1004 अहवाल प्राप्त, 113 पॉझिटीव्ह, 411 डिस्चार्ज, चार मृत्यू
अकोला,दि.31(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1004
अहवाल प्राप्त झाले. त्यातील 891 अहवाल निगेटीव्ह तर 113 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. दरम्यान 411 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 43 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 55677(41837+13663+177)
झाली आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 113 +
रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 43= एकूण पॉझिटीव्ह- 156.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 268035 नमुने तपासण्यात आले.
त्यात प्राथमिक तपासणीचे 264978 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2667 नमुने होते. आजपर्यंत एकूण 267961 अहवाल प्राप्त
झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 226124 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
113 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 113 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात 40 महिला व 73 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-18, अकोट-37, बाळापूर-आठ, बार्शीटाकळी-
11, पातूर-एक, तेल्हारा-12 अकोला-26.
(अकोला ग्रामीण-2, अकोला मनपा क्षेत्र-24), दरम्यान काल (दि.30) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 43 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व
ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
411 जणांना
डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 23, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील
एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, इनफिनीटी
हॉस्पीटल येथील दोन, गोयंका गर्ल्स हास्टेल सहा, पीकेव्ही जॅम्बो हॉस्पीटल येथील 16, थोटे हॉस्पीटल
येथील चार, हॉटेल इंद्रप्रस्त येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील एक,
हॉटेल रिजेन्सी येथील 12, बिहाडे हॉस्पीटल
येथील एक, अर्थव हॉस्पीटल येथील एक, आधार
हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील चार, तर होम आयसोलेशन मधील 326
असे एकूण 411 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
चार जणांचे मृत्यू
आज दिवसभरात चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात,
अकोट येथील 50 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 30 रोजी मृतावस्थेत दाखल झाले होते.
केशव नगर येथील 56 वर्षीय महिला असून या
महिलेस दि. 28 रोजी दाखल केले होते.
वाडी अदमपूर ता.तेल्हारा येथील 67 वर्षीय
महिला असून या महिलेस दि. 21 रोजी दाखल केले होते.
करतवाडी ता.अकोट येथील 65 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि.19 रोजी दाखल केले होते, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
4351 जणांवर
उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा