पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा 30 सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

अकोला,दि. 31 (जिमाका)-   शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 16 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या बालनाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्था/शाळा/विद्यालयांकडून दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. 17 व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 16 डिसेंबर पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच द्वितीय दिव्यांग बालना ट्य स्पर्धेची अंतिम फेरी जानेवारी 2020 मध्ये एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.             बालनाट्य व दिव्यांग बालना ट्य स्पर्धेकरीता एक हजार रुपये इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्यसंस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी बालनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य सं

गणेश स्थापना व विसर्जन दिनी मद्य विक्री बंद

             अकोला,दि. 31 (जिमाका)-   गणेश चतुर्थी   हा उत्सव येत्या दोन सप्टेंबर पासून सुरु  होत आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून  गणेश स्थापना दिवसव व विसर्जन कालावधीत जिल्ह्यातील मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.               सोमवार दि. 2 सप्टेंबर रोजी   ( श्रीगणेश चतुर्थी ) संपुर्ण दिवस बंद मद्यविक्री   अनुज्ञप्त्या बंद . दि . 12   ते 14 सप्टेंबर   श्री गणेश विसर्जन पर्व या कालावधीत ज्या दिवशी ज्या गावातील श्री विसर्जन होणार आहे त्या दिवशी त्या गावातील मद्यविक्री संपुर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे   उल्लंघन केल्यास त्यांचे विरू द्ध   कायदेशीर कार्यवाही   करण्यात येईल, असे ही   आदेशात नमुद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात जनजागृतीसाठी प्रचार रथ मार्गस्थ: किटकनाशक वापराबाबत जनजागृतीसाठी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी पापळकर

इमेज
अकोला,दि. 31 (जिमाका)- फवारणी करताना होणाऱ्या विषबाधा रोखण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये किटकनाशक वापराबाबत जनजागृती आवश्यक आहे.त्यासाठी शासनासोबत किटकनाशक कंपन्यांनी जनजागृतीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी आज येथे केले. कीटकनाशके फवारणी करताना   शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती व्हावी यासाठी कृषि विभाग व यूपीएल लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने एका प्रचार रथाद्वारे   केली जाणार आहे. या प्रचार रथाला आज सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते   हिरवी झेंडी दाखवून   मार्गस्थ करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून हा रथ जिल्ह्याभरात प्रचार करण्यासाठी मार्गस्थ झाला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, यूपीएल चे प्रबंधक प्रताप रणखांब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माहिती देण्यात आली की,   जिल्ह्यात तीन   प्रचार रथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. दरदिवशी चार गावात प्रचार रथ फिरणार असून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून ‘सेफ्टी किट’ चे वाटप करण्यात ये

जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा- जिल्हाधिकारी पापळकर

इमेज
अकोला,दि. 31 (जिमाका)- किटकनाशक फवारणी संदर्भात सुरक्षा उपाययोजनांबाबत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा, असे निर्देश आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात किटकनाशक विषबाधा प्रकरणी संबंधित विभागांची आढावा बैठक पार पडली. यावेळी   निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, प्रताप रणखांब तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.   यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वाघ यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी कृषि विभागामार्फत प्रयत्न होत आहेत. त्या अंतर्गत जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून   आतापर्यंत शासनामार्फत प्रत्येक आरोग्य केंद्रात आयोजित   आरोग्य तपासणी शिबिरात 220 शेतकरी- शेतमजूरांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे.   तसेच जिल्ह्यात किटकनाशक   उत्पादक- वितरकांमार्फत 8 हजार सुरक्षा किट वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 50 हजार सुरक्षा किट

मतदान स्वयंसेवक जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित

इमेज
          अकोला,दि. 29 (जिमाका)- लोकसभा निवडणूकीत ज्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी मतदान स्वयंसेवक म्हणून कामगिरी केली त्यांना आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्वयंसेवकांनी व विद्यार्थ्यांनी  आगामी विधानसभा निवडणूकीतही स्वयंसेवक म्हणून कर्तव्य बजावण्याची प्रतिज्ञा यावेळी घेतली. येथील प्रभात किड्स स्कूल येथे हा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा क्रीडा अधिकारी   आसाराम जाधव, डॉ. गजानन नारे, वंदना नारे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींना जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.   तसेच त्यांनी सामुहिकरित्या प्रतिज्ञा घेतली. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून केलेल्या कामाचे कौतूक केले.

चंद्रपुर येथे ऑक्टोबर महिन्यात सैन्य भरती अकोला जिल्ह्यासाठी 18ऑक्टोबरला नियोजन

अकोला,दि. 29 (जिमाका)- मिल्ट्री भरती कार्यालय नागपूर  मार्फत चंद्रपूर येथे दि . 12 ते 23  ऑ क्टोबर या दरम्यान सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती दरम्यान अकोला जिल्ह्या तील उमेदवारांसाठी दि. 18 ऑ क्टोबर रोजी भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सेवारत सैनिक/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी/युध्द विधवा पत्नी /विरमाता/विरपीता व जिल्ह्यातील युवक , पात्र उमेदवारांनी  या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक  कल्याण अधिकारी आर ओ लठाड यांनी के ले आहे.

अन्न व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र/ नुतनीकरणासाठी ऑनलाईन सुविधा

अकोला,दि. 29 (जिमाका)-   अन्न सुरक्षा व मान के कायदा 2006, नियम व नियमने 2011 ची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात दिनांक 05 ऑगष्ट , 2012 पासून सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व अन्न व्यावसायिकांना परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. नोंदणी प्रमाणपत्र व नुतनीकरणासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.ज्या अन्न व्यावसायिकांनी आपले परवाना नोंदणी केलेली नसेल अथवा नुतनीकरण करावयाचे असेल वा पदार्थ वा व्यवसायाचा प्रकार आदी बदल करावयाचे असतील त्यांनी दि. ३० सप्टेंबरपर्यंत आपली नोंदणी, नुतनीकरण आदी प्रक्रिया पूर्ण करुन घ्याव्यात असे आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, अकोला व वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र घेतलेली आहेत. मात्र परवाना घेणे आवश्यक असताना त्या ऐवजी नोंदणी प्रमाणपत्र घेतले आहेत. तसेच परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतरही विना परवाना/नोंदणी प्रमाणपत्र व्यवसाय स सुरु आहेत . परवाना/नोंदणी मुदतीत नुतनीकरण न करता ते विलंब

कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे सामुहिकरित्या एकिकृत कीड व्यवस्थापन

अकोला,दि. 29 (जिमाका)-     मागील आठवड्यात तेल्हारा तालुक्यातील दानापूर व अकोला तालुक्यातील अन्वी येथे लवकर पेरणी केलेल्या काही शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर पिक फुलोरा अवस्थेत असतांना गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्या मुळे या किडीचा प्रादुर्भाव पुढील काही दिवसात इतरही भागामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.              हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शेतक ऱ्यां नी कापूस पिक नियमित निरीक्षणात ठेऊन सामुहिकरित्या उपयोजना कराव्या . त्या याप्रमाणे- १)      कापूस पिक नियमित निरीक्षणात ठेवावे. २)      कापूस पिकामध्ये निरीक्षणासाठी एकरी दोन कामगंध सापळे व व्यवस्थापना साठी एकरी आठ कामगंध सापळे शेतामध्ये लावावे. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून कीटकनाशकाच्या मिश्रित पाण्यात टाकून   नष्ट करावे. ३)      कापूस पिकात आढळलेल्या डोम कळ्या प्रादुर्भाव ग्रस्त पात्या , फुले व बोंडे हाताने तोडून त्यातील अळी सह कीटकनाशक मि श्रीत पाण्यात टाकून नष्ट करावे. ४)    कापूस पिकावर पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधक उपाय योजना म्हणून करावी. ५)    

सोयाबीन पिकावरील किडीचे सामुहिकरित्या एकीकृत कीड व्यवस्थापन

अकोला,दि. 29 (जिमाका)-      मागील आठवड्यात अकोला तालुक्यातील देवळी  व बाळापूर  तालुक्यातील सातरगाव येथे उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून आला पिक फुलोरा अवस्थेत असतांना प्रादुर्भाव दिसून आला. त्या मुळे या किडीचा प्रादुर्भाव पुढील काही दिवसात इतरही भागामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.              त्या करिता शेतक ऱ्यां नी कापूस पिक नियमित निरीक्षणात ठेऊन सामुहिकरित्या उ पाय योजना करून या किडीचा प्रादुर्भाव वेळीच रोखणे शक्य होईल. शेतकरी बांधवानी सोयाबीन   पिकातील उंट अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या प्रमाणे उपाययोजना कराव्यात. १)      निंदनी व कोळपणी वेळेवर करावी. २)      नत्रयुक्त खताचा समतोल वापर करावा. ३)      हेक्टरी २०-२५ पक्षी थांबे उभारावे. ४)    पाने खाणारी अळी , स्पोडोप्टेरा किडीच्या व्यवस्थापणासाठी किडीच्या प्रदुर्भावानुसार हेक्टरी १५ ते १८ कामगंध सापळे शेतात लावावे. ५)     चक्रीभुंगा व खोडमाशी प्रधुर्भाव ग्रस्त झाडे , पाने , फांद्या यांचा आतील किडी सह नायनाट करावा. ६)        पाने खाणाऱ्या अळ्या , चक्रीभुंगा आणि खोड माशी या किडींनी अंडी घालू नये या करिता सु

केलपाणी ग्रामपंचायत निवडणुकः मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद

अकोला,दि. 29 (जिमाका)-   अकोट तालुक्यातील नव्याने स्थापित ग्रामपंचायत केलपाणीच्या  निवडणुकीसाठी निवडणुक कार्यक्रमानुसार  शनिवार, दि. 31 रोजी मतदान व मंगळवार दि . 3 सप्टेंबर रोजी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.             मा.राज्य निवडणुक आयोगाचे निर्देशा नुसार, शांतता व सुव्यवस्था अबाधित राख ण्यासाठी निवडणुकीच्या एक दिवस   अगोदर व निवडणुकीच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी ज्या गावामध्ये   ग्रामपंचायत निवडणुक आहेत त्या ठिकाणच्या सर्व किरकोळ व ठोक मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश   जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार, केलपाणी ता. अकोट ग्रामपंचायतीमध्ये मतदानाच्या अगोदरचा दिवस दिनांक 30/8/2019 व दि.31/08/2019 रोजी मतदान होणार आहे. तसेच मतमोजणी ही संबधीत तहसिल कार्यालय अकोट येथे दिनांक 03/09/2019 रोजी होणार असल्याने ज्या दिवशी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्या ठिकाणचे सर्व किरकोळ देशी/ विदेशी   दारु दुकाने / अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे बंद राहतील असे आदेश   देण्यात आले आहेत,या आदेशाचे उल्लंघन करण्या ऱ्यां वर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल , असेही कळवि

सार्वजनिक गणेश मंडळासाठी सजावट स्‍पर्धा; मतदार जनजागृतीपर देखाव्यांना विशेष पारितोषिक

          अकोला,दि. 29 (जिमाका)- अकोला जिल्‍हा प्रशासनाने यंदाही सार्वजनिक गणेश मंड ळांसाठी सजावट स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. या स्‍पर्धेमध्‍ये गणेश मंडळांनी सहभागी होऊन राष्‍ट्रीय व सामाजिक संदेश रुजवणारे जनजागृती पर देखावे सादर करुन सहकार्य करावे , असे आवाहन जिल्‍हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.              यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे की, समाजात विविध मानवी कल्‍याणाच्‍या संकल्‍पना रुजविण्‍याच्‍या दृष्‍टीने पर्यावरण पूरकता , स्‍वदेशी जागर , साक्षरता , व्‍यसनमुक्‍ती , स्‍त्री भृण हत्‍या , स्‍वच्‍छ भारत अभियान , ध्‍वनि प्रदुषण , जल संवर्धन , उर्जेचा वापर , कायदा व सुव्‍यवस्‍था , राष्‍ट्रीय एकता व एकात्‍मता , मतदार जनजागृती इ. विविध संकल्‍पना मंडळांनी देखाव्‍या द्वा रे सादर करणे अपेक्षित आहे. त्‍याकरिता गुणांकन निश्चित केले आहे. तसेच स्‍पर्धेचे मूल्‍यमापन करण्‍यासाठी प्रशासनाच्‍या वतीने मूल्‍यमापन समिती गठीत करण्‍यात आली आहे. स्‍पर्धेत सहभागी होण्‍याकरिता शैक्षणिक गुणवत्‍ता विकास कक्ष , जिल्‍हाधिकारी कार्यालय , अकोला येथून नोंदणी अर्ज प्राप्‍त करुन पूर्ण भरुन गुरुव

पालकमंत्री ना.डॉ. रणजित पाटील यांचा जिल्हादौरा

अकोला,दि.28(जिमाका):- राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील हे गुरुवार्फ़ दि.29 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्याचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे - गुरूवार,   दि.   29 ऑगस्ट 2019   रोजी अकोला येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस    उपस्थिती, अकोला येथे मुक्काम.

किटकनाशके वापरताना घ्यावयाची काळजी

इमेज
                           अकोला , दि. 28 (जिमाका)- सध्याच्या हवामानातील बदलामुळे पिकांवर किड रोगांचा  प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. किड रोगांच्या नियंत्रणासाठी  शेतक ऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात  किटकनाशकांची  फवारणी  करण्यात येते. मात्र असुरक्षीत  हाताळणीमुळे शेतक ऱ्यां ना  विषबाधा    होण्याच्या घटना घडतात. या घटना घडू नये म्हणून किटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती-             लेबलमधली दिशानिर्देश   काळजीपुर्वक   वाचावेत आणि त्यांचे   अनुकरण करावे. त्यावरील चेतावणी आणि   सावधगिरीकडे विशेष लक्ष द्यावे, किटकनाशकांच्या   डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे   काळजीपुर्वक   लक्ष   द्यावे. लाल रंगाचे चिन्ह/खुण   असलेली औषधे सर्वात अधिक विषारी असुन त्यानंतर पिवळा , निळा व हिरवा असा क्रम लागतो, किटकनाशके थंड, कोरड्या आणि सुरक्षित   जागी कुलुप   लावुन   मुलांपासुन दुर ठेवावीत, किटनाशके नेहमी त्यांच्या मुळ डब्यात साठवावीत   आणि   कधीही ती खाद्य आणि खाद्य सामग्रीसह साठवू नये, किटकनाशकांचे रिकामे डबे, बाटल्या, खोकी इत्यादीचा   पुर्नवापर   करू नये,   फवारणी करीता  

शेतकरी/शेतमजूर यांच्या साठी आज (दि.29) प्रत्येक तालुक्यात मार्गदर्शन कार्यशाळा

        अकोला , दि. 28 (जिमाका)-   पिकांवर किटकनाशक फवारणी करतांना काय काळजी घ्यावी याबाबत शेतकरी/शेतमजु रांसाठी प्रत्येक तालुक्यात गुरुवार दि. 29 रोजी सकाळी 11 वाजता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत रोगांच्या   प्रादुर्भावानुसार कोणकोणती शिफारस केलेली औषध, एकत्र मि स ळावेत, औषधांचे मिश्रण   तयार करतांना   व त्याचा वापर   किती वेळात करावा ? याबाबत   कृषि विद्यापिठातील त ज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळांचे ठिकाण व मार्गदर्शक तालुकानिहाय याप्रमाणे-   अकोला येथे एमआयडीसी हॉल, अप्पु पुतळा चौक, अकोला- डॉ. सोनाळकर, बाळापूर तालुका निंबा फाटा, येथे डॉ. सुरज सातपुते-9657725859,   अकोट तालुका- पंचायत समिती हॉल, अकोट, डॉ. उपेंद्र कुलकर्णी-9881966496, तेल्हारा तालुका श्रीकृष्ण मंदिर, नगरपरिषद हॉल, डॉ. लांडे-7588962199, मुर्तिजापूर तालुका- कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृह, मुर्तिजापूर, डॉ. प्रशांत माने-9922881245, बार्शी टाकळी तालुका- पंचायत समिती हॉल, डॉ. भलकारे, पातुर तालुका- पंचायत समिती सभागृह, पातुर डॉ. अजय सदावर्ते 9657725697. जिल्ह्यातील जास्तीत जास्

विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना ‘सेफ्टी किट’विनामूल्य उपलब्धता व्हावी-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वाघ

इमेज
             अकोला , दि. 28 (जिमाका)- जिल्ह्यात शेतकऱ्यांना फवारणीसाठी किटकनाशके विक्री करतांना उत्पादक कंपन्यांनी विक्रेत्यांमार्फत सुरक्षा संच अर्थात ‘सेफ्टी किट’ विनामूल्य उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी आज येथे किटकनाशक उत्पादकांना व यंत्रणेला दिले. तसेच प्रतिबंधित किटकनाशके विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. येथील नियोजन सभागृहात आज जिल्ह्यातील किटकनाशक विक्रेते व उत्पादक यांच्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस अपर जिल्हाधिकारी   नरेंद्र लोणकर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे   विस्तार संचालक डॉ. डी.एम.मानकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे रोगशास्त्र व किटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. लांडे, डॉ. कुलकर्णी, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी नितीन लोखंडे, कृषि विकास अधिकारी   डॉ. इंगोले आणि कृषि सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष मानकर उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या किटकनाशक फवारणी करतांना   होत असल

पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याआधी पूर्वसुचना आवश्यक

अकोला , दि. 28 (जिमाका)- महाराष्ट्रातील सांगली , कोल्हापुर , सातारा व इतर जि ल्ह्यां मध्ये आलेल्या महापुरामुळे बाधित पुरग्र स्तांसाठी मदत / वर्गणी गोळा करणा ऱ्या मंडळांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41- क अन्वये विहीत नमुन्यात धर्मदाय उपायुक्तांना पुर्वसुचना देणे आवश्यक असून तसा अर्ज त्यांनी धर्मदाय उपायुक्तांच्या कार्यालयात द्यावा . अशा मंडळांना/ संस्थांना धर्मादाय उपआयुक्त किंवा सहाय्य्क धर्मादाय आयुक्त यांनी चौकशी केल्यानंतर अटी/शर्तीं च्या अ धी न राहुन दाखला देण्यात येईल. तसेच पुरग्रस्तांसाठी गोळा केलेल्या वस्तु/ रक्कमेची योग्य व गरजुंना मदत मिळणेकरीता सर्व मंडळांनी त्या वस्तु व रक्कमेचे वितरण जिल्हा धि कारी कार्यालयामार्फत अथवा त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्याच्या समन्वयाने किंवा निरीक्षणाखाली करावे, असे आवाहन धर्मदाय उपायुक्त अकोला यांनी केले आहे. संबधित मंडळांनी माहिती/ पुर्वसुचना देतांना सर्व सदस्यांच्या सहीचा ठराव असावा (हस्तलिखीत प्रत),पदाधिकाऱ्यांचे/सदस्यांचे ओळखपत्राची प्रत सोबत जोडावी. (फोटो आयडीची प्रत ओळख पटण्याजोगी असावी) जसे की, आ

गणेशोत्सव मंडळांना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची परवानगी अनिवार्य

अकोला , दि. 28 (जिमाका) - सार्वजनिक न्यासा व्य तिरी क्त गणेशोत्स व साजरा करणाऱ्या सर्व मंडळांना महाराष्ट्र सार्वजनिक वि श्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41- क अन्वये विहीत नमुन्यात संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्षरित्या संबधीत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात परवानगीसाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. हा अर्ज सर्व मंडळाना charity.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर सादर करता येईल.संकेतस्थळावर केलेल्या अर्जाचा निपटारा महाराष्ट्र सार्वजनिक वि श्वस्त व्यवस्था अधिनियमातील कलम 41 क उपकलम 2 अन्वये सात दिवसात करण्यात येईल. प्रत्यक्ष सादर केलेला अर्ज प्रा प्त झाल्यानंतर 15 दिवसा च्या आत निकाली काढण्यात येईल. या तरतुदीअंतर्गत देण्यात येणारे दाखले सहा महिन्यांकरीता वैध असतील, या कालावधीनंतर असे दाखले नुतनीकरण करण्यास ग्रा ह्य नसतील. सर्व गणेशोत्स व मंडळाना दाखला प्राप्त झाल्यापासुन त्या कालावधीनंतर 2 महिन्यांच्या आत लेखा परिक्षण अहवाल सादर करणे व उर्वरित रक्कम जमा करणे अनिवार्य आहे. गणेशोत्सव मंडळाने तरतुदीप्रमाणे परवानगी न घेतल्यास , महाराष्ट्र सार्वजनिक विश्व़स्त़ व्यवस्था अधिनियम,1950

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम: उमेदवारांनी कागदपत्रे जमा करावीत; अल्पसंख्याक विकास विभागाचे आवाहन

                         अकोला , दि. 28 (जिमाका)- अल्‍पसंख्‍याक विकास विभागामार्फत पोलीस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम २०१९-२० चे प्रशिक्षण अंतर्गत उमेदवारांची निवड करण्‍याकरीता जि ल्ह्या त दि . १९ ऑगस्‍ट रोजी एक दिवसीय कॅम्‍प लावण्‍यात आला होता. याअंतर्गत राज्‍यातील मुस्लिम , ख्रिचन , बौध्‍द , पारसी , जैन आणि शिख या अल्‍पसंख्‍याक समाजातील इच्‍छूक उमेदवारांना शासनामार्फत विनामूल्‍य पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे.             या प्रशिक्षणाकरीता इच्‍छूक उमेदवारांनी अर्ज सादर केले परंतू उमेदवारांनी आवश्‍यक कागदपत्र ( जातीचा दाखला , टि.सी. , १२ वी मार्कसिट , उत्‍पन्‍नाचा दाखला , रहिवासी दाखला , सेवायोजन कार्यालयांतर्गत नाव नोंदणी , ओळखपत्र ) सादर के ले ली नाहीत, अशा उमेदवारांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय अल्‍पसंख्‍याक विभाग येथे सात दिवसाचे आत आवश्‍यक कागदपत्राची छायांकित प्रत जमा करावी. अन्‍यथा आपला अर्ज अपात्र ठरविण्‍यात येईल या ची नोंद घ्‍यावी, असे अल्पसंख्याक विकास विभागातर्फे कळवि ण्यात आले आहे. 

महसुल राज्यमंत्री ना. संजय राठोड यांचा जिल्हा दौरा

            अकोला , दि. 27 (जिमाका)- राज्याचे महसुल राज्यमंत्री ना. संजय राठोड हे बुधवार दि. 28 रोजी   जिल्हा दौ-यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे.         बुधवार दि. 28 रोजी   मुर्तिजापुर जि. अकोला येथे आगमन व स्वागत सभेस उपस्थिती. मुर्तिजापुर येथून अकोलाकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह अकोला येथे आगमन व मुक्काम.         गुरूवार दि. 29 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथे आदित्य संवाद कार्यक्रमास उपस्थिती. अकोला येथुन बाळापुर कडे प्रयाण.   बाळापुर येथे पोस्ट ऑफिस समोर आयोजीत विजय संकल्प मेळाव्यास उपस्थिती. बाळापुर येथून बुलढाणाकडे प्रयाण करतील. 00000

जनसत्याग्रह संघटनेतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत रवाना

इमेज
            अकोला , दि. 27 (जिमाका)- सांगली, कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना   स्थानिक जनसत्याग्रह संघटनेतर्फे जमा करण्यात आलेली मदत वाहनाद्वारे आज जिल्हाधिकारी डॉ.जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आली. जनसत्याग्रह संघटनेने दि. 17 पासुन   जिल्ह्यातील   विविध भागात आवाहन करुन मदत गोळा केली होती. ही जमा झालेली मदत आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते   मदत वाहनाला हिरवी झेंडी दाखवून सांगली, कोल्हापूर कडे रवाना केली. यावेळी जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आसिफ अहमद खान,प्रभजितसिंघ बच्छेर, शेख आज़म,अमिन उर रहमान,इरफान खान,तौसीफ अहमद मोंटू,हैदर शाह,अंजार अहमद खान,मोहम्मद शाह,सै, ज़ाहिर,शेख जमील कुरेशी,शेख साबिर,सै शाहिद, शेख असलम,आदि पदाधिकारी उपस्थित होते. 00000