2468 अहवाल प्राप्त, 358 पॉझिटीव्ह, 494 डिस्चार्ज, 11 मृत्यू
अकोला,दि.22(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2468
अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2110 अहवाल निगेटीव्ह तर 358 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. दरम्यान 494 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 11 जणांचा उपचारा दरम्यान
मृत्यू झाला, असे जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.21) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 167 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 53347(40241+12929+177)
झाली आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 358 +
रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 167= एकूण
पॉझिटीव्ह- 525.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण
253178 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 250159 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे 2629
नमुने होते. आजपर्यंत एकूण 253098 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह
अहवालांची संख्या 212857 आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
358 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 358 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात 148 महिला व 210 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-25, अकोट-49, बाळापूर-29, तेल्हारा-5, बार्शी
टाकळी-18, पातूर-53, अकोला-179. (अकोला
ग्रामीण-52, अकोला मनपा क्षेत्र-127), दरम्यान काल (दि.21)
रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 167 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत
करण्यात आला आहे, याची नोंद
घ्यावी.
494 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 39, जिल्हा स्त्री रुग्णालय
येथील सहा, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील चार,
पिकेव्ही येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालय
येथील पाच, जिल्हा परिषद भवन येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार,
बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, फातेमा हॉस्पीटल
येथील दोन, लोटस
हॉस्पीटल अकोट येथील दोन, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक,
आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल
येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील
दोन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, अवघाते
हॉस्पीटल येथील तीन, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन,
तर होम आयसोलेशन मधील 400 असे एकूण 494 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
11 जणांचा मृत्यू
दरम्यान आज दिवसभरात 11 जणांचा मृत्यू झाला. त्यात खाजगी
रुग्णालयातील पाच जणांचा समावेश आहे.
अकोट येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते.
बाळापूर येथील 60 वर्षीय महिला असून
या रुग्णास दि. 9 रोजी दाखल केले होते.
मुर्तिजापूर येथील 79 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल
केले होते.
खडकी येथील 62 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल केले होते.
चैतन्य नगर अकोला भागातील 58 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 20 रोजी दाखल केले होते.
टाकळी ता.बाळापूर येथील 60 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 15 रोजी
दाखल केले होते.
खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
मनारखेड ता. बाळापूर येथील 35 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 4 रोजी दाखल केले होते.
अकोला येथील 57 वर्षीय पुरुष रुग्ण असून
या रुग्णास दि. 2 रोजी दाखल केले होते.
मोठी उमरी येथील 35 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल केले
होते.
अकोला जहागीर येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 17 रोजी दाखल केले
होते.
मांडवा ता. मुर्तिजापूर येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि.15 रोजी
दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली.
6626 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 53347(40241+12929+177)
आहे. त्यात 1004 मृत
झाले आहेत. तर 45717 जणांना डिस्चार्ज
देण्यात आला असून सद्यस्थितीत 6626 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा