रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 1583 चाचण्यात 78 पॉझिटीव्ह
अकोला,दि.26 (जिमाका)- कोरोना संसर्ग
चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.25) दिवसभरात झालेल्या 1583 चाचण्या झाल्या त्यात 78 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट येथे 69 चाचण्या
झाल्या त्यात 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,
बाळापूर येथे 12 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, बार्शीटाकळी येथे 129 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, पातूर येथे 82 चाचण्या
झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 123 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर
येथे 176 चाचण्या झाल्या त्यात 19 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका
येथे 886 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 68 चाचण्या झाल्या त्यात नऊ
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला आयएमए येथे 15, आरोग
कर्मचाऱ्यांचे 23 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे
1583 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 78 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 47 हजार 846 चाचण्या झाल्या पैकी 13414 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत,
अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा