पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जि.प.,पं.स. पोटनिवडणुक: मतदान, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

इमेज
  अकोला, दि.३०(जिमाका)- जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची सज्जता झाली आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निवडणुक पूर्व तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोखर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहा सराफ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच सर्व निवडणुक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या२८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीच्या मतदानासाठी तेल्हारा तालुक्यात ७७, अकोट-८१, मुर्तिजापूर-८३,   अकोला -८५, बाळापूर -७४,   बार्शी टाकळी – ४९, पातुर-३९ असे एकूण ४८८ मतदान केंद्र आहेत. ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी एकुण ४४ झोन तयार करण्यात आले आहेत. ही सर्व निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६०७ केंद्राध्यक्ष, १८२१ मतदान अधिकारी असे एकूण २४२८ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त

लिंगभेदाविरुद्ध जनजागृतीत नागरिकांनीही सहभागी व्हावे - मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार

इमेज
    अकोला , दि.३० ( जिमाका)-   मुलींच्या जन्माचे स्वागत करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. मुलींना समानतेची वागणूक मिळावी यासाठी लिंगभेदा विरोधात जनजागृती मोहिम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे, या मोहिमेत नागरिकांनीही सहभाग व्हावे , असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या सभागृहात कन्यादिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार हे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखरे , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार - वसो , जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक   डॉ. आरती कुलवाल , बालरोग तज्ज्ञ डॉ. साधवानी , मनपाच्या सहायक वैद्यकीय अधिकारी   डॉ. अस्मिता पाठक , शुभांगी ठाकरे आदी उपस्थित होते. कन्यादिन उत्सव कार्यक्रमात सौरभ कटीयार म्हणाले की , समाजात होत असलेले   गर्भावस्थेतील लिंग निदानाचे प्रकार निंदनीय आहेत. अशा घटनाना आळा घालण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कडक कार्यवाही   करा. आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्यातच कोरोना का

असंघटीत कामगारांनी ‘ई-श्रम पोर्टल’ वर नोंदणी करा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

इमेज
  अकोला , दि. 30 (जिमाका)- केंद्र शासनाव्दारे   असंघटीत कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी   ‘ ई-श्रम पोर्टल ’ ची सुरुवात करण्यात आली आहे. या राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटीत कामागारांकरिता सामाजीक सुरक्षा योजना अंमलात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील असंघटीत कामगारांनी   ई-श्रम पोर्टलवर  नोंदणी करावी , असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक आज पार पडली. याबैठकीस सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने ,   शासकीय कामगार अधिकारी गौरव नालिंदे , दुकान निरीक्षक विनोद जोशी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक आर.बी. हिवाळे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापक कै.जा.सोळंके ,   महिला व बाल विकास विभागाचे समुपदेशक सचिन घाटे , महानगरपालिकेचे प्रतिनिधी संगिता ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अरोरा यांनी विटभट्टी ,   हॉटेल ,   बांधकाम अशा ठिकाणी बाल कामगार आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांवर   बाल मजुरी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच असंघटित क्षेत्रातील विडी काम

आरटीपीसीआर आणि रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

  अकोला , दि.30 ( जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 343 अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि.2 9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57860(43254+14429+177) झाली आहे , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शुन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 322347 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 318726 फेरतपासणीचे 402   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3219 नमुने होते. आजपर्यंत एकूण 322347 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 2 79093 आहे , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शुन्य पॉझिटिव्ह आज   द

डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचा उपक्रम: मॉम ऑरगॅनिक मार्केट दि.२ पासुन सुरु

  अकोला, दि.३०(जिमाका)- शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन  मार्फत  शनिवार दि.२ ऑक्टोबर पासून अकोला येथे सेंद्रीय शेतीमालाच्या विक्रीसाठी ‘मॉम ऑरॅनिक मार्केट’ सुरु होणार आहे.येथील  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) ऑफिस परिसर, आरडीजी कॉलेज समोर, मुर्तिजापुर रोड येथे हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक आरीफ शाह यांनी दिली आहे.              डॉ. पंजाबराव जैविक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती   करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. त्याअंतर्गत शेतकरी गटांचे संघटन केले जाते. तसेच क्षमता बांधणी करुन शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाचे   विपणनासाठी सुविधा दिली जाते.   या मिशनमध्ये   ७५०० शेतकरी सहभागी असून   त्यांचे ३९५ शेतकरी गट व त्या गटांच्या ३६ कंपन्या स्थापित झाल्या आहेत. या सर्व कंपन्यांचा एकत्रित महासंघ तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांनी उत्पादीत सेंद्रीय शेतमालाला बाजारपेठ मिळावी या हेतूने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.याद्वारे नागरिकांना शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या प्रमाणित केलेली सेंद्रीय उत्पादनांची खरेदी करता येण

आरटीपीसीआर आणि रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

  अकोला , दि. 29( जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 305 अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि.2 8) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57860(43254+14429+177) झाली आहे , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शुन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 322004 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 318383 फेरतपासणीचे 402   तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3219 नमुने होते. आजपर्यंत एकूण 322004 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 278 750 आहे , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शुन्य पॉझिटिव्ह आज

शासकीय महिला वसतीगृहातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

इमेज
  अकोला , दि. 29 (जिमाका)- महिला व बालविकास विभाग व राधा कि सन तोष्णीवाल आ र्यु वेदीक वैद्यकीय महा विद्यालय च्यावतीने जागृती शासकीय महिला राज्यगृह संस्थेतील सर्व महिलांची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन मंगळवारी (दि.28) रोजी पार पडले. या शिबीरात आरोग्य तपासणी , आरोग्याची काळजी , वैयक्तिक स्वच्छ तेविषयी महिलांना मार्गदर्शन , त्यांच्या सम स्यां चे निराकरण , त पासणी सोबतच आवश्यकतेनुसार औषधे देण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने महिला राज्य गृहात आधारकार्ड शिबीर , को वि ड लसी करण व आरोग्य तपासणी आ दी उपक्र मां चे आयोजन करण्यात आले. या आयोजनासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे , जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर , सुनिल लाडुलकर , स्ञी रोग विभाग प्रमुख डॉ. मनिषा देवकाते , शासकीय महिला राज्यगृह संस्थेचे अधीक्षक रायबोले , सुरज तिवारी , चोमडे   यांनी परिश्रम घेतले. 0000000

अतिवृष्टीचा इशारा

  अकोला , दि. 29( जिमाका)-   हवामान विभाग ,   नागपूर यांच्या संदेशानुसार पुढील 24 तासामध्ये अतिवृष्टी व विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच यादरम्यान ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वारा वाहण्याची शक्यता वर्तविलेली आहे. नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी , नाले , ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु    असतांना किंवा पूर परिस्थिती असतांना पूर पाहण्यास गर्दी करु नये. पुलावरुन पाणी वाहत असतांना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प 100 टक्के जलसाठा झालेला असुन सर्वच प्रकल्पामधुन पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. तसेच    संबंधित अधिकारी , कर्मचारी , मंडळ अधिकारी , तलाठी , ग्रामसेवक , कृषी सहायक , आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थितीत राहुन योग्य ती   दक्षता घ्यावी ,   असे निर्देश जिल्हाधिकारी   निमा अरोरा   यांनी दिले आहेत.         000000

आधार कार्ड-मोबाईल लिंकींगसाठी डाक विभागाची विशेष मोहिम

  अकोला , दि. 29 (जि मा का)- डाक विभागा च्या इंडिया पोस्ट पेमेंट बॅं केमार्फत ग्रामीण भागात दि. 28 सप्टेंबर ते 1 ऑ क्टोंबर दरम्यान आधार कार्डला मोबाईल लिंक करण्या साठी मोहिम राबवण्यात येत आहे. पोस्टमन किंवा जवळील पोस्ट ऑफिस येथे आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पोस्ट विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी केले आहे. अकोला डाक विभागातील 45 उपडाकघर तसेच 354 शाखा डाक घरांमधून ही सुविधा दिली    जाणार आहे. ही मोहिम ग्रामपंचायत स्तरावर देखील राबविण्यात येणार आहे.   नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व मोबाईल नंबर असणे आवश्यक रा ही ल. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी न जि कच्या टपाल कार्यालयात किंवा आपल्या क्षेत्रातील पोस्टमन यांच्याशी संपर्क सा धावा.या सेवेकरीता पन्नास रुपये शुल्क आकारण्यात आले आहे, अशी माहिती डाक विभागाव्दारे देण्यात आली आहे. लिंक करण्याचे फायदे : पॅन कार्ड , ड्रायव्हिंग लायसन , पासपोर्ट करीता, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्जाकरीता, बँक तसेच डिमॅट खाते ओपन करण्यास

यु.पी.एस.सीः‘कठीण’ आहे पण ‘अशक्य’ नाही; जिल्ह्यातील यशस्वी उमेदवार आश्विन राठोड यांच्यासोबत संवाद

इमेज
    (अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेले आश्विन   राठोड यांनी नुकतेच यु.पी.एस.सी परीक्षेत यश संपादन केले. या परीक्षेबाबत तसेच या यशापर्यंत त्यांना नेणारा परीश्रमांचा प्रवास जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी केलेली बातचीत.)   प्रश्न : आपण आय.ए.एस. व्हावे असा विचार मनात कधी विचार आला व त्याकरीता   सुरुवातीपासुन काय नियोजन केले ? उत्तर : शालेय शिक्षण घेत असतांना मी आय . पी . एस . होण्याचे स्वप्न बाळगून होतो. पुढे बी . एस . सी करत असतांना   व युपीएससी प री क्षेची   पू र्व तयारी करताना आय . ए .एस. होण्याचे मनापासून   ठरविले. बी . एस . सी . अभ्यासासोबतच यु . पी . एस . सी प री क्षेची    पुर्वतयारी सुरु केली. यासाठी बेसीक अभ्यास, भरपूर वाचन व सरावावर भर दिला.   प्रश्न : यु.पी.एस.सी. परीक्षेकरीता कशाप्रकारे पू र्व तयारी केली ? उत्तर : यु.पी.एस.सी. करीता स्वत:मध्ये विश्वास अस णे आवश्यक आहे. विषया च्या अवास्तव वाच ना पेक्षा मुलभूत अभ्यासक्रम व माध्यमावर भर देवून जास्तीत जास्त सराव केला.   प्रश्न : आपण कोणत्या शाखेतून शैक्षणिक अर्हता पूर्ण केली. या अभ्यासक्रमाचा यु.पी.एस.सी

जिल्ह्यात पुरस्थिती;प्रशासकीय यंत्रणा सज्ज

            अकोला , दि. २८ (जिमाका)- जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात २५.१ मिमि इतके पर्जन्यमान झाले. जिल्ह्यात जवळपास सर्वच नद्या नाल्यांमधुन पूर्ण क्षमतेने पाणी वाहत असून  गेल्या २४ तासात कोणतीही आपत्तीजनक स्थिती निर्माण झालेली नाही. तथापि, प्रशासकीय यंत्रणा सज्ज व सतर्क असून आवश्यकतेनुसार आपत्ती व्यवस्थापन तसेच शोध बचाव कार्यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय खडसे यांनी दिली.   जिल्ह्यात   अकोला तालुक्यातील अकोला ते अकोट हा रस्ता सुरु आहे, तसेच अकोला- म्हैसांग- दर्यापूर हा मार्गही सुरु आहे. तालुक्यातील सर्व नद्यांना व नाल्यांना पूर आहे. बार्शी टाकळी तालुक्यातही   पुरस्थिती आहे, मात्र कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून   दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास   ३५२.८२ क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दगड पारवा प्रकल्पातून   २.०५ क्युमेक विसर्ग होत आहे. मोर्णा तसेच काटेपूर्णा नदीला पूर आहे. अकोट तालुक्यात सर्व नदी ना

अन्न व्यावसायिकांसाठी 1 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान परवाना व नोंदणी मोहिम

  अकोला , दि. 28 (जिमाका)- अन्न सुरक्षा व मान के कायद्यानुसार अन्न व्यवसा यि कांना परवाना घेणे किंवा  नोंदणी   करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने अन्न व्यावसायिकांना जिल्हास्तरावर परवाना व नोंदणी करण्या करीता अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे  दि. 1 ते 7 ऑक्टों बर विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त सा. दे. तेरकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील ज्या अन्न व्यवसा यि कांनी अद्या प पर्यंत परवाना घेतला नाही अथवा नोंदणी केली नाही अशा ं करीता ही मोहिम आहे. ज्या अन्न व्यवसा यि कांची वार्षिक उलाढाल 12 लाखाच्या आत आहे असे अन्न व्या वसा यि क , यात प्रामुख्याने हातगाडीवर अन्नपदार्थ विक्री करणारे विक्रे ते , चहा स्टॉलधारक , फळे व भाजीपाला विक्रेते , पाणीपूरी , भेळपूरी , वडापाव स्टॉलधारक व तत्सम किरकोळ विक्रेते यांचा समावेश होतो. तसेच ज्या अन्न व्या वसा यि कांची वार्षिक उलाढाल ही 12 लाखापेक्षा जास्त आहे , अशा अन्न आस्थापनांनी परवाना प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. याच गटातील व्यावसायिकांनी केवळ नोंदणी घेतली असेल त्यांनी परवानासाठी