रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1476 चाचण्यात 190 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 16 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.15) दिवसभरात झालेल्या 1476 चाचण्या झाल्या त्यात 190 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल
दिवसभरात अकोला येथे 68 चाचण्या
झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, अकोट येथे 109 चाचण्या झाल्या त्यात 28 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, बाळापूर येथे 33 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, बार्शीटाकळी येथे 28 चाचण्या झाल्या त्यात पाच
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, पातूर येथे 31 चाचण्या झाल्या
त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 125 चाचण्या
झाल्या त्यात 17 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मुर्तिजापूर येथे 228 चाचण्या झाल्या
त्यात 38 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
तर अकोला महानगरपालिका येथे 687 चाचण्या झाल्या त्यात 33 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 19 चाचण्या झाल्या त्यात तिघांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, जिल्हा आरोग्य
कर्मचाऱ्यांचे 15 चाचण्या
झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात 56 चाचण्या झाल्या त्यात 17 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 77 चाचण्या झाल्या त्यात 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. असे 1476 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 190 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत
जिल्ह्यात 1 लक्ष 32 हजार 604 चाचण्या झाल्या पैकी 12051 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा