३ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात होईल. मतदार यादीतील नोंदणी बाबत आक्षेप व इतर तक्रारींच्या अनुषंगाने यावेळी चर्चा होईल. मतदार यादी निरीक्षक या दिवशी जिल्ह्यातील मतदार केंद्रांनाही भेटी देणार आहेत, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले.     सहाय्यक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत म्हस्के यांची मतदार यादी निरीक्षकांचे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परांडेकर यांनी दिली.   ०००

जिल्ह्यात ‘विकसीत भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दाखविली हिरवी झेंडी

इमेज
  जिल्ह्यात ‘विकसीत भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ     जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दाखविली हिरवी झेंडी   अकोला, दि. 23 : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती, तसेच लाभ जिल्ह्यातील गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी ‘विकसीत भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ आज येथे झाला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यात्रारथाला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.   जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील,   उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, नोडल अधिकारी सूरज गोळे, आयुष्मान भारत योजना समन्वयक डॉ.अश्विनी खडसे, समन्वय अधिकारी गजानन महल्ले प्रकाश वैद्य, सचिन कोकणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यात्रेद्वारे जिल्ह्यात दि. 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी पोहोचून गरजूंना माहिती व लाभ मिळवून देण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील खेडोपाडी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहोचणार आहे. त्यासाठी चार सुसज्ज वाहने ठिकठिकाणी पोहोचणार आहेत. सर्व विभागांचा सहभाग या उपक्रमात आहे. योजनांसाठी पात्र असूनही अद्यापपर्यंत लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठ

अमरावती- कुरणखेड- शेळद महामार्गाचे लोकार्पण जिल्ह्यात महत्वाच्या पुलांसाठी तीनशे कोटींचा निधी अकोट- अकोला रस्त्याचे काम चार महिन्यात पूर्ण करणार - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

इमेज
अमरावती- कुरणखेड- शेळद महामार्गाचे  लोकार्पण जिल्ह्यात महत्वाच्या पुलांसाठी तीनशे कोटींचा निधी अकोट- अकोला रस्त्याचे काम चार महिन्यात पूर्ण करणार -          केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी अकोला, दि. २३ : जिल्ह्यात शेगाव- देवरी फाटा मार्गावर पूर्णा नदीवर मोठ्या पुलासाठी १०० कोटी, बार्शीटाकळी येथील रेल्वे उड्डाण पुलासाठी १३५ कोटी, तसेच अकोला-अकोट- गांधीग्राम रस्त्यावर पूर्णा नदीवर पुलासाठी ७० कोटी रू. निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मूर्तिजापूर येथे केली. अकोट- अकोला रस्त्याचे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते अमरावती- कुरणखेड- शेळद महामार्गाचे लोकार्पण व कारंजा- खेर्डा- मूर्तिजापूर या चौपदरी महामार्गाचे भूमिपूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे,  भावना गवळी, आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, प्रताप अडसड, वसंत खंडेलवाल, राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी अजित कुंभार आदी यावेळी उपस्थि