1814 अहवाल प्राप्त, 301 पॉझिटीव्ह,527 डिस्चार्ज, 15 मृत्यू
अकोला,दि.19(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 1814 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1513 अहवाल निगेटीव्ह तर 301 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. दरम्यान 527 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 15 जणांचा उपचारा
दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.18) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 192 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 51649(39050+12422+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण
पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 301 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 192= एकूण पॉझिटीव्ह- 493.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 245647 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक
तपासणीचे 242648 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2609 नमुने होते. आजपर्यंत
एकूण 245586 अहवाल प्राप्त झाले आहेत.
एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 206536 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे.
301 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 301
अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 111 महिला व 190 पुरुषांचा समावेश आहे. त्यात
तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-10, अकोट-50, बाळापूर-35,
तेल्हारा-23, बार्शी टाकळी-31, पातूर-34, अकोला-118. (अकोला ग्रामीण-44, अकोला मनपा क्षेत्र-74)
दरम्यान
काल (दि. 18)
रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 192 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत
करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
527 जणांना डिस्चार्ज
दरम्यान
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 30, मुलांचे
वसतीगृह येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, कोविड
केअर सेंटर अकोट येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील आठ, भोयसर
हॉस्पीटल येथील दोन, पीडीकेव्ही येथील चार, आर्युवेदिक
महाविद्यालय येथील 10, हॉटेल रिजेन्सी येथील चार, युनिक
हॉस्पीटल येथील दोन, फातेमा हॉस्पीटल येथील तीन, केअर हॉस्पीटल येथील चार, उशाई
हॉस्पीटल येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय
मुर्तिजापूर येथील तीन, देवसार हॉस्पीटल येथील चार, देशमुख
हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, आधार
हॉस्पीटल येथील तीन तर होम आयसोलेशन मधील 435 असे
एकूण 527 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा
रुग्णालयातून देण्यात आली.
15 जणांचा मृत्यू
आज
दिवसभरात 15 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खाजगी
रुग्णालयातील दोन जणांचा समावेश आहे.
त्यात
रोहना येथील 65 वर्षीय महिलस असून या रुग्णास दि. 9
रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य बाळापूर येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल
करण्यात आले होते, गायत्री नगर येथील 50 वर्षीय महिला असून या रुग्णास दि.
12 रोजी दाखल करण्यात आले होते, पंचशिल
नगर येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते,
तर अकोट येथील 33 वर्षीय महिला रुग्णास दि. 12
रोजी दाखल करण्यात आले होते, कान्हेरी सरप
येथील 45 वर्षीय
पुरुष असून या रुग्णास दि. 5 रोजी दाखल करण्यात आले
होते. सीध्दजी वेताल ता.पातूर येथील 77 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 15 रोजी दाखल करण्यात आले होते. जूने शहर येथील 45
वर्षीय पुरुष असून या रुग्णास मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते.
दहिहांडा येथील 50 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 17
रोजी दाखल करण्यात आले होते, कुंभारी येथील 65
वर्षीय पुरुष रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी
उमरी येथील 37 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते, फडके नगर येथील 55
वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 18 रोजी
दाखल करण्यात आले होते, रोहना दहिहांडा येथील 43 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल
करण्यात आले होते, बालाजी नगर येथील 44 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 रोजी दाखल
करण्यात आले होते, बंजारा नगर येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 18 रोजी दाखल
करण्यात आले होते, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
6546 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 51649(39050+12422+177) आहे. त्यात 958 मृत
झाले आहेत. तर 44145 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6546 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा