बॅंका सुरु राहणार सकाळी नऊ ते दुपारी एक: जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश
अकोला, दि.१७(जिमाका)- जिल्ह्यात दि.१५ मे चे रात्री १२ वाजेपासून ते दि. १ जून रोजी सकाळी सात वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तथापि, पी.एम. किसान योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजना याअंतर्गत प्राप्त अनुदान बॅंक खात्यातून काढण्यासाठी नागरीकांची बॅंकेत गर्दी होत आहे. त्यामुळे कोविड विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी बॅंकेमध्ये होणारी गर्दी टाळण्याकरिता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
त्यानुसार,
1. सर्व
राष्ट्रीयकृत बँका , खाजगी बँका, बिगर बॅंकींग वित्तीय संस्था,
सुक्ष्म वित्त संस्था, सहकारी संस्था, पतपेढी
संस्था, विमा ,
पोस्ट पेमेंट बॅंक व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तिय संस्था ह्या
सकाळी नऊ
ते दुपारी एक या कालावधीत
सुरु राहतील.
2. BC/CSP
चे कामकाज
ग्रामपातळीवर २४ x ७ सुरु राहिल,
या बाबत संबंधीत बॅंकांनी नियोजन करावे.
3. ATM
मध्ये २४ x ७ रोख रक्कम उपलब्ध ठेवणे
बाबत संबंधित बॅंकांनी नियोजन
करावे.
4. खरीप
हंगामास सुरुवात होत असल्यामुळे शेतकऱ्यांची
पीक कर्जाची कामे प्राधान्याने करण्यात यावीत.
5.
कृषी सेवा केन्द्र व कृषी निविष्ठांची
दुकाने कृषी प्रक्रिया उद्योगगृहे \
शेती औजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, व प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आलेल्या पुढील गावातील कृषी
सेवा केन्द्र व कृषी निविष्ठांची दुकाने सकाळी
सात ते दुपारी दोन
व तेथील बॅंका या सकाळी नऊ
ते दुपारी एक या
कालावधीत सुरु राहतील. ( अकोला- सांगवी,
डोंगरगाव, उगवा,
बोरगांव मंजू, बोरगांव खु सांगळूद अकोट- लोहारी, रुईखेड,बोर्डी,
चोहट्टा,अकोली जहॉं. बाळापुर – व्याळा,वाडेगांव,
पारस बार्शिटाकळी- महान मुर्तिजापुर- सिरसो,
मदापुरी पातूर- असोला, अंबाशी,
सस्ती, विवरा तेल्हारा – बेलखेड,
सौंदळा, हिवरखेड ) असे आदेशात म्हटले
आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा