1860 अहवाल प्राप्त, 179 पॉझिटीव्ह, 489 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू
अकोला,दि.30(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 1860 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1681 अहवाल
निगेटीव्ह तर 179 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. दरम्यान 489 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एकाचा उपचारा
दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.29) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 60 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 55521(41724+13620+177) झाली आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी
दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 179 + रॅपिड
ॲन्टीजेन चाचणी 60= एकूण पॉझिटीव्ह- 239.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 266923 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 263951 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2662
नमुने होते. आजपर्यंत एकूण 266957 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह
अहवालांची संख्या 225233 आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
179
पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 179 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात 78 महिला व 101 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-19, अकोट-25, बाळापूर-13, बार्शीटाकळी- 14, पातूर-15, तेल्हारा-12
अकोला-81. (अकोला ग्रामीण-23, अकोला
मनपा क्षेत्र-58), दरम्यान काल (दि.29) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन
चाचण्यांच्या अहवालात 60 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण
संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
489 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 27, पीकेव्ही
जम्बो हॉस्पीटल येथील चार, जिहा
स्त्री रुग्णालय येथील चार, आर्युदिक
महाविदयालय येथील चार, उपजिल्हा
रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, युनिक
हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन
हॉस्पीटल येथील तीन, ओझोन
हॉस्पीटल येथील दोन, देवसार
हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल
रिजेन्सी येथील चार, बिहाडे
हॉस्पीटल येथील चार, स्कायलार्क
येथील तीन, क्रिस्टल हॉस्पीटल
येथील दोन, बबन हॉस्पीटल येथील
एक, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, आधार हॉस्पीटल येथील दोन, फातेमा
हॉस्पीटल येथील एक, इन्फीनीटी
हॉस्पीटल येथील एक, गोयंका
हॉस्पीटल येथील तीन, देशमुख
हॉस्पीटल येथील दोन, नवजीवन
हॉस्पीटल येथील एक, तर
होम आयसोलेशन मधील 410
असे एकूण 489 जणांना डिस्चार्ज
देण्यात आला,अशी माहिती जिल्हा
रुग्णालयातून देण्यात आली.
एकाचा मृत्यू
आज दिवसभरात एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बाळापूर वेस ता. पातूर येथील 45 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 24 रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
4610 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 55521(41724+13620+177) आहे. त्यात 1065 मृत झाले आहेत. तर 49846 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 4610 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा