पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

    अकोला दि.30(जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)   183 अहवाल प्राप्त झाले.   त्यात अकरा जणांचा   तर खाजगी प्रयोगशाळेतून एक असा एकूण १२ जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (शा.वै.म.   11   व खाजगी   एक )12+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य   = एकूण पॉझिटीव्ह 12. आरटीपीसीआर ‘ 12 ’ आज   दिवसभरात    आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात   11   जणांचा   अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात सहा महिला व पाच पुरुष रुग्ण असून   हे 10 रुग्ण   अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असून एक जण मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे . तर एका रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब मधून प्राप्त झाला आहे,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. पाच जणांना डिस्चार्ज आज   दिवसभरात    पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आ हे ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शा

मधकेंद्र योजना; इच्छुकांकडून अर्ज मागविले

  अकोला,दि.30 (जिमाका)-  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत झाली आहे. याकरीता पात्र व्यक्ती व संस्थाकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत. योजनेची वैशिष्टे – मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुतंवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/ छद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवध्रनाची जनजागृती. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता- (1) वैयक्तिक मधपाळ-10 मधपेट्या पात्रता – अर्जदार साक्षर असावा, स्वत-ची   शेती असल्यास प्राधान्य, वय   18 वर्षापेक्षा जास्त. (2) केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ – व्यक्ति पात्रता- किमान 10 वी पास, वय वर्ष 21 पेक्षा जास्त, असा व्यक्तिच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही   व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी. (3) केंद्रचालक संस्था- पात्रता- संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत

पशुसंवर्धन विभागाचे आज (दि.1 जुलै) एक दिवसीय प्रशिक्षण

      अकोला , दि. 30 (जिमाका)- शासनातर्फे पशुसंवर्धन विभागातर्फे प्रथमच शेळ्यांमधील कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंमलबजावणी साठी पशुसंवर्धन विभाग, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन यांचे मार्फत   जिल्ह्यात कार्यरत पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 यांना 'शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतन' याबाबत एक दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण शुक्रवार दि.1 जुलै रोजी हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे सकाळी 9 ते सायं.5 या वेळात आयोजीत करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचे उद्घाटन सत्रास जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांची उपस्थिती राहणार आहे.   याप्रशिक्षणामुळे जिल्ह्यात संकरीत जातीच्या शेळ्या जसे की जमनापारी,दमास्कस,उस्मानाबादी इ. प्रकारच्या संकरीत प्रजातीच्या शेळ्या उत्पादनास प्रोत्साहन मिळणार आहे, असे   जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जगदीश बुकतारे, डॉ. तुषार बावने,डॉ.राधेश्याम चव्हाण यांनी कळविले आहे. 00000

अनुकंपा उमेदवारांची प्रारुप प्रतिक्षायादी प्रसिद्ध

  अकोला , दि. 30 (जिमाका)- शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी  गट क व गट ड मधील सामाईक प्रतिक्षासुचीची प्रारुप प्रतिक्षा यादी  जिल्ह्याच्या www.akola.nic.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे, त्यात दुरुस्ती असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना विभागात संपर्क साधावा,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटल्यानुसार,   शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यु झालेल्या कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासाठी यादी ठेवण्याची तरतुद आहे. दि. 21 सप्टेंबर 2017 च्या शासन निर्णय मधील तरतुदीनुसार अनुकंपा नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गट- क व गट-ड सामाईक प्रतिक्षासूची ठेवण्याची कार्यपद्धती आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांकडून प्राप्त अनुकंपातत्वावरील यादीनुसार सामाईक यादी ठेवण्यात आली आहे. तसेच ज्या उमेदवारांना यापूर्वी शासकीय नोकरी नियुक्ती देण्यात आलेली आहे व ज्यांना वयाची 45 वर्ष पूर्ण केली

जिल्हास्तरीय केबल दुरचित्रवाणी वाहिनी व एफ.एम.रेडीओ संनियंत्रण समितीची बैठक :केबल प्रसारणासंदर्भात तक्रार निवारण कक्ष स्थापन करा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

इमेज
  अकोला , दि. 30 (जिमाका)-   जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील केबल टिव्ही, तसेच केबल ऑपरेटर्स यांच्याद्वारे प्रसारीत केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांबाबत प्रेक्षकांच्या तक्रारींची नोंद करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. जिल्हास्तरीय केबल दुरचित्रवाणी वाहिनी व एफ.एम. रेडिओ संनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस   जिल्हाधिकारी निमा अरोरा उपस्थित होत्या. तसेच   श्रीमती. मेघना पाचपोर,डॉ. आनंद काळे, गणेश सोनोने, अतुल मुळतकर, सदस्य सचिव डॉ. मिलिंद दुसाने आदी उपस्थित होते. खाजगी दुरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्कद्वारे तसेच एफ. एम. रेडिओद्वारे प्रसारीत होणारे कार्यक्रम हे प्रसारण व जाहिरात संहितेनुसार प्रसारीत होतात किंवा नाही याचे संनियंत्रण समितीला करावयाचे आहे. त्यासाठी सदस्यांना केंद्र सरकारच्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क ॲक्ट 1995 आणि केबल टेलीव्हिजन नेटवर्क ॲक्ट 2021 (सुधारीत) याबाबत   माहिती दिली. सोशल मिडियावरुन होणाऱ्या प्रसारणावर अधिक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे सदस्यांनी   सांगितले. याबाबत

शालेय परिवहन समितीवर मोटार वाहन निरीक्षकांची तालुकानिहाय नियुक्ती

  अकोला , दि. ३० (जिमाका)-   जिल्ह्यातील प्रत्येक शाळानिहाय शालेय परिवहन समिती असते. अशा समित्यांवर मोटार वाहन निरीक्षक व सहा. मोटार वाहन निरीक्षक यांच्या तालुकानिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, असे उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे. यासंदर्भात उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिती असते. समितीचे अध्यक्ष प्राचार्य /मुख्याध्यापक असतात. पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी तसेच संबंधित क्षेत्राचा वाहतुक निरीक्षक, पोलीस निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, शिक्षण निरीक्षक, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी, स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी यांचा समावेश असतो. त्यानुसार जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या सभेतून प्राप्त निर्देशानुसार स्कुल बस धोरणानुसार अकोला शहर व   जिल्ह्यासाठी तालुकानिहाय   खालीलप्रमाणे मोटार वाहन निरीक्षक व सहा. मोटार वाहन निरीक्षक यांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश   उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिले आहेत. त्यानुसार तालुकानिहाय   मोटार वाहन निरीक्षक व सहा. मोटार वाहन निरीक

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा: दि.८ जुलै रोजी;२२७ पदांच्या भरतीचे नियोजन

  अकोला,दि.३०(जिमाका)-   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दि. ८ जुलै रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यात २२७ पदांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. मेळाव्यात रोजगार इच्छुक युवक युवतींनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.    या रोजगार मेळाव्‍यात   क्रेडीट ॲक्सेस ग्रामिण. लि. अकोला व बुलडाणा करीता   ट्रेनी केंद्र व्यवस्थापक 50 पदे, नमस्ते व्हेंचर्स प्रायव्हेट लि. अकोला या कंपनीसाठी 26 पदे, नवभारत फर्टीलायझर, औरंगाबाद करीता सेल्स ट्रेनी- 51, महिंद्रा महिंद्रा लि. पुणे साठी 50, बजाज इलेक्ट्रिकल्स लि. पुणे साठी 50 असे एकूण 227 पदांच्या भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. सहभागासाठी कौशल्‍य विकास,   रोजगार,   उद्योजकता व नाविन्‍यता   विभागाच्‍या   -   www.mahaswayam.gov.in   या संकेतस्‍थळाला भेट देऊन आपल्‍या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन शैक्षणीक पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच इतर जिल्‍ह्यातील उमेदवारही अर्ज शकतात. ज

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक सोमवारी आढावा सभा

  अकोला , दि. ३० (जिमाका)-   जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतीशी निगडीत विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी येत्या सोमवार दि.४ जुलैपासून जिल्हाधिकारी निमा अरोरा ह्या दर सोमवारी आढावा घेणार आहेत, असे कृषी विभागाने कळविले आहे. यासंदर्भात कृषी विभागाने कळविले आहे की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजना , हवामान आधारित फळपिक विमा योजना , स्वयंचलित हवामान केंद्र , प्रधानमंत्री किसान सन्मान निधी , पिक कर्ज , सावकारी प्रकरण , बियाणे व खाते मागणी , पोकरा इ.बाबत असलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी दर सोमवारी सभा आयोजित करण्यात येईल. ही सभा   सोमवार दि.४ जुलै पासून दर सोमवारी सकाळी साडेदहा वा. जिल्हाधिकारी कार्यालय , अकोला येथे होणार आहे. त्यासाठी संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांनी स्वतः बैठकीस उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे. ०००००

कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

    अकोला दि.29(जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)   192 अहवाल प्राप्त झाले.   त्यात पाच जणांचा   तर खाजगी प्रयोगशाळेतून तीन जणांचा असा एकूण आठ जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म.   पाच   व खाजगी   तीन ) 0 8 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य   = एकूण पॉझिटीव्ह 0 8 . आरटीपीसीआर ‘ आठ ’ आज   दिवसभरात    आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात   पाच   जणांचा   अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन महिला व दोन पुरुष रुग्ण असून   हे रुग्ण   अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. पाच जणांना डिस्चार्ज आज   दिवसभरात    पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आ हे ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.   सक्रिय रुग्ण ‘ 36 ’ जिल्ह्यात एकू

गोरेगाव खु. येथे गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

  अकोला दि.26(जिमाका )-   सामाजिक न्याय विभागाद्वारे संचालित अनु . जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, गोरेगाव खुर्द येथे आज दहावीतील गुणवंत विद्यार्थीनींना गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  याच वेळेस शैक्षणिक सत्र 2022 - 23 मध्ये येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्ष मुख्याध्यापक पी. बी. चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत सम‍ितीचे गटव‍िकास अध‍िकारी एल. बी. बारगिरे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी खिंडकर, गणेश बोरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. एल. बी. बारगिरे यांनी गुणवंत विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पी . एम . खुबाळकर यांनी तर आभार प्रदर्शन आम्रपाली घनबहादुर यांनी केले. सहाय्यक शिक्षक ए . पी . कचवे, आर.जी . अहिर, पी . एस . वानखडे, सहाय्यक ग्रंथपाल एस.व्ही . पखाण , प्रयोगशाळा सहाय्यक एन. एच. उपवंशी व बाह्यस्त्रोत कर्मचारी उपस्थित होते .

गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह येथे प्रवेश अर्ज वाटप सुरू

  अकोला,दि.29 (जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यामध्ये मागासवर्गीय मुलामुलीसाठी शासकीय वसतीगृह चालविली जातात. मागासवर्गीयांची शैक्षणिक, सामाजिक आर्थिक उन्नती, तसेच त्यांचे राहणीमान, समाजातील इतर घटकांप्रमाणे त्यांना जीवन जगता यावे, तसेच त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, अकोला या वसतीगृहात इयत्ता 11 वी व आय टी आय साठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जागा उपलब्ध असून प्रवेश अर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्याची मुदत दि.30 जुलै आहे. गुणवत्ता व आरक्षण निहाय मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अकोल्याचा रहिवासी नसलेल्या परंतु अकोला म. न. पा. हद्दीतील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या किंवा घेवू इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन गृहपाल एस. एस. लव्हाळे, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, संतोषी माता मंदीराजवळ, हनुमान बस्ती, अकोला या

श्वान पथकःपोलीस दलाचा सच्चा साथीदार :‘बोलके करती गुन्हा; मुके लावती छडा!’

इमेज
  अकोला , दि. 28 (डॉ. मिलिंद दुसाने)-   श्वान अर्थात कुत्रा.इमानदार मुका प्राणी. धन्याशी इमान राखावे ते कुत्र्यानेच. बोलकी माणसे गुन्हे करतात आणि मुके कुत्रे त्याचा छडा लावतात. पोलिसांचे श्वानदल हे त्याचे प्रत्यक्ष प्रमाण. अकोला पोलीस दलात सहा श्वानांचे पथक असून त्यांनी आतापर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच सुरक्षिततेच्या दृष्टीने मोलाचे कार्य केले आहे. अकोला पोलीस दलातील सहा श्वानांपैकी तीन गुन्हे शोधक, एक अमलीपदार्थ शोधक आणि दोन स्फोटके म्हणजेच बॉम्ब शोधक पथकात आहेत. या सहा जणांपैकी चार श्वान (लक्ष्मी, रेवा, झोया आणि ल्युसी) ह्या मादी आहेत तर बॉम्ब शोधक पथकातील दोघे श्वान (रॅम्बो आणि ब्राव्हो) नर आहेत. चार मादी श्वानांपैकी तिघी ह्या डॉबरमन तर एक जर्मन शेफर्ड आणि बॉम्ब शोधक पथकातील दोघे लॅब्रॉडॉर आहेत. अस्सल जातीवंत श्वानांची निवड पोलीस दलात उत्तम जातीवंत हुशार, चपळ श्वानांची निवड केली जाते. शासनाने प्रमाणित केलेल्या श्वान प्रजोत्पादन केंद्रांकडून हे श्वान प्राप्त केले जातात. निवडीचे हे काम पोलीस दलातील श्वान पथकाचे अधिकारी- कर्मचारी करतात. श्वान निवड करतांना त्या श्वानाची ती

अकोला, बाळापूर तालुक्यात पावसामुळे घरे, रस्ते, पुलाचे नुकसान

  अकोला , दि. 28 (जिमाका)-   जिल्ह्यात अकोला व बाळापूर तालुक्यात काल (दि.27) रात्री झालेल्या पावसामुळे  घरे, रस्ते, पुलाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे,असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळविले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात प्रामुख्याने कंचनपूर, बादलापूर, मांजरी, मोरगाव भाकरे, खंडाळा या गावांमध्ये नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. आज सकाळी साडेआठ वा. संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 15.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. बाळापूर तालुक्यात 66.3 मि. मी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यातही व्याळा (99 मि.मी), पारस (83 मि. मी.),  बाळापूर (83 मि.मी.) या मंडळात अधिक वृष्टी झाली. झालेल्या नुकसानीची माहिती याप्रमाणे- अकोला तालुक्यात 10 घरांची अंशतः पडझड झाल्याची माहिती आहे. तर अकोला तालुक्यात 850 हे.आर तर बाळापूर तालुक्यात 415 हे.आर. अशा एकूण 1265 हे.आर. क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच मांजरी ते अकोला हा रस्ता खचला असून मांजरी गावाला जोडणारा पूल वाहून गेला आहे. तर हातरुन- कंचनपूर या रस्त्याचेही

कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

    अकोला दि.28(जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)   155 अहवाल प्राप्त झाले.   त्यात आठ जणांचा   आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म.   आठ   व खाजगी   शुन्य ) 0 8 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य   = एकूण पॉझिटीव्ह 0 8 . आरटीपीसीआर ‘ आठ ’ आज   दिवसभरात    आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात   आठ   जणांचा   अहवाल पॉझिटीव्ह आला. या सर्व महिला रुग्ण असून.   हे रुग्ण   अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे ,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सक्रिय रुग्ण ‘ 33 ’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 652 85 (492 59 +15039+987)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात   33   सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यातील   सात जण   रुग्णालयात दाखल तर अन्य   26 रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवनचरित्र चित्रप्रदर्शन: विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या कार्याचा परिचय करुन देणारा उत्कृष्ट उपक्रम-आ.अमोल मिटकरी: निबंध स्पर्धा; विजेत्यांना घडविणार कोल्हापूर सहल

इमेज
  अकोला , दि. 28 (जिमाका)-   डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देणारे चित्रप्रदर्शन हा उत्कृष्ट उपक्रम असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा परिचय त्यातून होईल, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी यांनी आज केले.   चाचोंडी येथील डवले महाविद्यालयात आज या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.मिटकरी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,प्राचार्य प्रकाश डवले,   विशालराजे बोरे,   बार्टीच्या ॲड. वैशाली गवई, अनिल चोतमल आदी मान्यवर उपस्थित होते. अकोला जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालये व जिल्हा परिषद शाळांमधून हे प्रदर्शन दाखविले जाणार आहे. येता महिनाभर हा उपक्रम सुरु राहणार आहे. या छायाचित्रांमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या जिवनातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांचे आदेश, दुर्मिळ कागदपत्रे, वास्तू, चित्रे इ. सादर करण्यात आले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या संकलनातून या प्रदर्शनातील छायाचित्रे सादर करण्यात आली आ

‘सखी वन स्टॉप सेंटर’बाबत जनजागृती

    अकोला दि.27(जिमाका)-  ‘ सखी वन स्टॉप सेंटर’ या योजनेची माहिती जास्तीत जास्त पिडित महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी  नुकतेच (दि.21) बुद्ध विहार खडकी, अकोला येथे   सखी    वन स्टॉप सेंटर व मैत्री फेलो नेटवर्क  यांनी संयुक्तरित्या जनजागृतीसाठी माहिती देण्यात आली. याप्रसंगी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक ॲड. मनिषा भोरे व मैत्री फेलो नेटवर्कच्या सुषमा मेश्राम यांनी मार्गदशन केले. उपस्थितांना माहिती देण्यात आली की, सखी, वन स्टॉप सेंटर अकोला या योजनेच्या माध्यमातुन हिंसाचाराने पिडीत महिलांना वैद्यकीय सुविधा, पोलीस सहाय्यता, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, तात्पुरता निवारा, तात्काळ सेवा इ.सोयी सुविधा एका छताखाली निःशुल्क पुरविण्यासाठी दि.10 फेबुवारी 2017 पासुन जिल्हा स्त्री रूग्णालय, वार्ड क.7 मध्ये कार्यरत आहे. ही योजना महिला व बाल विकास विभागाची केंद् पुरस्कृत योजना आहे. संकटग्रस्त हिंसाचार पिडित महिलांना मोफत 24 तास तात्काळ मदत करते.यावेळी वन स्टॉप सेंटरच्या कर्मचारी केस वर्कर रूपाली वानखडे, प्रिया   इंगळे, अक्षय चतरकर, रोशन टाले यांचीही उपस्थिती होती. 00000