पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लॉकडाऊन कालावधीत ३० जून पर्यंत वाढ

अकोला दि.३१(जिमाका)-  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दि.३१ मे पर्यंत  असलेला लॉक डाऊनचा कालावधी महाराष्ट्र शासनाने  ३० जूनच्या मध्यरात्री पर्यंत  वाढविला आहे. या संदर्भात मार्गदर्शक सुचनाही जारी केल्या आहेत. जिल्ह्यात व शहरात महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या वाढत असल्याने ते भाग प्रतिबंधितही  करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने  अकोला जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दि.२१ मे रोजी निर्गमित केलेले  लॉकडाऊन संदर्भातील आदेश पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचे आदेश आज जारी केले आहेत.

५३ अहवाल प्राप्तः ११ पॉझिटीव्ह, नऊ डिस्चार्ज, दोन मयत

अकोला , दि.३१ ( जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ५३अहवाल प्राप्त झाले . त्यातील ४२ अहवाल निगेटीव्ह तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर  नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या दोन जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.  दरम्यान काल (दि.३०) रात्री दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५८१ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात ११७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ५२८३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५००९, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५२६० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४९८६ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४६७९ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५८१ आहेत. तर आजअखेर २३ नम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

इमेज
अकोला दि.३१(जिमाका)-  थोर समाजसुधारक  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन  प्रतिमापूजन करण्यात येऊन अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील निलेश दामोदर, अविनाश डांगे, आशिष काळे. महेंद्र दामोदर, मनोज वावरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

प्रति हेक्टरी किमान दरापेक्षा कमी पीक कर्ज दिल्यास कारवाई-जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे

अकोला दि.३०(जिमाका)-   शासनाच्या सहकार पणन विभागाने शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यासाठी प्रति हेक्टरी किमान दर निर्धारीत केले आहेत. त्या दरांपेक्षा शेतकऱ्यांना कमी पीक कर्ज वाटप केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिले आहेत. जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने लागू असलेल्या संचारबंदीच्या मर्यादा बघता जिल्ह्यात खरीप पीककर्ज वितरण अभियान अधिक गतिमान करून ३० जून पर्यंत सर्व पात्र शेतकरी बांधवांना पिक कर्ज वितरण होणे आवश्यक आहे. या मुदतीत गाव पातळीवरील शेतकरी बांधवांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्यामार्फत किमान ६८ , ८७५ शेतकऱ्यांना ५५१ कोटी रुपये पीककर्ज वाटप करावयाचे आहे. त्या अनुषंगाने   जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत   सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या किमान प्रति हेक्टर /एकर पीक कर्ज वाटप दरापेक्षा कमी दराने पीक कर्ज वाटप करण्यात येवू नये. ही जबाबदारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस

जिल्ह्यात कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी ८ कोटी ७० लक्ष रुपये खर्च

अकोला दि.३०(जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्गाविरुद्ध  अकोला जिल्ह्याला  विविध उपचार सुविधा व उपाययोजना करण्यासाठी  तसेच आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी  शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून आपत्ती प्रतिसाद निधी व जिल्हा वार्षिक योजनेतून  १० कोटी रुपयांचा निधी  उपलब्ध करण्यात आला असून आता पर्यंत जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी त्यातील ८ कोटी ७० लक्ष रुपयांचा निधी खर्च केला आहे.   याबाबत जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार,   आपत्ती प्रतिसाद निधी   अंतर्गत जिल्ह्याला   ३ कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधी जिल्हा शल्य चिकित्सक, महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक, सर्व तहसिलदार व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या यंत्रणांना वितरीत करण्यात आला. या निधीतून यंत्रणानिहाय खर्च याप्रमाणे- जिल्हा शल्य चिकित्सक १ कोटी ५ लाख रुपये, महानगरपालिका अकोला ४० लाख रुपये,   जिल्हा पोलीस अधिक्षक पाच लाख रुपये, सर्व तहसिलदार यांनी मिळून   ४० लाख रुपये,   आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांनी २० लाख रुपये   असा एकूण २ कोटी १० लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. त्यातून व

आणखी ११ इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर; ५३० खाटांची सुविधा

अकोला दि.३०(जिमाका)-  कोरोना संसर्गाच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी  ५३० खाटांची व्यवस्था निर्माण करुन  ११ इमारतींमध्ये कोवीड केअर सेंटर म्हणून अधिग्रहित केल्या आहेत.  या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आदेश निर्गमित केले आहेत.  यामुळे जिल्ह्यात कोविड केअर सेंटरच्या पुर्वीच्या ११३५ क्षमतेत वाढ होऊन आता १६६५ खाटांची क्षमता  झाली आहे. संदिग्ध रुग्णांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यासाठी  या सुविधेचा वापर करण्यात येतो. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी   गुणवंत मुलांचे वसतीगृह(१०),   गुणवंत मुलींचे वसतीगृह(२०),   सैनिकी मुलांचे वसतिगृह(५०), सैनिकी मुलींचे वसतिगृह(३०) , शासकीय अध्यापक मुलांचे वसतीगृह(४०), शासकीय अध्यापक मुलींचे वसतीगृह(४०),   जिल्हा परिषद कर्मचारी भवन(८०),   आदिवासी मुलांचे वसतीगृह(८०), आदिवासी मुलींचे वसतीगृह(८०),   जिल्हा क्रीडा प्रबोधिनी(५०), जिल्हा क्रीडा संकूल (५०) या इमारती   कोवीड केअर सेंटर   म्हणून अधिग्रहित करीत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या इमारती जिल्हा शल्य चिकित्सक   यांच्या ताब्यात देऊन कोवीड केअर सेंट

१२३ अहवाल प्राप्तः १२ पॉझिटीव्ह, ३५डिस्चार्ज, एक मयत

अकोला , दि.३० ( जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १२३अहवाल प्राप्त झाले . त्यातील १११ अहवाल निगेटीव्ह तर १२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारपर्यंत ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या पाच जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित ३० जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.  दरम्यान आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७० झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात ११७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ५२२४ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४९५०, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५२०७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४९३३ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४६३७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५७० आहेत. तर आजअखेर १७ नमुन्यांचे अहवाल

२७६ अहवाल प्राप्तः ४२ पॉझिटीव्ह, ३९ डिस्चार्ज

अकोला , दि.२९ ( जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सात वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २७६अहवाल प्राप्त झाले . त्यातील २३४ अहवाल निगेटीव्ह तर ४२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारपर्यंत ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या १६ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित २३ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.  आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५५८ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात १४१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ५१०१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४८२९, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५०८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४८१२ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४५२६आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५५८ आहेत. तर आजअखेर १७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आज ४२ पॉझिटिव्ह आज सकाळी   प्राप्त अहव

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना: नागरिकांना लाभ देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी- विभागीय आयुक्त पियुष सिंह

अकोला दिनांक २ ९ (जिमाका)- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोवीड व्यतिरिक्त अन्य  आजारांवरील अत्यावश्यक उपचारांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना अंगीकृत रुग्णालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे , नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी योग्य ती दक्षता घ्यावी , असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज येथे दिले . या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात १३ खाजगी  रुग्णालये संलग्नित आहेत. राज्य शासनाने ज्योतिबा फुले जन आरोग्य ही योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी संलग्नित करून एकत्रितरित्या १ एप्रिल २०२० पासून अंमलात आणली आहे . त्यामुळे या योजने ची व्याप्ती वाढून सुमारे ९० टक्के नागरिकांचा लाभार्थी म्हणून समावेश झाला आहे . उर्वरीत नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये , तसेच स द्य स्थिती त महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे अंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील रहिवासी असलेल्या नागरिकांनाही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या उपचार सुविधा मान्यताप्राप्त दरा

जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीः विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

इमेज
अकोला दिनांक २९(जिमाका)-   जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीचा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला. कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढण्याची कारणे, जिल्ह्यातील उपचार सुविधा व अलगीकरणाच्या सुविधा, वैद्यकीय उपचार यंत्रणेतील   मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, सुरक्षासाधनांचीआवश्यकता इ. बाबींचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.                           जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त   संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय   वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे,डॉ. अष्टपुत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.   यावेळी त्यांनी यंत्रणेला सुचना केल्या की, उपचार पद्धतीसंदर्भात इंडीयन मेडीकल कौन्सिल कडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांचा काटेकोर अवलंब करा. मुंबई पुणे यासारख्या शहरांमधून परतलेल

२०१ अहवाल प्राप्तः नऊ पॉझिटीव्ह, ३४ डिस्चार्ज, एक मयत

अकोला , दि.२८ ( जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सात वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २०१अहवाल प्राप्त झाले . त्यातील १९२ अहवाल निगेटीव्ह तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या सात जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित २७ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.  दरम्यान उपचार घेतांना एका ८० वर्षिय वृद्धाचा आज मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५१६ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात १३८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४८९५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४६२६, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १५९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ४८०८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४५३९ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १५९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४२९२ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५१६ आहेत. तर आजअखेर ८७ नमुन्यांचे अह

संपर्क शोधाचा कालावधी कमीत कमी करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

इमेज
अकोला दिनांक २८(जिमाका)-  अकोला जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सुसूत्रपद्धतीने  उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील  व्यक्तिंचा शोध घेण्याचा कालावधी हा कमीत कमी करावा, निकट संपर्कातील व्यक्तिंना क्वारंटाईन करावे तसेच उच्च धोका व कमी धोका असणाऱ्या व्यक्तींनाही अलग अलग ठेवावे असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास , इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण , कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी आज तातडीने जिल्ह्याला भेट दिली. यासंदर्भात आज सकाळी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लो

कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी एकजुट महत्त्वाची सर्वपक्षीय बैठकीत पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे प्रतिपादन

इमेज
अकोला दिनांक २८(जिमाका)-   कोरोना या आजाराची श्रृंखला तोडायची असेल तर त्यासाठी केवळ शासन प्रशासकीय यंत्रणा यांना जबाबदार धरुन चालणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांना राजकीय पक्ष, गट तट बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल.  आपण एकजुटीने प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांना  साथ देऊ आणि कोरोनाची श्रृंखला मोडून काढू. ही श्रृंखला मोडण्यासाठी आवश्यकता भासल्यास शासनाच्या मान्यतेने दि.१ ते ६ जून या कालावधीत जनता कर्फ्यू म्हणून स्वयंस्फूर्तीने लॉक डाऊनही पाळू. या एकजुटीनेच ‘जिंकू, हाच आत्मविश्वास’ बाळगुन  लढू, असा निर्धार राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास , इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण , कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केला.                        अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या   पार्श्वभुमिवर   आज सर्वपक्षिय विचारविनिमय बैठक बोलावण्यात आली. नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठक