कोविड-19 आढावा बैठक ; बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करा- पालकमंत्री ना.बच्चू कडू

 




         अकोला, दि.13 (जिमाका)- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, ही बाब लक्षात घेता बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर  तयार करावे. तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खरीप हंगामात पेरणीच्या कामानिमित्त शेतीकामाची लगबग वाढेल,अशा परिस्थितीत कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी यंत्रणेस दिले.

           आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख,  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी मोनिका राऊत,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, माता बाल संगोपण अधिकारी डॉ. मनिष शर्मा, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपधिष्ठाता डॉ.घोरपडे, डॉ. अष्टपुत्रे, डॉ.सिरसाम, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदि उपस्थित होते.

              यावेळी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी कोरोना रुग्ण स्थिती,  रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोईसुविधा याबाबत माहिती घेतली. जिल्ह्यातील कोविड रुग्णाची संख्या वाढत असून वाढत्या रुग्णाकरीता बेड तसेच ऑक्सीजन व व्हेटीलेटर बेडची संख्या वाढवावी. तसेच ऑक्सीजन उपलब्धता, आवश्यक मागणी याबाबत माहिती सादर करण्यात आली.आगामी काळात तिसऱ्या लाटेत ग्रामीण भागात व बालकांना बाधीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर  तयार करावे, असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.

         जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेबाबत आढावा घेऊन दुसरा डोस घेण्याऱ्या व्यक्तीना प्राधान्य द्यावे. तसेच लसीकरण केंद्रावर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध कराव्या. तसेच केंद्रावर अनावश्यक गर्दी होणार नाही याकरीता उपायोजना कराव्या. ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणाकरीता जनजागृती करुन लसीकरणाकरीता प्रोत्साहित करावे, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ