अकोला,दि. 11 (जिमाका)-कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.10) दिवसभरात झालेल्या 1335 चाचण्या झाल्या त्यात 241
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल
दिवसभरात अकोला
येथे 80 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले, अकोट येथे 18 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, बाळापूर येथे 29 चाचण्या
झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी येथे 28 चाचण्या झाल्या त्यात दोन
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, पातूर येथे 131 चाचण्या झाल्या त्यात 42
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तेल्हारा येथे 94
चाचण्या झाल्या त्यात 19 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मुर्तिजापूर येथे 158
चाचण्या झाल्या त्यात 43 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 590 चाचण्या झाल्या
त्यात 54 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला
आयएमए येथे 16 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात 70 चाचण्या झाल्या त्यात 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 93
चाचण्या झाल्या त्यात 38 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. जिल्हा आरोग्य
कर्मचाऱ्यांचे 28 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1335 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 241 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 25 हजार 820
चाचण्या झाल्या पैकी 11074 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा