पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुनिल टोमे यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

इमेज
  अकोला , दि. 31 (जिमाका)-   जिल्हा माहिती कार्यालयातील रोनिओ ऑपरेटर श्री . सुनिल टोमे यांना आज सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला . जिल्हा माहिती अधिकारी मिलींद दुसाने यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , पुष्प व भेट वस्तू देऊन श्री . टोमे यांच्या सपत्नीक सत्कार केला . यावेळी अकोला पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटनिस प्रमोद लाजुरकर, श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे, जेष्ठ पत्रकार अच्युतराव देशपांडे, मुकूंद देशमुख, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहायक सतिश बगमारे , कॅमेरामन हबीब शेख ,   लेखा लिपीक वर्षा मसने , लिपीक विश्वनाथ मेरकर, शिपाई मंदार कुळकर्णी यांनी श्री . टोमे यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या . श्री . टोमे हे 1982 पासून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात कार्यरत आहेत . त्यांची जिल्हा माहिती कार्यालय अकोला , वाशिम व अमरावती अशी सुमारे 40 वर्षांची अखंडीत सेवा करून ते आज सेवानिवृत्त झाले आहे . 00000000

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक;आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

अकोला दि.31 ( जिमाका)-    राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या,   तसेच   दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्‍या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्‍या,तसेच नव्‍याने स्‍थापि त   ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम याप्रमाणे : 1.       शुक्रवार दि. 3 जून 2022 रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देणे. 2.       सोमवार दि. 6 जून रोजी विशेष ग्रामसभा बोलवून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत काढणे. 3.       मंगळवार दि. 7 जून रोजी सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे. 4.     मंगळवार दि. 7 ते 10 जून 2022 या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणे. 5.      बुधवार दि. 15 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अभिप

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

इमेज
  अकोला दि.31 ( जिमाका)-     पुण्यश्लोक अहिल्यादेवी   होळकर यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात    निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे ,   शैक्षणीक गुणवत्‍ता कक्षाचे गजानन महल्ले , सूचना व प्रसारण अधिकारी अनिल चिंचोले तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   ०००००

विशेष लेखः- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोला: दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षणाची अखंडीत परंपरा

इमेज
             महाराष्ट्रातील व्यवसाय प्रशिक्षण देणारी नामांकित   अग्रणी शासकीय संस्था, स्थापना दिनांक 3 जून 1958 असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने स्थापनेपासूनच दर्जेदार व्यवसाय प्रशिक्षण देण्याची परंपरा अखंडीतपणे जोपासली आहे. संस्थेतून औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षणार्थी भारताच्या शासकीय, निमशासकीय, तथा खाजगी आस्थापनेत आपले योगदान देत असून देशाच्या औद्योगिक विकासात आपला वाटा उचलत आहेत .                  भारतीय रेल्वे , भारत हेवि इलेक्ट्रिकल्स ( BHEL ), भारत इलेक्ट्रॉनिक्स ( BEL ), आयुध निर्माणी, हिंदुस्तान एरोनॅटिक्स्, इ . तसेच टाटा  समूह  अशा नामांकीत संस्थांत काश्मीर  पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मुंबई पासून इटानगर पर्यंत ह्या संस्थेतून  प्रशिक्षित झालेले तरुण नोकरी करीत आहेत.                सन  1958 पासून कार्यरत असणाऱ्या संस्थेची शिस्त आणि कार्यपद्धतीचा दर्जा आजही कायम आहे.                                         संस्थेत एकूण 24 रोजगाराभिमुख  व्यवसाय असून त्यात 09 व्यवसाय एक वर्ष मुदतीचे आहेत तर  इतर 15 व्यवसाय दोन वर्षे मुदतीचे आहेत. व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केल्

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना; शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

इमेज
            अकोला , दि.31 (जिमाका)- शासनाने मृग बहार २०२२ मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभा गी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळ पिके घेणारे शेतकरी व कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत .   या योजनेंतर्गत समाविष्ट फळ पिके ,   विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी   भरावयाचा   विमा हप्ता (कंसात) याप्रमाणे आहे . संत्रा- ८० हजार रुपये (४ हजार रुपये), लिंबू-७० हजार रुपये (३५०० रुपये), मोसंबी ८० हजार रुपये (४ हजार रुपये), डाळींब-एक लाख ३० हजार रुपये (६५०० रुपये), पेरु-६० हजार रुपये (३ हजार रुपये) याप्रमाणे.   अधिसूचित फळ पिके व समाविष्ट महसूल मंडळ याप्रमाणे- डाळिंब- शिवणी, पेरु, मोसंबी- पातूर ता. पातूर, लिंबू- शिवणी, सांगळूद,बोरगावमंजु,कौलखेड, कापशीरोड, राजंदा, धाबा, महान,खेर्डाबु.,निम्भा, जामठी बु., कुरुम, मुर्तिजापूर, हातगाव,अकोलखेड, आसेगाव बाजार,उमरा, पणज

आजपासून (दि.1 जून) बियाणे महोत्सवास प्रारंभ; 826 शेतकऱ्यांनी केली बियाणे विक्रीसाठी नोंद

इमेज
            अकोला , दि.31 ( जिमाका)-   पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या घरगुती बियाणे विक्री महोत्सवाचे आयोजन बुधवार दि.1 जूनपासून प्रत्येक तालुक्याच्या बाजार समितीत करण्यात आले आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांनी तयार केलेले घरगुती बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असेल तर हेच घरगुती बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे. जिल्ह्यात तब्बल 826 शेतकऱ्यांनी या महोत्सवात बियाणे विक्री करण्यासाठी नोंद केली आहे. त्यासोबतच 22 शेतकरी कंपन्याही सहभागी होणार आहेत. शुभारंभाचा कार्यक्रम अकोट येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीत होणार असून अन्य तालुक्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने उद्घाटन सोहळा होणार आहे. शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना   आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा महोत्सव आ

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन; कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना स्नेहपत्र, हेल्थकार्ड व पोस्ट पासबुकचे वितरण

इमेज
          अकोला , दि.30 ( जिमाका)-   पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेचा शुभारंभ आज(दि.30) नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोविड संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना, त्यांच्या पालनकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना   मार्गदर्शन केले. त्यानंतर   जिल्ह्यातील पाच अनाथ बालकांना प्रधानमंत्री मोदी यांचे स्नेहपत्र, हेल्थकार्ड व पोस्टाचे पासबुकचे   वितरण जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. ‍जिल्हा नियोजन सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल न्याय मंडळचे ॲड वैशाली गावंडे, ॲड. सारिका घिरणीकर, बाल कल्याण समितीचे सदस्य अविनाश मुधोळकर, जिल्हा संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, चाईल्ड लाईनचे समन्वयक हर्षाली गजभिये, संरक्षण अधिकारी सुनिल सरकटे, सुनिल लाडुलकर, सामाजिक कार्यकता सतिश राठोड, रेवत खाडे, संगिता अभ्यंकर आदि उपस्थित होते.             पीएम केअर फॉर चिल्ड्रन निधीतून प्रत्येकी

उद्योजकता विकास प्रशिक्षण;अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरीता एक महिण्याचे प्रशिक्षण

  अकोला , दि.30 ( जिमाका)-   डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतीकरिता निशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण दि. 6 जून ते 5 जुलै 2022 या कालावधीत होणार असून प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रवेश अर्ज बुधवार दि. 1 जून पर्यंत करावा. प्रत्यक्ष मुलाखत सोमवार दि. 4 जून   रोजी होईल, अशी माहिती एमसीईडीचे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी दिली.   अनुसूचित जातीच्या युवक-युवती नवउद्योजकांना उद्योजकता विकास   संबंधी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:चा उद्योग व्यवसाय-स्वयंरोजगार निर्माण करण्यास प्रवृत्त करणे हा उद्देश आहे. निवासी स्वरूपाच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगसंबधी माहिती, उद्योगाची निवड, उद्योग उभारणी, व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन निगडीत कायदे व अंमलबजावणी कार्यपद्धती, उद्योग आधार नोंदणी, शासकीय विविध कर्ज योजना, सोयी सवलती आणि कार्यप्रणाली, सिद्धी प्रेरणा प्र

महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांना मुर्तिजापूर येथून प्रारंभ ;माय-माऊलीच्या वेदना दूर करण्यासाठीच आरोग्य सेवा-पालकमंत्री बच्चू कडू

इमेज
          अकोला , दि.30 ( जिमाका)-   शासनाच्या विविध योजना आणि शासकीय आरोग्य यंत्रणेचा प्रभावी वापर करुन अकोला जिल्ह्यात महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचा आजपासून प्रारंभ होत आहे. गरिबीतही स्वाभिमानाने आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या या माय-माऊलीच्या वेदना दूर करण्यासाठीच ही आरोग्य सेवा आहे,असे प्रतिपादन राज्याचे   जलसंपदा व लाभक्षेत्र विकास,   शालेय शिक्षण,   महिला व बालविकास,   इतर मागासवर्ग,   सामाजिक व शैक्षणिक    मागास प्रवर्ग,   विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष   मागास प्रवर्ग कल्याण,   कामगार राज्यमंत्री    तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनाचे (दि.31 मे) औचित्य साधुन महिलांची निःशुल्क आरोग्य तपासणी व उपचार हा  उपक्रम जिल्ह्यात आजपासून सुरु करण्यात आला. मुर्तिजापूर येथून या उपक्रमाची जिल्ह्यात सुरुवात झाली. या आरोग्य तपासणी शिबिरास महिलांना गावांतून आरोग्य यंत्रणेमार्फत प्राथमिक तपासणी करुन तालुकास्तरावरील उपजिल्हा रुग्णालयापर्यंत आणण्यात आले. येथे त्यांची सर्व तज्ज्ञांमार्फत तपासणी, निदा