विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा; ग्रामीण भागात लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवा
अकोला,दि.25(जिमाका)-
जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थिती व उपाययोजनाबाबत आज विभागीय
आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला. ग्रामीण भागात कोविड रुग्णांची संख्या वाढत असून
ससंर्गाची साखळी तोडण्यासाठी काटेकोर उपाययोजना करा. तसेच ग्रामीण भागात लसीकरण
मोहिम प्रभावीपणे राबवा,असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांच्या
दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपाचे आयुक्त निमा अरोरा, वैद्यकीय महाविद्यालयाचे
अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर
घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हाण, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष
शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपविभागीय पोलिस अधिकारी मोनिका राऊत, निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. सिरसाम, आदी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त
सिंह यांनी जिल्हा व ग्रामीण भागातील रुग्ण संख्या, मृत्यू
संख्या वाढ, रुग्णालयाचे फायर ऑडीट, ऑक्सीजन
उपलब्धता व लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यातील ऑक्सीजन निर्मिती प्लांटबाबत
माहिती घेऊन प्लांटचे कामे तातडीने मार्गी लावावीत,अशी
सूचनाही त्यांनी केली. कोरोना बाधीत असलेल्या
रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या कराव्या. तसेच ग्रामीण भागात लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवावी,
असेही निर्देश यावेळी दिले. गृह अलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींना
संस्थागत अलगीकरण करावे. नियमाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही
करावी. तसेच कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरटीपीसीआर व रॅपिड चाचण्यांचे
प्रमाण वाढवा ,अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
दरम्यान
या आढावा बैठकीनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील ऑक्सीजन प्लांटला विभागीय
आयुक्तांनी भेट देवून पाहणी केली. तसेच सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल व डॉ. पंजाबराव
देशमुख कृषी विद्यापीठ येथील जम्बो कोविड केअर सेंटरला भेट देवून तेथील
सोईसुविधांची पाहणीही केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा