रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1693 चाचण्यात 143 पॉझिटीव्ह

अकोला,दि. 18 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.17) दिवसभरात झालेल्या 1693 चाचण्या झाल्या त्यात 143  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोला येथे 78 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोट येथे 52 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे 19 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बार्शीटाकळी येथे 60 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, पातूर येथे 97 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 215 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  मुर्तिजापूर येथे 277 चाचण्या झाल्या त्यात 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 734 चाचण्या झाल्या त्यात 57 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 15 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 51 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 65 चाचण्या झाल्या त्यात 22 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 30 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. असे 1693 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 143  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 35 हजार 425 चाचण्या झाल्या पैकी 12309 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ